Mayank Markande vs Andre Russell : सनरायझर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या रंगतदार सामन्यात अखेर केकेआरने बाजी मारली. गुरुवारी झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात कोलकाताने हैद्राबादचा ५ धावांनी पराभव केला. केकेआरचा कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनी ६१ धावांची भागिदारी केली अन् केकेआरने २० षटकांत १७१ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर प्रत्युत्तरात केकेआरच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून सनरायझर्सला २० षटकांत १६६ धावांवर रोखलं. वरुण चक्रवर्तीने शेवटच्या षटकात ९ धावा वाचवल्या आणि केकेआरला शानदार विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात चक्रवर्तीने फक्त ३ धावा दिल्या.
या सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला. मयंक मारकंडेनं अप्रतिम गोलंदाजी करून धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेलला बाद केलं. मारकंडेनं फिरकीची जादू दाखवत रसेलला मोठा फटका मारण्यास भाग पाडलं. ज्यामुळे रसेलने १५ चेंडूत २ षटकार आणि एक चौकाराच्या मदतीनं २४ धावा केल्या. नटराजनने रसेलचा झेल पकडून केकेआरला मोठा धक्का दिला.
इथे पाहा व्हिडीओ
रसेल बाद झाल्यानंतर स्वत:शीच नाराज होता. कारण मारकंडेनं त्याला फिरकीच्या सापळ्यात अडकवल्याचं माहित झालं. रसेल बाद झाला तेव्हा रवी शास्त्री कॉमेंट्री करत होते. शास्त्रीने कॉमेंट्री करत म्हटलं, बिशन सिंग बेदी, इरापल्ली (प्रसन्ना)ला इथं पाहून आनंद झाला असेल. या सामन्यात मयंक मारकंडेनं ४ षटकात २९ धावा देऊन १ विकेट घेतली. सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने १५ चेंडूत २४ धावांची खेळी केली. या इनिंगमध्ये रसेलनं २ षटकार आणि चौकार मारला. रसेलने मोठी खेळी केली नाही, परंतु, टी-२० क्रिकेटमध्ये मोठा धमाका केला आहे. रसेलने टी-२० क्रिकेटमध्ये ६०० षटकार ठोकण्याची चमकदार कामगिरी केली आहे.