आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६७ वी लढत चांगलीच रोमहर्षक होत आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहायचे असेल तर या सामन्यात बंगळुरु संघाला विजय अनिवार्य आहे. याच कारणामुळे बंगळुरुचे खेळाडू आक्रमकपणे खेळताना दिसत आहेत. तर दुसरीकडे विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी गुजरात टायटन्स संघदेखील टिच्चून फलंदाजी केली. दरम्यान गुजरात संघाचा फलंदाज मॅथ्यू वेड बाद झाल्यानंतर चांगलाच चिडल्याचे दिसले. त्याने ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट फेकून तसेच बॅट आदळून आपला राग व्यक्त केलाय.

हेही वाचा >>> अफलातून ग्लेन मॅक्सवेल! एका हाताने टिपला भन्नाट झेल; शुभमन गिल अवघी १ धाव करुन तंबुत परतला

चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे मॅथ्यू वेडचे मत

गुजरातच्या २१ धावा झालेल्या असताना शुभमन गिल झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला मॅथ्यू वेड आक्रमकपणे खेळत होता. मात्र ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर १६ धावांवर असताना तो पायचित झाला. बंगळुरुच्या खेळाडूंनी अपिल केल्यानंतर त्याला पंचाने बाद दिले. त्यानंतर लगेच आक्षेप घेत मॅथ्यू वेडने डीआरएस घेतला. मात्र रिव्ह्यूमध्ये तो पायचित झाल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा >>> रिंकू सिंहने सांगितली कठीण काळातील आठवण, म्हणाला ‘वडील २-३ दिवस जेवले नव्हते,’ कारण…

पंचाच्या या निर्णयावर मॅथ्यू वेड असमाधानी दिसला. आपल्याला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे मत व्यक्त करत मॅथ्यूने मैदानावरच रोष व्यक्त केला. विराट कोहलीने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फायदा झाला नाही. ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर मॅथ्यू वेडने आपला राग काढला. त्याने ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट फेकून दिले. तसेच त्याने खुर्चीवर जोरजोरात बॅट आदळली.

हेही वाचा >>>बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय, आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या वेळेत बदल; ‘हे’ आहे कारण

दरम्यान, आज गुजरात संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाच्या ६२ धावा होईपर्यंत तीन गडी बाद झाले होते. शुभमम गिल अवघी एक धाव करु शकला. तर वृद्धीमान साहाने ३१ धावा केल्या. मॅथ्यू वेडला फक्त १६ धावा करता आल्या.

Story img Loader