आयपीएलच्या १५ व्या हंगामातील २८ व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये सामना खेळवला जातोय. हा सामना अटीतटीचा होत असून आजच्या सामन्यासाठी पंजाब संघामध्ये मोठा बदल झालेला आहे. पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल आज सामन्याबाहेर असून त्याच्या जागेवर प्रभसिमरन याला संघात सामाविष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मयंक अग्रवाल आज सामन्यामध्ये खेळणार नसल्यामुळे संघाचा गब्बर खेळाडू म्हणून ओळख असलेल्या शिखर धवनकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

हेही वाचा >> IPL 2022 : बाद होताच त्रागा! मुंबईच्या इशन किशनने भर मैदानात काढला राग, कारवाई होणार ?

आजच्या सामन्याआधी सराव करताना पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल जखमी झाला होता. त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखपात झालेली आहे. त्यामुळे तो आजच्या सामन्यामध्ये खेळू शकलेला नाही. याच कारणामुळे पंजाबचे कर्णधारपद पंजाबचा गब्बर खेळाडू म्हणून ओळख असलेल्या शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. शिखर धवन हा हंगामी कर्णधार असेल. मयंक अग्रवाल परत येताच तो कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

हेही वाचा >> आरसीबीच्या दिनेश कार्तिकचं मोठं स्वप्न, म्हणतो “भारताला टी-२० विश्वचषक…”

पंजाबच्या मयंक अग्रवालने याआधी मुंबईविरोधातील सामन्यात तुफान फटकेबाजी केली होती. पंजाबने या सामन्यात मुंबईसमोर १९८ धावांचा डोंगर उभा केला होता. तर मुंबईला फक्त १८६ धावा करता आल्या होत्या. पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल याने सलामीला येत ३२ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दोन षटकार यांच्या मदतीने अर्धशतकी खेळी केली होती. त्याने ५३ धावा केल्या होत्या. तो पुढच्या सामन्यात तंदुरुस्त होऊन कर्णधारपद पुन्हा एकदा सांभाळेल असं शिखर धवनने सांगितलं आहे.

Story img Loader