Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Kings Score Updates : आयपीएल २०२३ चा ५८ वा सामना सनरायझर्स हैद्राबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात राजीव गांधी स्टेडियममध्ये रंगला . हैद्राबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या एसआरएचच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. हेनरिक क्लासेन आणि अब्दुल समदच्या अप्रतिम फलंदाजीमुळं हैद्राबादने २० षटकांत १८२ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर विजयासाठी १८३ धावांचा पाठलाग करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी धमाका केला.

लखनऊची सुरुवात खराब झाल्यानंतरही निकोलस पूरन आणि प्रेरक मंकडने धडाकेबाज फलंदाजी करत लखनऊला विजय मिळवून दिला. मंकडने ४५ चेंडूत ६४ धावांची नाबाद खेळी केली. तर पूरनने १३ चेंडूत ४४ धावांचा पाऊस पाडला. मार्कस स्टॉयनिसनेही २५ चेंडूत ४० धावांची खेळी साकारली. या धावांच्या जोरावर लखनऊने १८३ धावा करून हैद्राबादवर ७ विकेट्सने विजय मिळवला. ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे आणि अभिषेक शर्माला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळालं.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Murbad , Kisan Kathore, Subhash Pawar,
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची, लोकसभेनंतर ग्रामीण पट्ट्यात पुन्हा जातीय समिकरणांना वेग
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’

हैद्राबादसाठी सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा स्वस्तार माघारी परतला. त्यानंतर अनमोल प्रीतने ३६ धावांची खेळी साकारून हैद्राबादच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. राहुल त्रिपाठीने २० तर कर्णधार एडन मार्करमने २८ धावांची खेळी केली. त्यानंतर हेन्री क्लासेन आणि अब्दुल समदने जबरदस्त भागिदारी करून हैद्राबादची धावसंख्या वाढवली. त्यामुळे २० षटकांत हैद्राबादने सहा विकेट्स गमावत १८२ धावा केल्या. लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून हैद्राबादच्या फलंदाजांना गुंडाळलं.

कर्णधार कृणाल पांड्याने एकाच षटकात दोन विकेट्स घेऊन हैद्राबादच्या संघाला मोठा धक्का दिला. पांड्याने मार्करमला २८ धावांवर असताना बाद केलं. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर ग्लेन फिलिप्सचा त्रिफळा उडवला. फिलिप्स शून्यावर बाद झाल्याने हैद्राबादच्या धावसंख्येची गती मंदावली. परंतु, हेन्री क्लासेननं पुन्हा एकदा सावध खेळी करून २९ चेंडूत ४७ धावा कुटल्या. तर अब्दुल समदने २५ चेंडूत ४ षटकार आणि १ चौकराच्या मदतीनं ३७ धावांची नाबाद खेळी केली. लखनऊसाठी कृणाल पांड्याने दोन विकेट्स घेतल्या. युधवीर चरक, अमित मिश्रा आणि यश ठाकूरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.