Jonty Rhodes Viral Video: चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. लखनऊच्या एकना स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने होते, मात्र पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. मात्र, दोन्ही संघांना १-१ गुणांवर समाधान मानावे लागले. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने १९.२ षटकात ७ विकेट्स गमावत १२५ धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर पावसामुळे सामना थांबवावा लागला.

पावसाळ्यात ग्राउंड स्टाफच्या मदतीसाठी जॉंटी ऱ्होड्स पोहोचला

मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स सामन्याच्या वेळचा आहे. लखनऊ सुपर जायंट्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉंटी ऱ्होड्स या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. वास्तविक, पावसामुळे खेळ थांबला होता, त्यावेळी जॉंटी ऱ्होड्स मैदानावरील कव्हर आणण्यासाठी ग्राउंड स्टाफला मदत करत आहे. पाऊस पडत असताना मैदानावर लवकर आवरण आणण्यासाठी ते ग्राउंड स्टाफला मदत करत होते.

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Maha Vikas Aghadi And Mahayuti Battle For Votes
अग्रलेख : गॅरंट्यांचा शाम्पू!
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?

जॉंटी ऱ्होड्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

सोशल मीडियावर जॉंटी ऱ्होड्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर जॉंटी ऱ्होड्सची ही स्टाइल आयपीएल चाहत्यांना खूप आवडते. सोशल मीडिया यूजर्स सतत जॉंटी ऱ्होड्सचे कौतुक करत आहेत. याशिवाय जॉंटी ऱ्होड्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला. मात्र, हा सामना रद्द झाल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स १० सामन्यांत ११ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज १० सामन्यांत ११ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

लखनऊचा कर्णधार के. एल. राहुल या सामन्यात खेळत नव्हता. त्याच्या जागी कृणाल पांड्याला कर्णधारपद देण्यात आले. गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळताना के. एल. राहुलला दुखापत झाली होती. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, के. एल. राहुल उर्वरित आयपीएल २०२३ टूर्नामेंटमधून बाहेर पडला आहे.

हेही वाचा: IPL2023: विराट काय चीज आहे, गंभीरने तर धोनीलाही सोडले नव्हते! ‘या’ किस्स्याची झाली आठवण

आरसीबी आणि लखनऊच्या सामन्यानंतर कोहली आणि गंभीरमध्ये जोरदार वाद झाला. दोघांनी एकमेकांना अनेक गोष्टी सांगितल्या. मात्र, ही भांडण विराट-गंभीर यांच्यात नसून विराट आणि अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन-उल-हक यांच्यात होती. आता या भांडणानंतर आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही नवीनची भेट घेतली आहे.