Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad Playing 11 : इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या सीजनचा १० वा सामना आज शुक्रवारी सनरायझर्स हैद्राबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंगणार आहे. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर आता सनरायझर्स हैद्राबाद संघाचा नवीन कर्णधार एडन मार्करम त्याच्या पलटणला घेऊन मैदानात उतरणार आहे. लखनऊ आणि हैद्राबाद यांच्यात आज सायंकाळी ७.३० वाजता सामना होणार आहे. मार्करमच्या अनुपस्थित पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने हैद्राबाद संघाचं नेतृत्व केलं होतं. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ७२ धावांनी हैद्राबादचा दारुण पराभव केला होता. पण आता आपल्या कर्णधारासोबत मार्को जॉनसन आणि हेनरिक क्लासेन संघात सामील झाल्यानं संघाला मजबूती मिळाली आहे.
मार्करमच्या नेतृत्वात मैदानात उतरणार सनरायझर्स हैद्राबाद
सनरायझर्स संघ २०२१ मध्ये शेवटच्या आणि मागील वर्षी १० संघांमध्ये आठव्या स्थानावर होती. या सीजनमध्ये चांगलं प्रदर्शन करण्यासाठी मार्करमकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. पंरतु, सनरायझर्सला पहिल्या सामन्यातच पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्सने या सामन्यात पॉवर प्ले मध्ये १ विकेट गमावत ८५ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०३ धावाचं लक्ष्य गाठणाऱ्या संघाला रोखण्यासाठी पहिल्या सहा षटकात २ विकेट्स देत फक्त ३० धावा दिल्या होत्या. ब्रायन लारा यांच्या कोचिंग टीम सनरायझर्सला आता विशेषत: पॉवर प्ले मध्ये चांगलं प्रदर्शन करावं लागेल. मार्करमचं पुनरागमन झाल्यानंतर या संघाची फलंदाजी मजबूत झाली आहे. तर जॉनसन भेदक गोलंदाजी करण्याची शक्यता आहे.
अशी आहे दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग ११
लखनऊ सुपर जायंट्स : केएल राहुल (कर्णधार), केली मेयर्स, दीपक हुड्डा, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बदोनी/जयदेव उनादकट (इम्पॅक्ट प्लेयर), क्रुणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, आवेश खान, रवी बिश्नोई आणि मार्क वूड.
सनरायझर्स हैद्राबाद : अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), हॅरी ब्रूक, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद/कार्तिक त्यागी (इम्पॅक्ट प्लेयर), वॉशिंगटन सुंदर, आदिल राशीद, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि टी नटराजन