आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) तीन पैकी दोन सामने जिंकत विजयाच्या मार्गावर आहेत. अशातच संघातील अनुभवी फलंदाज मनिष पांडेची (Manish Pandey) कामगिरी संघाच्या चिंतेचा विषय ठरलीय. आतापर्यंत मनिषला आपल्या खेळीचा ठसा उमटवता आलेला नाही. आता लखनऊला आपल्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सामना करावा लागणार आहे. या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटर आकाश चोप्राने लखनऊला मनिष पांडेला ड्रॉप करण्यास सांगत गोलंदाजी मजबूत करण्याचा सल्ला दिलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळताना मनिष पांडेने एक षटकार आणि एक चौकार लगावत ११ धावा केल्या होत्या. याशिवाय या हंगामात मनिषने ३ सामन्यात केवळ २२ धावा केल्या आहेत.

आकाश चोप्राच्या मते सध्या फॉर्ममध्ये नसलेल्या मनिषमुळे संघातील इतर फलंदाजांना कमी चेंडू खेळायला मिळत आहेत. त्यामुळे पुढील सामन्यात मनिष ऐवजी संघात एका गोलंदाजाला संधी दिली पाहिजे असा आग्रह चोप्राने केला.

आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटलं आहे, “तुम्ही किती वेळ मनिष पांडेसोबत राहाल? मला वाटतं त्यांनी आता यापलिकडे पाहायला हवं. दीपक हूडा आणि आयुष बदोनी या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. जेसन होल्डर आठव्या किंवा नवव्या क्रमांकावर येण्याला काय अर्थ आहे. कृणाल पांड्या देखील फलंदाजी करायला तयार आहे. त्यांच्याकडे फलंदाजीची एक मोठी रांग आहे. कृष्णप्पा गौतम किंवा अंकित राजपूतला खेळवलं जाऊ शकतं.”

हेही वाचा : Todays IPL 2022 match, LSG vs DC | आज लखनऊ आणि दिल्ली भिडणार, कुणाचं पारडं जड? वाचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन

“मनिषला ड्रॉप करून लखनऊ फिरकीपटूच्या रुपात कृष्णप्पा गौतम किंवा एक वेगवान गोलंदाज म्हणून अंकित राजपूतला खेळवू शकतो, असंही आकाश चोप्राने म्हटलं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lsg vs dc ipl 2022 akash chopra suggest lsg to drop batter manish pandey who is out of form in ipl 2022 pbs