Rajasthan Royals vs Lucknow Super Giants IPL Match Updates : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलचा २६ वा सामना होत आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकू प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या लखनऊच्या सलामीवीर फलंदाजांनी पॉवर प्ले मध्ये राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पहिल्या विकेटसाठी कर्णधार के एल राहुल आणि केली मायर्सने ८२ धावांची भागिदारी केली. राहुल ३२ चेंडूत ३८ धावांवर खेळत असताना जेसन होल्डरने त्याला बाद करून राजस्थानला ब्रेक थ्रू दिला. त्यानंतर केली मायर्स अर्धशतकी खेळी करून आश्विनच्या गोलंदाजीवर ५१ धावांवर बाद झाला. परंतु, निकोलस पुरन आणि मार्कस स्टॉयनिसच्या सावध खेळीनं लखनऊच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. त्यामुळे २० षटकात लखनऊने ७ विकेट्स गमावत १५४ धावा केल्या. त्यामुळे राजस्थानला विजयासाठी १५५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा