Shivam Mavi ruled out of IPL 2024 due to injury : आयपीएल २०२४ मध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज शिवम मावी दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. शिवम मावीने यंदाच्या हंगामातून बाहेर पडणे हा लखनऊ संघासाठी मोठा धक्का आहे. डिसेंबर २०२३ मध्ये दुबई एरिना येथे झालेल्या आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावात फ्रँचायझीने आपल्या संघात ६.४ कोटी रुपये देऊन खरेदी केले होते.आता शिवम मावी या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. लखनऊ फ्रँचायझीने व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये शिवम मावी त्याच्या दुखापतीबद्दल सांगताना दिसत आहे. शिवम मावी म्हणाला, ‘मला तुमची खूप आठवण येईल. दुखापतीनंतर मी येथे आलो आणि मला संघासाठी सामने खेळण्याची संधी मिळेल असे वाटले, परंतु दुर्दैवाने मला दुखापत झाल्यामुळे जावे लागेल.

तो पुढे म्हणाला, ‘यासाठी क्रिकेटपटूला मानसिकदृष्ट्या मजबूत असायला हवे. जर तुम्हाला अशा प्रकारची दुखापत झाली असेल, तर तुम्ही परत कसे पुनरागमन कराल आणि तुम्ही त्याची काळजी कशी घ्याल? आमची इथे खूप चांगली टीम आहे. मी माझ्या संघाला चीयर करेल आणि आशा करतो की आम्ही जिंकू.’ मावीने या मोसमात लखनऊसाठी एकही सामना खेळलेला नाही.

हेही वाचा – IPL 2024 RCB vs LSG: “विराट कोहलीला आऊट करशील का?” मनिमरन सिध्दार्थने कोचला दिलेलं वचन केलं पूर्ण, पाहा VIDEO

लखनऊ फ्रँचायझीने एक निवेदन जारी केले आणि लिहिले, ‘लखनऊ सुपर जायंट्सचा शिवम मावी दुर्दैवाने दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल २०२४ मधून बाहेर पडला आहे. प्रतिभावान उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज डिसेंबरमध्ये लिलावानंतर आमच्यात संघात सामील झाला आणि पूर्व-हंगामापासून शिबिराचा भाग राहिला. तो हंगामासाठी संघाचा महत्त्वाचा भाग होता, त्यामुळे त्याचा हंगाम इतक्या लवकर संपल्याने आम्ही आणि शिवम निराश आहोत. फ्रँचायझी शिवमला पाठिंबा देईल आणि त्याच्या रिकव्हरीसाठी त्याला मदत करण्यासही तयार आहे. आम्ही त्याला जलद पुनरागमनासाठी शुभेच्छा देतो आणि आम्हाला खात्री आहे की तो तंदुरुस्त आणि मजबूत पुनरागमन करेल.’

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lucknow supergiants suffered a major shock as fast bowler shivam mavi ruled out of ipl 2024 due to injury vbm