मुंबई इंडियन्स आणि लखनऊमध्ये आज आयपीएलमधील ४८व्या सामन्यातील लढत होणार आहे. लखनऊने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात लखनऊच्या संघात काही बदल करण्यात आले आहेतस तर एका नव्या खेळाडूचे पदार्पण झाले आहे. भारताच्या अंडर-१९ संघाचा स्टार खेळाडू असलेल्या मराठमोळ्या १९ वर्षीय अर्शीन कुलकर्णी आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे.
कोण आहे अर्शीन कुलकर्णी?
२०२३ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत कोल्हापूरच्या अर्शीन कुलकर्णीने चमकदार कामगिरी केली होती. या कामगिरीनंतरच आयपीएलच्या लिलावात त्याच्यावर लखनऊने विश्वास दाखवत त्याची मूळ किंमत २० लाख रूपयांना संघात सामील केले. आता यानंतर अर्शीनला मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्याविरूद्ध पदार्पणाची ही लखनऊने संधी दिली आहे. या सामन्यात इम्पॅक्ट खेळाडूंमध्ये अर्शीनला ठेवण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जॅक कॅलिस हा अर्शीनचा सर्वात आवडता खेळाडू आहे आणि तो त्याला आपला आदर्शही मानतो. दुबईतील १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर ७ गडी राखून मात केली होती. या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासोर १७४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. अर्शीन कुलकर्णीने या सामन्यात भारतासाठी नाबाद ७० धावांसह ३ विकेट घेत, अष्टपैलू खेळी करीत विजयात मोठा उचलला होता.
मागील वर्षी झालेल्या विनू मंकड चषक स्पर्धेत महाराष्ट्राकडून अर्शीन सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. याशिवाय मुश्ताक आली चषक स्पर्धेतही त्याला वरिष्ठ महाराष्ट्र संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती, त्या अंतिम फेरीत त्याने शतक झळकावले होते. त्यासोबतच महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्येही त्याने शतक झळकावले आहे. इतर काही शानदार कामगिरींची त्याच्या नावावर नोंद आहे.सहाव्या वर्षापासून क्रिकेटचे धडे गिरवत असलेल्या अर्शीनने यशस्वीपणे दमदार वाटचाल करीत आहे.