K L Rahul Injured And Out Of IPL 2023 : लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध झालेल्या मागील सामन्यात दुखापतग्रस्त झाला. दुखापत गंभीर असल्याने राहुल आयपीएल २०२३ मधून बाहेर झाला आहे. राहुलच्या मांडीला दुखापत झाल्याने लखनऊ संघाला मोठा धक्का बसला आहे. मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर फाफ डु प्लेसिसने कव्हरला मारलेला चेंडू चौकाराच्या दिशेनं जात असताना राहुलने पकडण्याचा प्रयत्न केला, त्याचदरम्यानत राहुलला दुखापत झाली. अशातच जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात राहुल खेळणार की नाही? याबाबत साशंकता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, के एल राहुल यावेळी लखनऊ टीमसोबत आहे. तो बुधवारी चेन्नई सुपर किंग्जविरोधात सामना संपल्यानंतर मुंबई येणार आहे. त्याची स्कॅनिंग मुंबईत बीसीसीआयच्या माध्यमातून एका रुग्णालयात केली जाईल. राहुलसोबत उनादकट जयदेवच्या प्ररणावरही लक्ष देण्यात येणार आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं स्कॅन झालेलं नाही, अशी माहिती ही सूत्रांनी दिली आहे.

नक्की वाचा – Virat Kohli Controversy: “तू माझ्या फॅमिलीला शिव्या…” कोहली-गौतम भांडणाचे गंभीर कारण आले समोर

सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा कुणालाही अशाप्रकारची दुखापत होते, तेव्हा त्या खेळाडूला खूप वेदना होतात आणि शरीराच्या त्या भागावत सूज येते. सूज कमी व्हायला जवळपास २४ ते ४८ तासांचा कालावधी लागतो. त्यानंतरच तुम्ही स्कॅन करू शकता. त्यांनी पुढं म्हटलं, “राहुल कसोटी क्रिकेटचा महत्वाता भाग आहे. त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये पुढील सामने खेळू नयेत, अशी भूमिका योग्य ठरेल. एकदा स्कॅनिंग झाल्यानंतर दुखापतीच्या गंभीर समस्येबाबत माहिती मिळेल. तोपर्यंत बीसीसीआयची मेडिकल टीम आरोग्यासंबंधीत उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेईल.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lsg is in big trouble as skipper kl rahul injured and ruled out for remaining ipl 2023 kl rahul in doubt to play wtc final 2023 nss