आयपीएलच्या पंधराव्या मोसमात अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाची सुमार राहिली. त्याच्याकडे कर्णधारपद असताना चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. सध्या चेन्नई संघ प्लेऑफच्या शर्यतीतून तर रविंद्र जडेजा आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. या घडामोडी घडत असताना चेन्नईचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> कोलकाता नाईट रायडर्सला जबर धक्का, दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्स IPLमधून बाहेर

चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामन्यादरम्यान नाणेफेक झाल्यानंतर धोनीने जडेजाविषयी प्रतिक्रिया दिली. “रविंद्र जडेजाची जागा भरुन काढणारा दुसरा खेळाडू मिळणे कठीण आहे. संघ वेगवेगळ्या स्थितीत असताना तो मदतीला यायचा. त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे. वेगवेगळे प्रयोग करताना तो नेहमीच मदतीला यायचा. क्षेत्ररक्षणातही त्याचा हात कोणी धरु शकत नाही,” असे धोनी म्हणाला.

हेही वाचा >>> IPL 2022 RCB vs PBKS : आज बंगळुरु-पंजाब आमनेसामने, कोण ठरणार सरस? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

या हंगामाच्या सुरुवातीला महेंद्रसिंह धोनीने रविंद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले होते. मात्र संघाचे नेतृत्व आल्यानंतर त्याची वैयक्तिक कामगिरी खालावली. तसेच त्याच्या नेतृत्वात चेन्नई संघान सहा सामने गमावले. त्यामुळे फ्लॉप ठरल्यामुळे जाडेजा कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाला. तसेच हैदरबादविरोधात खेळताना त्याच्या बरड्यांना दुखापत झाली. परिणामी त्याने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

मुंबईच्या विजयामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात; सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

दरम्यान, जडेजा आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर चेन्नई संघाने त्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले. त्यानंतर चेन्नई फ्रेंचायझी आणि रविंद्र जडेजा यांच्यात काही मुद्द्यांवरुन बिनसल्याची चर्चा सुरु झाली. मात्र चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी चेन्नई फ्रेंचायझीच्या बाजूने कोणतीही समस्या नाही. जडेजा आगामी काळातही संघाच्या योजनांचा भाग राहील, असं स्पष्टीकरण दिलं.