Gujarat Titans vs Lucknow Supergiants Match Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२३ मधील ५१ वा सामना खेळला गेला. हा सामना लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स संघात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने लखनऊवर ५६ धावांनी विजय मिळवला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद २२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ २० षटकांत ७ बाद १७१ धावाच करु शकला. गुजरातच्या विजयात साहा-गिल आणि मोहित शर्मा यांनी महत्वाची भूमिका बजावली.
२२८ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या लखनऊ सुपरजायंट्स संघाची सुरुवात शानदार झाली. सलामीला आलेल्या काईल मेयर्स आणि क्विंटन डी कॉकने सुरेख सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८.२ षटकांत ८८ धावांची भागीदारी केली. काईल मेयर्सने ३२ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४८ धावांची खेळी करुन बाद झाला. त्याचे अवघ्या दोन धावांनी अर्धशतक हुकले.