IPL 2025 Shubman Gill and Sai Sudharsan Partnership: आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सचा संघ शानदार फॉर्मात आहे. शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली गुजरातने सलग चार सामने जिंकले आहेत. गुजरातच्या या शानदार कामगिरीमागचं एक कारण म्हणजे संघाची फलंदाजीची टॉप ऑर्डर. साई सुदर्शन आणि शुबमन गिलची ही सलामीची जोडी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला चांगली सुरूवात करून देत आहे. गिल आणि साईने लखनौविरूद्धच्या सामन्यात एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.
गुजरात संघाचा कर्णधार शुबमन गिल आणि त्याचा जोडीदार साई सुदर्शन जवळपास सर्वच सामन्यांमध्ये अर्धशतकी भागीदारी रचताना दिसतात. तर साई सुदर्शन तुफान फॉर्मात असून त्याने एक सामना वगळता सर्वच सामन्यांमध्ये मोठी खेळी केली आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सहाव्या सामन्यात दोघांनीही असंच काहीसे केले आणि उत्कृष्ट अर्धशतकं झळकावलं.
गुजरातचे सलामीवीर शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी शंभर धावांची भागीदारी केली. अशाप्रकारे, दोन्ही फलंदाज आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करणारे पहिली जोडी ठरले आहेत. त्यांनी मिळून १२० धावांची भागीदारी केली.
आयपीएल २०२५ मध्ये गिल आणि साई यांच्या आधी, एडन मारक्रम आणि मिचेल मार्श यांनी लखनौसाठी पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारी केली होती. दोघांनीही ९९ धावांची भागीदारी रचली होती. तर आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करणाऱ्यांमध्ये विराट कोहली आणि फिलिप सॉल्टची जोडी तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानविरुद्ध या दोघांनी ९५ धावांची भागीदारी केली होती.
Kya baat hai! ? pic.twitter.com/2e1gEVpbCW
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 12, 2025
गिलने या सामन्यात ३८ चेंडूच ६ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा करत बाद झाला. तर साई सुदर्शन ३७ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ५६ धावांची खेळी करत माघारी परतला. या दोघांनी आपल्या अर्धशतकी खेळीसह १२० धावांची विक्रमी भागीदारी रचली. दोघांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. आयपीएलच्या इतिहासात गिल आणि सुदर्शन यांनी २४ डावांमध्ये एकत्र फलंदाजी केली आहे आणि १२ व्यांदा ५० किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी केली.