Fast Bowler Mayank Yadav Reveals About Fitness : लखनऊ सुपर जायंट्सचा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव आपल्या कौशल्याने सर्वांची मने जिंकत आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने पदार्पण केले होते. तसेच आरसीबीविरुद्ध आयपीएलचा दुसरा सामना खेळला. या दोन्ही सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी केली. तो सतत १५० हून अधिक किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आहे, जे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होत आहे. आयपीएल २०२४ मध्ये, त्याने १५६.७ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली, जी आतापर्यंतची सर्वात वेगवान आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर २८ धावांनी विजय मिळवल्यानंतर त्याने आपल्या फिटनेसचे रहस्य सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या फिटनेसबद्दल बोलताना मयंक सामन्यानंतर म्हणाला, ‘वेगवान गोलंदाजी करण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टींची गरज असते. तुम्हाला तुमचा आहार, झोप, थकवा दूर करणे इत्यादी गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सध्या मी माझ्या आहाराकडे खूप लक्ष देतो आणि ‘आईस बाथ’ देखील घेत आहे. याचा मला फायदा होत आहे.’ मयंकच्या वेगवान गोलंदाजीने कर्णधार केएल राहुलला प्रभावित केले आहे. सामन्यानंतर त्याने या युवा गोलंदाजाचे कौतुकही केले आहे.

दोन्ही सामने जिंकण्यात यशस्वी झाल्याचा अधिक आनंद –

सलग दोन आयपीएल सामन्यांमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा युवा गोलंदाज मयंक यादवने सामनावीराचा किताब पटकावला आहे. मयंकने मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चार षटकांत अवघ्या १४ धावांत तीन विकेट घेतल्या, ज्यामुळे त्याचा संघ 28 धावांनी सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाल्यानंतर मयंक म्हणाला, ‘दोन सामन्यांतून दोनदा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाल्याने बरे वाटते. मात्र, दोन्ही सामने जिंकण्यात आम्ही यशस्वी झालो याचा मला अधिक आनंद आहे.’

हेही वाचा – IPL 2024 : आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर लखनऊला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज आयपीएलमधून झाला बाहेर

भारतासाठी जास्तीत जास्त खेळण्याचे ध्येय –

ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन आणि रजत पाटीदार यांना बाद करणाऱ्या या गोलंदाजाने सांगितले की, भारतासाठी जास्तीत जास्त सामने खेळण्याचे आपले ध्येय आहे. २१ वर्षीय गोलंदाज म्हणाला, ‘भारतासाठी जास्तीत जास्त खेळण्याचे माझे ध्येय आहे. मला वाटते की ही माझ्यासाठी फक्त सुरुवात आहे आणि माझे संपूर्ण लक्ष ध्येय साध्य करण्यावर आहे.’ त्याला सामन्यातील त्याच्या आवडत्या विकेटबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘कॅमरून ग्रीनची विकेट.’

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lucknow supergiants bowler mayank yadav has revealed how he maintains his fitness to bowl fast vbm