Lucknow Super Giants vs Punjab Kings Match Updates:  आयपीएल २०२३ मधील २१वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे.  या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनच्या रूपाने मोठा धक्का बसला. शिखर धवन दुखापतीमुळे या सामन्यात संघाचा भाग होऊ शकला नाही. धवनच्या जागी अष्टपैलू सॅम करन पंजाब किंग्जची जबाबदारी सांभाळत आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्ससमोर १६० धावांचे माफक लक्ष्य ठेवले आहे.

पंजाबचा आजच्या सामन्यासाठीचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर दोघांमधील हा सामना खेळवला जात असल्याने येथील द्विधावस्थेत टाकणारी खेळपट्टी आहे. कधी चेंडू अधिक उसळी घेत आहे तर कधी खूप चेंडूचा टप्पा खाली राहत आहे. त्यामुळे फलंदाज मोकळेपणाने फटके खेळू शकले नाहीत. तसेच पंजाबी तडका लखनऊच्या फलंदाजांना थोडा महागात पडला. कर्णधार के.एल.राहुलने एक बाजू सांभाळून धरत दमदार अर्धशतक झळकावले. त्याने ५६ चेंडूत ७४ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. त्याच्या या खेळीत त्याने ८ चौकार आणि एक षटकार मारला. त्याला अर्शदीप सिंगने बाद केले.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
Shreyas Iyer 40 Runs Inning Made Mumbai Win in Low Scoring Match vs Hyderabad Vijay Hazare Trophy
Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय
Pakistan Beat South Africa by 80 Runs and Seal ODI Series
PAK vs SA: पाकिस्तान क्रिकेट बोर्डात गोंधळ आणि बंडाळ्या पण संघाची कमाल; आफ्रिकेला घरच्या मैदानावर दिला दणका
Travis Head Injury Update Suffers Groin Injury in Gabba Test
IND vs AUS: ट्रॅव्हिस हेड मेलबर्न कसोटीत खेळणार नाही? गाबा कसोटीत झाली होती दुखापत, स्वत: दिले अपडेट
IND vs AUS Isa Guha Racial Comment on Jasprit Bumrah During Gabba Test Called him primates
IND vs AUS: पुन्हा मंकीगेट प्रकरण? जसप्रीत बुमराहवर महिला कमेंटेटरने केली वर्णभेदात्मक टिप्पणी, गाबा कसोटीत नव्या वादाला फुटलं तोंड

लखनऊची सुरुवात चांगली झाली, सलामीवीर लोकेश राहुल आणि काइल मेयर्स यांनी पॉवर प्ले मध्ये शानदार फटके मारले. मात्र २३ चेंडूत २९ धावाकरून तो बाद झाला. त्यानंतर दीपक हुड्डा २(३), कृणाल पांड्या १८(१७), निकोलस पूरन ० (१), मार्कस स्टॉयनिस १५(११), आयुष बधोनी ५(६)*, कृष्णाप्पा गौतम १(१), युधवीर सिंग चरक ०(१), रवी बिश्नोई ३(१)* बाकी कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या करता आली नाही. पंजाबकडून कर्णधार सॅम करणने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्यापाठोपाठ कगिसो रबाडाने २ तर हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग आणि सिकंदर रझा यांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले.

हेही वाचा: Rinku Singh: हे काय बोलून गेला वीरेंद्र सेहवाग, म्हणाला… “रिंकू सिंग पुन्हा अशी कामगिरी…”,

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

पंजाब किंग्ज: अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, सिकंदर रझा, सॅम करण (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बधोनी, आवेश खान, युधवीर सिंग चरक, मार्क वुड, रवी बिश्नोई.

  

Story img Loader