चेन्नई सुपर किंग्ज हा संघ या हंगामातील आपला शेवटचा सामना खेळतोय. याच कारणामुळे आजचा सामना चेन्नईच्या चाहत्यांसाठी खास आहे. आजच्या शेवटच्या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुढच्या हंगामात दिसणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र या प्रश्नाचे उत्तर खुद्द महेंद्रसिंह धोनी यानेच दिले आहे. मी पुढच्या हंगामातही सामना खेळेल असं माहीने सांगितलं आहे.

हेही वाचा >>> ड्रेसिंग रुममध्ये त्रागा करणं भोवलं, आयपीएलने मॅथ्यू वेडवर केली ‘ही’ कारवाई

आपीएलचे पर्व सुरु होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीने संघाचे कर्णधारपद रविंद्र जडेजाकडे सोपवले होते. मात्र मध्येच संघाची धुरा परत त्याच्याकडे आली. त्यानंतर धोनीने संघाला सावरत आतापर्यंत चार विजय मिळवून दिले आहेत. आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये नाणेफेक झाल्यानंतर धोनीने त्याच्या निवृत्तीवर भाष्य केलं. “चेन्नईमध्ये न खेळताच धन्यवाद देण चुकचं ठरेल. मुंबई हे असं ठिकाण आहे, जिथे संघ तसेच मला मोठं प्रेम मिळालं. मात्र चेन्नईच्या चाहत्यांसाठी हे चांगलं नसेल. पुढील वर्षी टीम प्रवास करेल. त्यामुळे जेथे जेथे आम्ही सामना खेळायला जाऊ, त्या सर्वच ठिकाणांना धन्यवाद केल्यासारखे होईल. माझे हे शेवटचे वर्ष असेल किंवा नसेल हे सांगणे कठीण आहे. आपण भविष्यवाणी करु शकत नाही. मात्र पुढच्या वर्षी आणखी मजबुतीने परतण्याचा मी प्रयत्न करेल,” असं महेंद्रसिंह धोनी म्हणाला.

हेही वाचा >>> दिग्गज अभिनेता आमिर खानने केली अजब मागणी, म्हणतो IPL मध्ये संधी मिळेल का? रवी शास्त्रींनीही दिलं भन्नाट उत्तर

आपण यावर्षी निवृत्त होणार नसल्याचं धोनीने जाहीर केल्यामुळे तो पुढच्या हंगामातही चेन्नई संघाकडून खेळताना दिसेल, हे आता स्पष्ट झालं आहे. मात्र चेन्नईसाठी हा हंगाम खराब राहिला आहे. हा संघ यावेळी १३ सामन्यांपैकी फक्त ४ सामन्यांत जिंकू शकला आहे. तर या संघाला एकूण ९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Story img Loader