IPL 2024, LSG vs PBKS Team Predicted Playing 11, Players List, Pitch Report Updates: केएल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्स (LSG) वि धवनच्या पंजाब किंग्स (PBKS)मध्ये लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर लढत पाहायला मिळणार आहे. लखनऊचा संघ पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे तर पंजाब किंग्स अजून एक विजय मिळवत गुणतालिकेत आपले स्थान बळकट करण्यावर त्यांची नजर असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केएल राहुलचा एसएसजी संघ आयपीएल २०२४ चा पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध २० धावांनी गमावला. तर पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा (DC) चार विकेट्सने पराभव करून त्यांच्या मोहिमेची विजयाने सुरुवात केली, परंतु त्यांच्या पुढच्या सामन्यात आरसीबी विरुद्ध चार विकेट्सने पराभव पत्करावा लागला.

LSG vs PBKS: हेड टू हेड

लखनऊ आणि पंजाब या दोन्ही संघांनी आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकमेकांविरुद्ध ३ सामने खेळले आहेत. यामध्ये एलएसजीने २ सामने जिंकले, तर पंजाब किंग्जने १ सामना आपल्या नावे केला. पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सची सर्वोच्च धावसंख्या २५७ धावा आहे. पंजाब किंग्जची लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या २०१ आहे.

LSG vs PBKS: पिच रिपोर्ट

इकानाची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना खूप मदत करते. फलंदाजांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या मैदानावर उच्च धावसंख्येचे सामने फारसे पाहायला मिळत नाहीत. एकना स्टेडियमने आतापर्यंत एकूण ७ आयपीएल सामने आयोजित केले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला केवळ एकाच सामन्यात विजयाची मिळवण्यात यश आले. म्हणजे या मैदानावर नाणेफेक मोठी भूमिका बजावते हे स्पष्ट होते.

एलएसजीचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी संकेत दिले आहेत की या हंगामात इकानाची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल असेल. या खेळपट्टीवर, सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना स्विंगची मदत मिळू शकते, परंतु जसजसा सामना पुढे जाईल आणि चेंडू जुना होईल तसतसे फिरकीपटू देखील प्रभावी होतील. अशा परिस्थितीत फिरकीपटू पुन्हा महत्त्वाची भूमिका बजावतील, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

LSG vs PBKS: लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

लखनऊ सुपर जायंट्स

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, अमित मिश्रा, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या

पंजाब किंग्स

शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, सॅम करन

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lsg vs pbks match preview ipl 2024 head to head playing xi and pitch report details bdg