IPL 2025, CSK VS LSG Highlights: आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने अखेरीस पराभवाची मालिका संपवत सलग पाच सामन्यांनंतर विजयाची नोंद केली आहे. चेन्नईने लखनौवर ५ विकेट्सने मात करत मोसमातील दुसरा विजय नोंदवला. धोनी आणि दुबेची भागीदारी संघासाठी मॅचविनिंग ठरली, तर सीएसकेच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली.

Live Updates

IPL 2025 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Highlights: आयपीएल २०२५ लखनौ सुपर जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्याचे हायलाईट्स

22:54 (IST) 14 Apr 2025

LSG vs CSK Live: पाचवी विकेट

दिग्वेश राठीच्या १५व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विजय शंकर झेलबाद झाला. यासह आता चेन्नईला ३० चेंडूत ५७ धावांची गरज आहे.

22:49 (IST) 14 Apr 2025

LSG vs CSK Live: लखनौला मिळाली चौथी विकेट

रवी बिश्नोईच्या १३ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात मारक्रमकरवी झेलबाद झाला. यासह १३ षटकांत चेन्नईने ४ बाद १०४ धावा केल्या आहेत.

22:28 (IST) 14 Apr 2025

LSG vs CSK Live: २ षटकांत २ विकेट

मारक्रमच्या ८व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर रचिन रवींद्र पायचीत झाला. रचिन २२ चेंडूत ५ चौकारांसह ३७ धावा करत माघारी परतला. तर ९व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर राहुल त्रिपाठीला रवी बिश्नोईने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. यासह चेन्नईने ९ षटकांत ३ बाद ७६ धावा केल्या आहेत.

22:05 (IST) 14 Apr 2025

LSG vs CSK Live: लखनौच्या खात्यात पहिली विकेट

आवेश खानच्या पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर शेख रशीद मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. रशीदने चेन्नईला चांगली सुरूवात करून दिली. रशीद १९ चेंडूत ६ चौकारांसह २७ धावा करत बाद झाला.

21:50 (IST) 14 Apr 2025

LSG vs CSK Live: सीएसकेची शानदार सुरूवात

लखनौने दिलेल्या १६७ धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करण्यासाठी चेन्नईकडून रचिन रवींद्र आणि युवा खेळाडू शेख रशीद जोडी उतरली आहे. या जोडीने संघाला एक चांगली सुरूवात करून दिली आहे. शेख रशीदने दुसऱ्या षटकात ३ चौकार तर तिसऱ्या षटकात २ चौकार लगावत चांगली सुरूवात केली आहे.

21:24 (IST) 14 Apr 2025
LSG vs CSK Live: लखनौने दिलं इतक्या धावांचं लक्ष्य

मथिशा पथिरानाच्या अखेरच्या षटकात लखनौने ३ विकेट गमावले, तर यासह संघाने २० षटकांत ६ बाद १६६ धावा केल्या आहेत. अब्दुल समद, ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर अखेरच्या षटकात बाद झाले. यासह लखनौने चेन्नईला विजयासाठी १६७ धावांचे लक्ष्य दिले आहे. ऋषभ पंत ४९ चेंडूत ४ षटकार आणि ४ चौकारांसह ६६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर मिचेल मार्श ३० धावा करत बाद झाला. याशिवाय आयुष बदोनीने २२ धावा, अब्दुल समदने २० धावांचं योगदान दिलं. तर शार्दुल ठाकूरने ६ धावा केल्या.

21:22 (IST) 14 Apr 2025
LSG vs CSK Live: अखेरच्या षटकात ३ विकेट

मथिशा पथिरानाच्या अखेरच्या षटकात दुसऱ्या वाईड चेंडूवर अब्दुल समद धावबाद झाला. तर पुढच्या चेंडूवर ऋषभ पंत मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. तर अखेरच्या चेंडूवर शार्दुल ठाकूर झेलबाद झाला आहे.

21:08 (IST) 14 Apr 2025

LSG vs CSK Live: ऋषभ पंतचं अर्धशतक

ऋषभ पंतने पथिरानाच्या १७व्या षटकात दोन षटकार लगावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ऋषभ पंतचं हे यंदाच्या सीझनमझील हे पहिलं अर्धशतक आहे. ऋषभ पंतने ४२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५५ धावा केल्या. संघाचे तीन मोठे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर पंतने सावधाने खेळत मैदानावर टिकत फलंदाजी केली.

20:48 (IST) 14 Apr 2025

LSG vs CSK Live: आयुष बदोनीला जीवदान

मथिशा पथिरानाच्या १२व्या आणि जडेजाच्या १३व्या षटकात बदोनीला २ वेळा जीवदान मिळालं. पण अखेरीस जडेजाच्या षटकातच तो स्टंपिंग होत बाद झाला.

20:25 (IST) 14 Apr 2025

LSG vs CSK Live: मिचेल मार्श क्लीन बोल्ड

रवींद्र जडेजाच्या फिरकीची जादू लखनौविरूद्ध सामन्यात दिसली. १०व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मार्श जडेजाच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. यासह लखनौने तिसरी विकेट गमावली. १० षटकांत लखनौचा संघ ३ बाद ७८ धावा करू शकला आहे. ऋषभ पंत २८ तर नुकताच आलेला आयुष बदोनी ५ धावांवर खेळत आहे.

19:56 (IST) 14 Apr 2025

LSG vs CSK Live: निकोलस पुरन झेलबाद

अंशुल कंबोजच्या चौथ्या षटकातील अखेरचा चेंडू पुरनच्या पॅडवर जाऊन आदळला. अंशुल कंबोजने जोरदार अपील केलं. पण पंचांनी निर्णय़ दिला नाही. धोनीनेही रिव्ह्यू घेण्याची तयारी दाखवली नाही. पण अंशुल कंबोजने धोनीला रिव्ह्यूसाठी तयार केलं आणि निकोलस पायचीत झाल्याचे रिव्ह्यूमध्ये दिसले. यासह चेन्नईला मोठी विकेट मिळाली. यासह दिल्लीने ४ षटकांत २ बाद २३ धावा केल्या आहेत.

19:37 (IST) 14 Apr 2025
LSG vs CSK Live: पहिल्याच षटकात विकेटने सुरूवात

चेन्नई सुपर किंग्सने पहिल्याच षटकात विकेटने सुरूवात केली आहे. खलील अहमदच्या गोलंदाजीवर अखेरच्या षटकात मारक्रमच्या बॅटची कड घेत चेंडू हवेत उडाला, पण राहुल त्रिपाठीने उलट मागे धावत जाऊन एक कमालीचा झेल टिपला. यासह दिल्लीला पहिला धक्का बसला आहे. दिल्लीने पहिल्या षटकात ६ धावा करत १ विकेट गमावली आहे.

https://twitter.com/IPL/status/1911784732662112305

19:11 (IST) 14 Apr 2025
LSG vs CSK Live: लखनौ सुपर जायंट्सची प्लेईंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात एक बदल करण्यात आला आहे. हिम्मत सिंगच्या जागी संघात पुन्हा मिचेल मार्श परतला आहे.

एडन मारक्रम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी

https://twitter.com/LucknowIPL/status/1911778650736689157

19:09 (IST) 14 Apr 2025
LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग इलेव्हन

सीएसकेच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. अश्विनच्या जागी युवा खेळाडू शेख रशीदला संधी दिली आहे. तर डेव्हॉन कॉन्वेच्या जागी जेमी ओव्हरटनला प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील केलं आहे.

शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, रवींद्र जडेजा, जेमी ओव्हरटन, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकिपर), अंशुल कंबोज, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना

19:02 (IST) 14 Apr 2025
LSG vs CSK Live: नाणेफेक

चेन्नई सुपर किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स सामन्याची नाणेफेक झाली असून सीएसके संघाने नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चेन्नईने घेतला आहे. चेन्नईच्या संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. तर दिल्लीच्या ताफ्यातही एक बदल करण्यात आला आहे.

18:59 (IST) 14 Apr 2025

LSG vs CSK Live: सीएसके संघ पुनरागमन करणार का

चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल २०२५ मध्ये सलग ५ सामने गमावले आहेत. गेल्या सामन्यात तर केकेआर संघासमोर सीएसके संघाला १०० धावा करताना नाकीनऊ आले होते. ऋतुराज गायकवाडच स्पर्धेबाहेर झाल्याने आता धोनी संघाचं नेतृत्त्व करणार आहे. धोनीच्या नेतृत्त्वाखाली आता सीएसकेचा संघ पुनरागमन करणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत.

18:48 (IST) 14 Apr 2025

LSG vs CSK Live: हिंदीत गाणं बोलतोय निकोलस पुरन

लखनौ संघाचा स्टार खेळाडू निकोलस पुरन हिंदीमध्ये तेरे संग यारा गाणं बोलतानाचा व्हीडिओ संघाने शेअर केला आहे.

https://twitter.com/LucknowIPL/status/1911415201183707361

18:43 (IST) 14 Apr 2025

LSG vs CSK Live: लखनौ सुपर जायंट्सचा संघ

ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, एडन मारक्रम, मिचेल मार्श, आवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, हिम्मत सिंग, एम सिद्धार्थ, दिग्वेश सिंग, शाहबाज अहमद, आकाश सिंग, शमर जोसेफ (आरटीएम) , प्रिन्स यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगेरकर, अर्शिन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रिट्झके

18:43 (IST) 14 Apr 2025

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सचा संघ

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद

IPL 2025, LSG vs CSK Highlights: चेन्नई सुपर किंग्सने पराभवाची मालिका संपवत ऋषभ पंतच्या लखनौ सुपर जायंट्ससवर विजय मिळवला आहे.