LSG Player Marcus Stoinis Finger Injury: आयपीएल २०२३ मधील ३८वा सामना २८ एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मोठ्या प्रमाणात धावांचा पाऊस पडला. लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना पंजाबला २५८ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पंजाब संघ २०१ धावांपर्यतच मजल मारु शकला. त्यामुळे लखनऊने हा सामना ५६ धावांनी जिंकला. या विजयात मार्कस स्टॉइनिसने महत्वाची भूमिका बजावली. पंरतु आता लखनऊ संघाला मोठा धक्का बसला आहे.

या सामन्यातील कामगिरीसाठी मार्कस स्टॉइनिसला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. पण, सामना संपल्यानंतर, त्याच्या दुखापतीशी संबंधित अपडेट केएल राहुल आणि त्याच्या संघाला अडचणीत आणणारी आहे. कारण मार्कस स्टॉइनिसच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे.

share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
loksatta editorial on inflation
अग्रलेख: थाली बचाव…!
NCP Sharad Pawar or NCP Ajit Pawar will fight in Vadgaon Sheri and Hadapsar constituencies in pune
शहरातील ‘या’ मतदारसंघात होणार ‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’ लढत!
Senior Maharashtra minister Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar: लोकसभेनंतर भाजपाने रणनीतीत ‘हा’ महत्त्वाचा बदल केला, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “RSS ने लोकसभेवेळी…”
A conflict started between Dr Sujay Vikhe and Dr Jayashree Thorat
थोरात-विखे तिसऱ्या पिढीतील संघर्षाची झाली नांदी..; डॉ सुजय विखे व डॉ. जयश्री थोरात आमने सामने
balasaheb thorat
नाना पटोले नव्हे, आता काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात मविआशी समन्वय साधणार!
Samajwadi Party Maharashtra Assembly Election 2024
सपाची हुकमी चाल! मविआच्या साथीने MIM व महायुतीला शह? पाच मतदारसंघात लोकसभेची पुनरावृत्ती होणार?

गोलंदाजीदरम्यान बोटाला झाली दुखापत –

या सामन्यात गोलंदाजी करताना मार्कस स्टॉइनिसला दुखापत झाली. सामन्यातील त्याच्या दुसऱ्या षटकात, स्टॉइनिसने पंजाब किंग्जचा फलंदाज अथर्व तायडेने मारलेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, त्याच प्रयत्नात त्याच्या बोटाला दुखापत झाली, त्यानंतर तो त्याच्या षटकातील उर्वरित एक चेंडू टाकू शकला नाही.

हेही वाचा – IPL 2023 PBKS vs LSG: पंजाब-लखनऊ सामन्यात षटकार आणि चौकारांचा पाऊस, ‘या’ मोठ्या विक्रमांची झाली नोंद

दुखापतीमुळे स्टोइनिसने आक्रोश केला. तो गुडघ्यावर बसला, त्यानंतर फिजिओला मैदानात यावे लागले. पण, त्यानंतरही त्याच्या वेदना कमी न झाल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले. मात्र, सामन्यानंतर स्टॉइनिसनेच आपल्या दुखापतीबद्धल माहिती दिली. तो म्हणाला, “मी आता ठीक आहे, पण या दुखापतीची नेमकी स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी त्याचे स्कॅनिंग केले जाईल.”

अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर लखनऊला विजय मिळवून दिला –

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू स्टॉइनिसने सामन्यात १.५ षटके टाकली. यादरम्यान त्याने २१ धावा देत शिखर धवनची मौल्यवान विकेट घेतली. याआधी त्याने फलंदाजीतही महत्वाचे योगदान दिले. त्याने या सामन्यात केवळ ४० चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ७२ धावा फटकावल्या. यादरम्यान स्टॉइनिसचा स्ट्राइक रेट १८० होता.

मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २५७ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २०१३ मध्ये पुण्याविरुद्ध २६३ धावा केल्या होत्या. आरसीबीने २०१६ मध्ये गुजरातविरुद्ध २४८ धावा केल्या होत्या.