LSG beat RCB by 28 runs : आयपीएल २०२४ मधील १५वा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स आमनेसामने आले होते. या सामन्यात लखनऊने मयंक यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आसीबीचा २८ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. या विजयात मयंक-डी कॉक यांच्याशिवाय कर्णधार निकोलस पूरनने मोलाचे योगदान दिले.

या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत ५ बाद १८१ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला १८२ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात आरबीसीचा संघ १९.४ षटकांत १५३ धावांर गारद झाला. आरसीबीसाठी महिपाल लॉमरोरने सर्वाधिक ३३ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर विराट कोहली (२२), प्लेसिस (१९) आणि पाटीदार (२९) यांनी धावांचे योगदाने दिले. लखनऊकडून मयंकने शानदार गोलंदाजी करताना ४ षटकांत १४ धावा देत ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. या बरोबरच त्याने सलग दुसऱ्या सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला.

IND vs ENG 1st Test Match Updates in Marathi
IND vs NZ : बंगळुरु कसोटीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कहर! ५५ वर्षांनंतर भारताच्या पदरी नामुष्की
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
India beat Bangladesh by 133 runs
IND vs BAN : भारतीय संघाने दसऱ्यालाच साजरी केली दिवाळी, उत्तुंग फटकेबाजीसह दणदणीत विजय
IND vs BAN Sanju Samson hitting five consecutive sixes video viral
IND vs BAN : ६,६,६,६,६…संजू सॅमसनने केला कहर, एकाच षटकात तब्बल इतक्या षटकारांचा पाडला पाऊस, पाहा VIDEO
IND vs BAN 1st T20 Match Hardik Pandya broke Virat Kohlis record for most match winning sixes in T20I
Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
India vs Bangladesh 1st T20 Match highlights
IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने फडकावली विजयी पताका, बांगलादेशचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा
prithvi shaw shine in irani trophy match
आघाडीनंतर मुंबईची पडझडइ; इराणी चषक लढत रंगतदार स्थितीत; दिवसअखेर २७४ धावांनी पुढे
India Becomes First Team in 21st Century to Declared the First Innings under 35 overs in IND vs BAN Kanpur Test
IND vs BAN: टीम इंडियाने कानपूर कसोटीत लिहिला नवा इतिहास, २१व्या शतकात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

लखनऊसाठी क्विंटन डी कॉकने ५६ चेंडूत ८१ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याच्या बॅटमधून ८ चौकार आणि ५ षटकार आले. या खेळीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. एके काळी १४व्या षटकात लखनऊची धावसंख्या १३० धावा होती, त्यानंतर लखनऊ २०० चा टप्पा पार करेल असे वाटत होते, पण त्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आणि लखनऊने १८ षटकात १४८ धावांत ५ विकेट गमावल्या.

हेही वाचा – IPL 2024 : क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकाच्या जोरावरने लखनऊने उभारला धावांचा डोंगर, आरसीबीसमोर ठेवले तब्बल ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य

त्यानंतर धावसंख्या १७० पर्यंत पोहोचेल असे वाटत होते, पण त्यानंतर पुरणने षटकारांचा वर्षाव केला. पुरण २१ चेंडूत ४० धावा करून नाबाद परतला. त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि ५ षटकार आले.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर ग्लेन मॅक्सवेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. ग्लेन मॅक्सवेलने लखनौ सुपर जायंट्सच्या २ फलंदाजांना आपला बाद केले. याशिवाय रीस टोपले, मोहम्मद सिराज आणि यश दयाल यांनी १-१ विकेट घेतली.