IPL 2025 Sunrisers Hyderabad Full Squad and Schedule: पॅट कमिन्सच्या नेतृत्वात आक्रमक पवित्र्यासह खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने लिलावात चांगल्या खेळाडूंची निवड करत पुन्हा उत्तम संघ उभारला. गतवर्षीच्या आयपीएलचा उपविजेता संघ असलेल्या हैदराबादने अनेक नवीन चेहऱ्यांना संघात सामील करत हुशारीने संघबांधणी केली आहे. आयपीएल २०२५ पूर्वी हा संपूर्ण संघ कसा आहे, जाणून घेऊया.

हैदराबाद संघाने युवा विकेटकीपर फलंदाज इशान किशनला ताफ्यात सामील केलं. दुसरीकडे त्यांनी अनुभवी मोहम्मद शमीला संघाचा भाग केलं, शिवाय त्याला साहाय्य करण्यासाठी हर्षल पटेलला समाविष्ट केलं. अभिनव मनोहरला घेण्यासाठी हैदराबाद संघव्यवस्थापन आतूर होतं आणि अखेरीस चुरशीच्या मुकाबल्यात हैदराबादने बाजी मारली. राहुल चहर या हुशार फिरकीपटूला त्यांनी आपल्याकडे वळवलं.

सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल लिलावापूर्वी रिटेन केलेले खेळाडू

सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२४ मध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. २०२४ मध्ये कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आक्रमक पवित्राने खेळत उत्कृष्ट कामगिरी केली. ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन आणि अभिषेक शर्मा यांनी तर अक्षरशः गोलंदाजांची बेदम धुलाई केली. हैदराबाद संघानेही आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी याच ५ खेळाडूंना रिटेन केलं होतं.

यासह सनरायझर्स हैदराबादची विस्फोटक सलामी जोडी अभिषेक आणि ट्रॅव्हिस हेडच असेल. याशिवाय इशान किशन, नितीश रेड्डी, अभिनव मनोहर, हेनरिक क्लासेन हे खेळाडू मधल्या फळीत असतील. तर गोलंदाज ब्रायडन कार्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाल्याने त्याच्या जागी संघाने आफ्रिकेचा अष्टपैलू वियान मुल्डर याला संघात सामील केले. गोलंदाजीत कमिन्स उनाडकट, राहुल चहर, झाम्पा हे गोलंदाज दिसतील.

लखनौच्या ताफ्यातील रिटेन केलेले खेळाडू आणि किंमती

हेनरिक क्लासेन – २३ कोटी
पॅट कमिन्स – १८ कोटी
ट्रॅव्हिस हेड – १४ कोटी
अभिषेक शर्मा – १४ कोटी
नितेश कुमार रेड्डी – ६ कोटी

सनरायझर्स हैदराबादचा आयपीएल २०२५ साठी संपूर्ण संघ (Sunrisers Hyderabad IPL 2025 Full Squad)

पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन, राहुल चहर, ॲडम झाम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, वियान मुल्डर, कामिंदू मेंडिस, अनिकेत वर्मा, एशान मलिंगा, सचिन बेबी.

सनरायझर्स हैदराबाद आयपीएल २०२५ चे वेळापत्रक (IPL 2025 Sunrisers Hyderabad Match Schedule)

  • २३ मार्च – सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स
  • २७ मार्च – सनरायझर्स हैदराबाद वि. लखनौ सुपर जायंट्स
  • ३० मार्च – दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद
  • ३ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद
  • ६ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. गुजरात टायटन्स
  • १२ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्स
  • १७ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद
  • २३ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद
  • २५ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद
  • २ मे – गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद
  • ५ मे – सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स
  • १० मे – सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स
  • १३ मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनरायझर्स हैदराबाद
  • १८ मे – लखनौ सुपर जायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद

Story img Loader