आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन तगड्या संघांमध्ये लढत रंगली आहे. मात्र फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातला सुरुवातीलाच मोठा झटका बसला. राजस्थानच्या रासी व्हॅन डर ड्यूसेनने चेंडू स्टंपवर डायरेक्ट हीट केल्यामुळे सलामीवर मॅथ्यू वेड धावबाद झाला आहे. गुजरातच्या अवघ्या १२ धावा झालेल्या असताना मॅथ्यू हेडच्या रुपात गुजरातला हा पहिला झटका बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘गॉड ऑफ क्रिकेट’ची जादू कायम! भर मैदानात पंजाबच्या कोचने सचिनचे धरले पाय, पाहा नेमकं काय घडलं?

नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीला आलेल्या शुभमन गिल आणि मॅथ्यू हेड या जोडीने गुजरात टायटन्ससाठी धावा जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. कारण दुसऱ्याच षटकामध्ये रासी व्हॅन डर ड्यूसेनने चेंडू स्टंप्सवर डायरेक्ट हीट केल्यामुळे मॅथ्यू हेडला धावबाद व्हावे लागले. मॅथ्यू हेडने सहा चेंडूंमध्ये तीन चौकार लगावत १२ दावा केल्या. रासी व्हॅन डर ड्यूसेनने क्षणाचाही विलंब न करता चेंडू थेट स्टंप्सवर मारल्यामुळे मोठी धाव घेऊनही मॅथ्यू हेड बाद झाला.

हेही वाचा >>> IPL 2022 : ‘बेबी एबी’ची तुफानी फलंदाजी पाहून रोहित शर्मा झाला प्रभावित, मैदानावर येऊन…

दरम्यान, गुजरात आणि राजस्थान हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. सध्या राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे. तर गुजरात टायटन्स हा पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे राजस्थान पहिल्या क्रमांकावर कायम राहण्यासाठी तर गुजरात टायटन्स गुणतालिकेत वरचा क्रमांक गाठण्यासाठी प्रयत्नरत आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matthew wade run out by rassie van der dussen direct hit in rrvsgt in ipl 2022 prd