IPL 2025 Mumbai Indians Full Squad and Schedule: आयपीएलच्या इतिहासात सर्वप्रथम पाच ट्रॉफी जिंकत एक यशस्वी संघ म्हणून आपली ओळख तयार करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा यंदाचा संघ योग्य ताळमेळ असलेला दिसत आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल लिलावात उत्कृष्ट गोलंदाजी युनिट तयार केलं. मुंबई इंडियन्सची गोलंदाजी बाजू चांगलीच भक्कम झाली आहे. मुंबईने लिलावात ट्रेंट बोल्ट, दीपक चहरसारख्या वेगवान गोलंदाजांना संघात घेतलं. या दोघांच्या जोडीला जगातील उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असलेला बुमराह जोडीला असणार आहे. आयपीएल २०२५ साठी मुंबई इंडियन्सचा संघ कसा आहे जाणून घेऊया.
मुंबई संघाने आयपीएलपूर्वी संघातील पाच मुख्य खेळाडूंना रिटेन केलं. यामध्ये कर्णधार हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. मुंबई संघाने जसप्रीत बुमराहला १८ कोटींच्या सर्वाधिक किंमतीसह संघात कायम ठेवलं आहे. यासह मुंबईने लिलावात मोठी चतुराईने खरेदी केली. मुंबईने रिटेन केलेल्या पाचही खेळाडूंनी भारताच्या राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे.
आयपीएल २०२५ साठी कसा आहे मुंबई इंडियन्सचा संघ?
मुंबई इंडियन्सची फलंदाजी फळी उत्कृष्ट असणार आहे. यामध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या असतील. ट्रेंट बोल्टच्या रुपात डावखुरा वेगवान गोलंदाज ताफ्यात सामील केला. बोल्टसाठी मुंबईला १२.५० कोटी रुपये मोजावे लागले. काही वर्षांपूर्वी बोल्ट मुंबईकडेच होता. वानखेडेवर बुमराह आणि बोल्ट यांना पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणी असेल. याशिवाय मुंबई इंडियन्सने चेन्नईच्या ताफ्यातील वेगवान गोलंदाज दीपक चहरसाठी मोठी बोली लावली. मुंबईने चहरला ९.२५ कोटींना संघात सामील केलं आहे. तर अफगाणिस्तानचा फिरकीपटू गझनफरला ४.८० कोटींना खरेदी केलं, पण गझनफर दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. अफगाणिस्तानच्या मुजीब रहमानला बदली खेळाडू म्हणून संघात सामील केलं आहे.
???????? ????? ????? ??????? ?#MumbaiIndians #PlayLikeMumbai pic.twitter.com/iXTcvfW6TV
— Mumbai Indians (@mipaltan) March 17, 2025
याशिवाय मुंबई इंडियसन्स संघात आफ्रिकेचा रायन रिकल्टन खेळाडूही यंदा दिसणार आहे. जो यष्टीरक्षक फलंदाज आहे. याशिवाय आरसीबीच्या ताफ्यात असलेला विल जॅक्सही संगात दिसणार आहे. तर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरलाही मुंबईने लिलावात ताफ्यात सामील केलं आहे. तर गोलंदाज रीस टोप्लेलाही मुंबईने ताफ्यात सामील केलं आहे. तर मिचेल सँटनरच्या रूपात मुंबईकडे एक उत्कृष्ट फिरकीपटू आहे.
मुंबईच्या ताफ्यातील रिटेन केलेले खेळाडू आणि किंमती
जसप्रीत बुमराह -१८ कोटी
रोहित शर्मा – १६.३० कोटी
सूर्यकुमार यादव – १६.३५ कोटी
हार्दिक पंड्या – १६.३५ कोटी
तिलक वर्मा – ८ कोटी
मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२५ साठी संपूर्ण संघ (Mumbai Indians IPL 2025 Full Squad)
हार्दिक पंड्या (कर्णधार) जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा , रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपले, कृष्णन श्रीजीथ, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, कार्बिन बॉश, विघ्नेश पुथूर
मुंबई इंडियन्स आयपीएल २०२५ चे वेळापत्रक (IPL 2025 Mumbai Indians Match Schedule)
२३ मार्च – चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स
२९ मार्च – गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स
३१ मार्च – मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
४ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स
७ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
१३ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स
१७ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद
२० एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स
२३ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स
२७ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. लखनौ सुपर जायंट्स
१ मे – राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स
६ मे – मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स
११ मे – पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स
१५ मे – मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स