IPL 2025 DC vs MI Highlights in Marathi: मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मधील मोठ्या थरारक विजयाची नोंद केली. १९व्या षटकातील अखेरच्या ३ चेंडूवर ३ विकेट घेत दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव करत थरारक विजय नोंदवला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सच्या विजयी घोडदौडीला पूर्णविराम लावला आहे. यासह दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या मोसमातील पहिला पराभव पत्करावा लागला आहे.

चॅम्पियन मुंबई इंडियन्ससमोर आजवर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने कधीच २०० अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केलेला नाही आणि मुंबईने हा विक्रम कायम ठेवला. मुंबई इंडियन्सच्या या विजयात सर्वच खेळाडूंनी मोलाचं योगदान दिलं.

अखेरच्या दोन षटकात दिल्लीला विजयासाठी १२ चेंडूत २३ धावांची गरज होती. बुमहराहकडे चेंडू सोपवण्यात आला होता. पहिल्या चेंडूवर आशुतोष शर्माने एक धाव घेण्यास नकार दिला. पुढच्या दोन चेंडूवर आशुतोषने चौकार लगावले. चौथ्या चेंडूवर दोन धाव घेण्याच्या नादात आशुतोष शर्मा धावबाद झाला. पाचव्या चेंडूवर कुलदीप यादव धाव चोरण्याच्या नादात धावबाद झाला. तर सहाव्या चेंडूवर सँटनरने डायरेक्ट थ्रो करत मोहित शर्मा धावबाद झाला आणि मुंबई इंडियन्सने १२ धावांनी सामना जिंकला.

मुंबई इंडियन्सने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात गडबडली आणि दीपक चहरने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आणि संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण यानंतर करूण नायर आणि अभिषेक नायर यांनी वादळी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. १५ व्या षटकापर्यंत दिल्लीचा संघ जिंकण्याच्या स्थितीत असल्याचे दिसत होते. पण शेवटच्या ४ षटकांत दिल्लीच्या फलंदाजांनी बेजबाबदार फटके खेळून मुंबईला पुनरागमनाची संधी दिली आणि नंतर सामना गमावला.

करूण नायरने वादळी फलंदाजी करत मुंबईच्या सर्व गोलंदाजांची धुलाई केली. करूण नायरने ४० चेंडूत १२ चौकार आणि ५ षटकारांसह ८९ धावांची वादळी खेळी केली. तर अभिषेक पोरेले २५ चेंडूत ३३ धावांची खेळी करत करूणला चांगली साथ दिली. पण कर्ण शर्माने अभिषेक पोरेलला बाद करत दिल्लीला धक्का दिला. त्यानंतर दिल्लीचे इतर सर्व फलंदाज फेल ठरले आणि मुंबईने चॅम्पियनसारखी कामगिरी करत दणक्यात पुनरागमन केले. मुंबई इंडियन्सकडून कर्ण शर्माने ३ विकेट्स घेतले. तर सँटनरने २ तर दीपक चहर आणि बुमराहने १-१ विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक गमावत फलंदाजी केली आणि २०५ धावांचा डोंगर उभारला. तिलक वर्माने आणखी एक जलद अर्धशतक झळकावले तर नमन धीरने पुन्हा एकदा शेवटच्या षटकांमध्ये काही धावा काढल्या. दोघांनी मिळून फक्त ३३ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. यापूर्वी रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने संघाला चांगली सुरूवात करून दिली. रोहित शर्माने १७ धावा केल्या, तर रिकल्टन ४१ धावा करत बाद झाला. तर सूर्यकुमार यादवने आपल्या विस्फोटक शैलीत ४० धावांची खेळी केली.तर नमन धीरने ३८ धावा आणि तिलक वर्माे ५९ धावा केल्या.