LSG set RCB a target of 182 runs : आयपीएल २०२४ मधील १५व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स आमनेसामने आले आहेत. हा बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत ५ बाद १८१ धावा केल्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला १८२ धावांचे लक्ष्य दिले.
लखनऊसाठी क्विंटन डी कॉकने ५६ चेंडूत ८१ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याच्या बॅटमधून ८ चौकार आणि ५ षटकार आले. या खेळीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. एके काळी १४व्या षटकात लखनऊची धावसंख्या १३० धावा होती, त्यानंतर लखनऊ २०० चा टप्पा पार करेल असे वाटत होते, पण त्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आणि लखनऊने १८ षटकात १४८ धावांत ५ विकेट गमावल्या.
त्यानंतर धावसंख्या १७० पर्यंत पोहोचेल असे वाटत होते, पण त्यानंतर पुरणने षटकारांचा वर्षाव केला. पुरण २१ चेंडूत ४० धावा करून नाबाद परतला. त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि ५ षटकार आले.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर ग्लेन मॅक्सवेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. ग्लेन मॅक्सवेलने लखनौ सुपर जायंट्सच्या २ फलंदाजांना आपला बाद केले. याशिवाय रीस टोपले, मोहम्मद सिराज आणि यश दयाल यांनी १-१ विकेट घेतली.
विराट कोहलीचा १०० वा सामना –
विराट कोहली चिन्नास्वामी स्टेडियमवर १०० वा टी-२० सामना खेळणारा पहिला फलंदाज ठरला आहे. अशा परिस्थितीत एकाच मैदानावर १०० टी-२० सामने खेळणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. चिन्नास्वामी स्टेडियम हे आरसीबीचे होम ग्राउंड आहे. आयपीएल २०२४ मध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. तो सध्या आयपीएलमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ३ सामन्यात १८१ धावा केल्या आहेत. त्याच्याशिवाय रियान परागनेही १८१ धावा केल्या आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
लखनऊ सुपरजायंट्स: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, नवीन उल हक, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मयंक यादव.