Lucknow Super Giants vs Gujarat Titans IPL Match Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेत शनिवारी (दि. २२ एप्रिल) चाहत्यांना एका नाही, तर दोन सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. कारण, शनिवारी डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला लखनऊ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स संघात यांच्यात रोमांचक सामना संपन्न झाला. अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातने अखेरच्या चार षटकात सामना फिरवत लखनऊला सात धावांनी पराभूत केले. मोहित शर्माच्या शेवटच्या षटकात तब्बल चार विकेट्स पडल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरातने ठेवलेल्या १३६ या माफक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊची सुरुवात दमदार झाली. सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी करत विजयाचा भक्कम पाया रचला होता पण तो अपयशी ठरला. कर्णधार के.एल. राहुल आणि काइल मेयर्स यांनी गुजरातच्या गोलंदाजांना अक्षरशः धुधू धुतले. काइल मेयर्स मोठा फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. त्याने १९ चेंडूत २४ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या कृणाल पांड्याने २३ चेंडूत २३ धावा केल्या त्याला नूर अहमदने बाद केले.

वेस्ट इंडीजचा स्टार फलंदाज निकोलस पूरन फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. तो केवळ एक धाव करून हार्दिककरवी झेलबाद झाला. एक बाजू सांभाळून लखनऊचा कर्णधार के.एल.राहूनने संघाला विजयापर्यंत नेण्याचे प्रयत्न केले अर्ध्यावर तो अपयशी ठरला. ६१ चेंडूत ६८ धावा करून केएल राहुल बाद झाला. मार्कस स्टॉयनिसलाही विशेष काही दाखवता आले नाही. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर आयुष बडोनी 8 धावा करून धावबाद झाला. पोहचवले.गुजरात टायटन्सकडून नूर अहमदने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या त्याला राशिद खानने एक विकेट घेत चांगली साथ दिली. शेवटच्या पाच षटकात गुजरातने कसून गोलंदाजी करत लखनऊच्या गोलंदाजांवर दबाव आणला आणि रोमांचक विजय मिळवला.

हेही वाचा: LSG vs GT Score: हातातोंडाशी आलेला घास गुजरातने हिरावला! लखनऊवर सात धावांनी केली मात, मोहित शर्मा ठरला हिरो

तत्पूर्वी, लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील आजचा सामना होत आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरातला मागील सामन्यात हार पत्करावी लागली होती आणि त्यांचा पुन्हा विजयपथावर परतण्याचा प्रयत्न असणार आहे, तर लखनऊ विजयी मालिका कायम राखण्यासाठी घरच्या मैदानावर उतरली आहे. के.एल.राहुलने दुसऱ्याच षटकात कृणाल पांड्याला गोलंदाजीला आणले अन् त्याने शुबमन गिलची (०) विकेट मिळवून दिली. वृद्धीमान साहा आणि हार्दिक पांड्या यांनी गुजरातचा डाव सावरताना लखनऊच्या गोलंदाजांवर हल्लाबोल सुरू केला. गुजरातच्या पॉवर प्लेमधील ४० पैकी ३४ धावा या साहानेच केल्या. गुजरातची ही पॉवर प्लेमधील निचांक धावसंख्या ठरली. दुसरा सामना मुंबई विरुद्ध पंजाब संघात आयपीएल २०२३मधील ३१वा सामना ७.३० वाजता खेळला जाणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lsg vs gt score gujarat beat lucknow by seven runs rahuls team could not score 30 runs in the last five overs avw