आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३३ व्या सामन्यात मुंबई आणि चेन्नई यांच्यात अटीतटीची लढत झाली. या सामन्यात सुरुवातीला फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईची पुरती दुर्दशा झाली. पहिल्याच षटकात मुंबईचे दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद झाले. तर दुसऱ्या विकेटसाठी आलेला देवाल्ड ब्रेविस अवघ्या चार धावा करुन झेलबाद झाला. एकीकडे मुंबईचा संघ फलंदाजीमध्ये मोठी कामगिरी करु शकला नाही. पण दुसरीकडे मात्र चेन्नईकडून खराब क्षेत्ररत्रक्षण पाहायला मिळाले. चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सध्याचा कर्णधार रविंद्र जाडेजाने महत्वाच्या खेळाडूंचे झेल सोडले.
हेही वाचा >>> अरेरे… मुंबई इंडियन्सला झालंय तरी काय? पहिल्याच षटकात सलामीचे दोन्ही फलंदाज शून्यावर बाद!
पहिल्याच षटकात दोन फलंदाज बाद झाल्यानंतर मुंबईवर सुरुवातीलाच दबाव आला. मात्र दुसऱ्याच षटकात चेन्नईच्या खराब क्षेत्ररक्षणाची प्रचिती आली. मुंबईच्या सात धावा झालेल्या असताना महेंद्रसिंह धोनीने मीसफिल्ड केली. सूर्यकुमारने क्रीज सोडून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. मात्र धोनीने चेंडू सोडल्यामुळे त्याला जीवदान मिळाले. याच षटकात कर्णधार रविंद्र जाडेजानेदेखील सोपा झेल सोडला. देवाल्ड ब्रेविसने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला असताना चेंडू हवेत गेला. मात्र हा झेल जाडेजाला टिपता आला नाही. तसेच मुंबईच्या ७३ धावा झालेल्या असताना हृतिक शोकीनने हवेत चेंडू मारला होतै. मात्र हा झेलदेखील जाडेजाने सोडला.
हेही वाचा >>> अर्जुन तेंडुलकरची भन्नाट गोलंदाजी, नेट प्रॅक्टिस करताना केलं क्लीन बोल्ड, पाहा व्हिडीओ
चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सध्याचा कर्णधार रविंद्र जाडेजा या जोडीने क्षेत्ररक्षणात खराब कामगिरी केली. धोनीने स्टंपिंगची एक संधी गमावली तर रविंद्र जाडेजाने दोन सोपे झेल सोडले. याचा फटका चेन्ननई सुपर किंग्जला बसला. वीस षटके संपेपर्यंत मुंबईने १५५ धावा केल्या. तर जीवदान भेटल्यानंतर तिलक वर्माने ५१ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली.