आयपीएल २०२२ मध्ये मंगळवारी गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र नाणेफेकीच्या वेळी दोन्ही कर्णधारांमध्ये जोरदार हशा पिकला. दरम्यान, या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा गुजरात टायटन्सने पराभव केला आहे. गुजरातने हा सामना ६२ धावांनी जिंकला आणि आयपीएलच्या या हंगामातील प्लेऑफसाठी पात्र ठरले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने ४ गडी गमावून १४४ धावा केल्या. आता लखनऊला विजयासाठी १४५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ १३.५ षटकांत ८२ धावांत गारद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाणे फेकण्याच्या वेळी राहुलने कॉईन हवेत उंचावला. त्यावेळी हार्दिक पांड्याने हेड म्हटले. कॉईन खाली आल्यानंतर राहुलने हार्दिकला टेल्स म्हणाला होतास ना… असे विचारले. त्यावर हार्दिक पांड्या हसला अन् हेड म्हणाले होतो.. असे सांगितले. त्यानंतर हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

गुजरात टायटन्सने आयपीएलच्या १५ व्या हंगामातील प्लेऑफसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या आयपीएल २०२२ च्या ५७व्या साखळी सामन्यात गुजरात संघाने लखनऊ सुपर जायंट्सचा ६२ धावांनी पराभव केला. यासह गुजरात टायटन्स हा आयपीएल २०२२ च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातच्या खात्यात आता १८ गुण आहेत.

लखनऊ सुपर जायंट्सला अजूनही प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी आहे. लखनऊला आणखी दोन सामने खेळायचे आहेत आणि जर संघाने एक सामना जिंकला तर तो अधिकृतपणे प्लेऑफसाठी पात्र ठरेल, तर दोन्ही सामने गमावल्यासही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. कारण ज्या संघाने १६ गुण मिळवले आहेत तो बहुधा आयपीएलच्या इतिहासात कधीही प्लेऑफच्‍या शर्यतीतून बाहेर पडलेले नाही.