Delhi Capitals vs Mumbai Indians Highlights Score Update:  आयपीएल २०२३ मध्ये मंगळवारी (११ एप्रिल) एक सामना खेळला गेला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियन्स हे संघ एकमेकांशी भिडले. हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी हे दोन्ही संघ प्रयत्नशील होते. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने ६ गडी राखून दोन गुण आपल्या नावे केले. कर्णधार रोहित शर्मा याने अर्धशतक ठोकत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरच्या दोन षटकात मुंबई इंडियन्सने भेदक गोलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सला १९० धावांच्या आता रोखण्यात यश मिळवले. पूर्ण २० षटके देखील दिल्ली खेळू शकली नाही. केवळ १९.४ षटकात १७२ धावा करून सर्वबाद झाली.

पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकत यजमान दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पृथ्वी शॉ आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी दिल्लीची चांगली सुरुवात केली होती. पहिल्या तीन षटकानंतर पृथ्वी शॉ १०चेंडूत १५धावा करून बाद झाला आहे. हृतिक शोकीनने त्याला कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद केले. त्यानंतर आलेला मनिष पांडे देखील फारशी चमक दाखवू शकला नाही. त्याने १८ चेंडूत २६ धावा करत जेसन बेहरेनडॉर्फकरवी पियुष चावलाने बाद केले. मग मात्र येरे माझ्या मागल्या म्हणत दिल्लीची मागील तीन सामन्यातील तिच स्थिती परत झाली. एका बाजूने विकेट्स पडत होते आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर तंबू ठोकून उभा होता. त्याने झुंजार अर्धशतक झळकावले. ९८-५ अशी स्थिती असताना अक्षर पटेल नावाचे वादळ मैदानात आले त्याने चौफेर फटकेबाजी करत केवळ २५ चेंडूत ५४ धावा केल्या. त्यात त्याने ४ चौकार आणि ५ षटकारांचा साज चढवला.

दिल्ली मोठ्या धावसंख्या उभारणार असे वाटत असताना अचानक शेवटच्या दोन षटकात मुंबईने सामना फिरवला. एकवेळेस संघ ९८-५ असा अडचणीत असताना अष्टपैलू अक्षर पटेलने अफलातून अर्धशतक झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. त्यानंतर लागोपाठ तीन विकेट्स पडल्या. डेव्हिड वॉर्नर, कुलदीप यादव आणि अभिषेक तंबूत परतले. मुंबईने जेसन बेहरेनडॉर्फच्या एकाच षटकात दिल्लीला मोठे धक्के दिले. अक्षरने ५४, वॉर्नर ५१, कुलदीप ० तर अभिषेक १ धाव करून बाद झाला. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फ आणि पियुष चावलाने प्रत्येकी ३ विकेट्स तर रिले मेरेडिथने २ आणि ऋतिक शौकीनने एक विकेट त्यांना साथ दिली.

Live Updates

Delhi Capitals vs Mumbai Indians Highlights Match Updates: दिल्ली कॅपिटल्स वि मुंबई इंडियन्स हायलाइट्स क्रिकेट स्कोअर अपडेट्स

23:23 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: मुंबईचा अटीतटीच्या सामन्यात सहा गडी राखून विजय

मुंबईचा अटीतटीच्या सामन्यात दिल्लीवर सहा गडी राखून विजय मिळवला.

मुंबई इंडियन्स १७३-४

23:08 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: ९ चेंडूत १८ धावांची गरज

मुंबईला शेवटच्या काही चेंडूत मोठ्या फटक्यांची गरज आहे.

मुंबई इंडियन्स ९ चेंडूत १८ धावांची गरज

मुंबई इंडियन्स १५५-४

23:03 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: दिल्लीला मोठा धक्का, रोहित शर्मा बाद; सामना रोमांचक स्थितीत

मागील दोन षटकात दिल्लीने भेदक गोलंदाजी करत मुंबईला तीन धक्के दिले. कर्णधार रोहित शर्मा जो एकमेव फलंदाज होता जो सध्या सेट होता. त्याच्या बाद होण्याने सामना रोमांचक झाला आहे. रोहितने ४५ चेंडूत ६५ धावा केल्या.

मुंबई इंडियन्स १४३-४

22:54 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: विजयाच्या उंबरठ्यावर असताना मुंबईला सलग दोन धक्के

विजयाच्या उंबरठ्यावर असताना मुंबईला दुसरा धक्का बसला. तिलक वर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात तो २९ चेंडूत ४१ धावा करत मनीष पांडेकरवी झेलबाद झाला. त्यापाठोपाठ फॉर्म मध्ये नसलेला सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारत भोपळाही न फोडता बाद झाला. दोघांना एकाच षटकात मुकेश शर्माने बाद करून सामना रोमांचक केला.

मुंबई इंडियन्स १३९-३

https://twitter.com/IPL/status/1645839428190093313?s=20

22:28 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: रोहित शर्माचे शानदार अर्धशतक

११ षटके खेळल्यानंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या एका विकेटवर १०० पुढे नेली आहे त्याचवेळी त्यांच्यासोबत तिलक वर्मा चांगली साथ देत आहे. दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली आहे. दिल्लीला हा सामना फक्त एक चमत्कारच विजयी करू शकतो.

मुंबई इंडियन्स ११३-१

https://twitter.com/IPL/status/1645833276689637377?s=20

22:08 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, इशान किशन बाद

१७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्मा आणि ईशान किशन चांगल्या टचमध्ये दिसत होते. दोघांमध्ये ७१ धावांची भक्कम अर्धशतकी भागीदारी झाली. चुकीचा कॉल करत रोहित शर्माने इशान किशनला धावबाद केले. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार मारत २६ चेंडूत ३१ धावा केल्या.

मुंबई इंडियन्स ७१-१

https://twitter.com/IPL/status/1645827940591230976?s=20

21:56 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: पॉवर प्ले मध्ये मुंबईची दमदार सुरुवात

पॉवर प्ले मध्ये मुंबईने दमदार सुरुवात केली असून कर्णधार रोहित आणि सलामीवीर इशान यांच्यात अवघ्या २६ चेंडूत ५० धावांची भागीदारी झाली आहे. जर याप्रकारे हे दोन्ही खेळाडू खेळत राहिले तर मुंबईला विजयापासून रोखणे दिल्लीसाठी अवघड होईल.

मुंबई इंडियन्स ६८-०

https://twitter.com/IPL/status/1645825678988947457?s=20

21:39 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: १७३ धावांचा पाठलाग करताना मुंबईची चांगली सुरुवात

कर्णधार रोहित शर्माने पहिल्याच षटकात २ चौकार आणि एक षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. तर त्याचा साथीदार सलामीवीर इशान किशनने देखील दुसऱ्या बाजूने फटकेबाजी करत एकाच षटकात सलग ३ चौकार मारले.

मुंबई इंडियन्स २७-०

21:17 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: मुंबईला विजयासाठी १७३ धावांचे आव्हान

अखेरच्या दोन षटकात मुंबई इंडियन्सने भेदक गोलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सला १९० धावांच्या आता रोखण्यात यश मिळवले. पूर्ण २० षटके देखील दिल्ली खेळू शकली नाही. केवळ १९.४ षटकात १७२ धावा करून सर्वबाद झाली.

दिल्ली कॅपिटल्स १७२-सर्वबाद

21:12 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: दमदार फटकेबाजीनंतर अक्षर-वॉर्नर तंबूत

एकवेळेस संघ ९८-५ असा अडचणीत असताना अष्टपैलू अक्षर पटेलने अफलातून अर्धशतक झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. त्यानंतर लागोपाठ तीन विकेट्स पडल्या. डेव्हिड वॉर्नर, कुलदीप यादव आणि अभिषेक तंबूत परतले. मुंबईने जेसन बेहरेनडॉर्फच्या एकाच षटकात दिल्लीला मोठे धक्के दिले. अक्षरने ५४, वॉर्नर ५१, कुलदीप ० तर अभिषेक १ धाव करून बाद झाला.

दिल्ली कॅपिटल्स १६६-९

20:59 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: अक्षर पटेलचा झेल पकडताना सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त

अक्षर पटेलचा लॉंग ऑनला झेल पकडताना मुंबईचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या डाव्या डोळ्याला चेंडू जोरात वेगाने आला. त्यामुळे त्याला तो पकडताना आला नाही आणि दोन्ही हाताच्या मधून तो थेट डोळ्यावर लागला. सध्या तो मैदानातून बाहेर गेला आहे. दुसऱ्या बाजूला अक्षर पटेल अर्धशतकाच्या जवळ पोहचला आहे.

दिल्ली कॅपिटल्स १५७-५

https://twitter.com/IPL/status/1645810846050975747?s=20

20:50 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: डेव्हिड वॉर्नरचे झुंझार अर्धशतक! अक्षर पटेलची येताच शानदार फटकेबाजी

दिल्लीचा निम्मा संघ ९८ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पियुष चावलाने ललित यादवला बाद करून मुंबईला पाचवे यश मिळवून दिले. या सामन्यातील त्याची ही तिसरी विकेट आहे. चार चेंडूत दोन धावा केल्यानंतर ललित यादव गोलंदाजीवर आला. त्यानंतर आलेल्या बापू अशी ओळख असणाऱ्या अक्षर पटेलने चौफेर फटकेबाजीला सुरुवात केली. वॉर्नरने त्याचे अर्धशतक पूर्ण केले.

दिल्ली कॅपिटल्स १३६-५

https://twitter.com/IPL/status/1645808707551531009?s=20

20:36 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: दिल्लीचा निम्मा संघ तंबूत, ललित यादव बाद

दिल्लीच्या प्रत्येक सामन्यात एका बाजूने कर्णधार डेव्हिड वॉर्नर तंबू ठोकून उभा असतो. मात्र त्याला साथ द्यायला एकही फलंदाज नसतो तेच आजच्या सामन्यात होत आहे. पियुष चावलाच्या शानदार फिरकीच्या जोरावर मुंबईने सामन्यावर पकड बनवली आहे. त्याने ललित यादवला त्रिफळाचीत करत अवघ्या २ धावांवर बाद केले.

दिल्ली कॅपिटल्स ९८-५

https://twitter.com/IPL/status/1645804569765765123?s=20

20:26 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: दिल्ली कॅपिटल्सला चोथा धक्का, रोवमन पॉवेल बाद

कर्णधार वॉर्नरला साथ द्यायला एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकेना अशी परिस्थिती सध्या दिल्लीची झाली आहे. पियुष चावलाच्या षटकात त्याने रोवमन पॉवेलला पायचीत करून अवघ्या ४ धावांवर तंबूत पाठवले.

दिल्ली कॅपिटल्स ८६-४

https://twitter.com/IPL/status/1645802182737031170?s=20

20:22 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का, यश धुल बाद

यश धुलला आजच्या सामन्यात पदार्पणाची संधी देण्यात आली होती. मात्र या संधीचा तो फायदा उठवू शकला नाही. जेसन बेहरेनडॉर्फच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात नेहल वढेराकरवी झेलबाद झाला. त्याने केवळ २ धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्स ८१-३

https://twitter.com/IPL/status/1645800822247428101?s=20

20:15 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का, मनीष पांडे बाद

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले असून आतापर्यंत कॅपिटल्सच्या दोन विकेट्स पडल्या आहेत. मनीष पांडेने १८ चेंडूत २६ धावा करून तो बाद झाला. त्याला जेसन बेहरेनडॉर्फकरवी पियुष चावलाने बाद केले.

दिल्ली कॅपिटल्स ७६-२

https://twitter.com/IPL/status/1645799134493028354?s=20

20:08 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: फ्री हिटवर डेव्हिड वॉर्नर झाला उजव्या हाताचा फलंदाज

डेव्हिड वॉर्नर हा डावखुरा फलंदाज असून ऋतिक शोकीनच्या षटकात त्याने एक नो-बॉल टाकला. त्यानंतरच्या नो-बॉलवर वॉर्नरने उजव्या हाताच्या फलंदाजाचा स्टान्स घेत तो फटका मारला, मात्र यावर तो एक धाव काढू शकला. यावर चाहत्यांनी देखील एकच जल्लोष केला.

दिल्ली कॅपिटल्स ७५-१

https://twitter.com/sexycricketshot/status/1645798069131427843?t=DKXlsmX_NeSSJoLoLQCYoQ&s=08

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1645797687613349888?t=JFuK7DB3pPzyoLcWJzhiIw&s=08

20:00 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: पॉवर-प्ले मध्ये दिल्ली कॅपिटल्सची चांगली सुरुवात

पॉवर-प्ले मध्ये दिल्ली कॅपिटल्सची चांगली सुरुवात झाली आहे. पृथ्वी शॉ जरी बाद झालेला असला तरी देखील कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे या दोघांनी दिल्लीचा डाव सावरला आहे. संघाचे अर्धशतक पूर्ण केले होते.

दिल्ली कॅपिटल्स ५१-१

https://twitter.com/IPL/status/1645795382566453248?s=20

19:51 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का, पृथ्वी शॉ बाद

पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने दिल्ली कॅपिटल्सला चांगली सुरुवात करून दिली होती. दोन्ही फलंदाज वेगाने धावा करत होते. अचानक मोठा फटका मारण्याच्या नादात दिल्ली संघाची पहिली विकेट ३३ धावांच्या स्कोअरवर पडली. पृथ्वी शॉ १०चेंडूत १५धावा करून बाद झाला आहे. हृतिक शोकीनने त्याला कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद केले.

दिल्ली कॅपिटल्स ३३-१

https://twitter.com/IPL/status/1645792845931106306?s=20

19:40 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची चांगली सुरुवात

दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी सुरू झाली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ ही सलामीची जोडी क्रीझवर आहे. दोघेही चांगल्या लयीत दिसत आहेत. मुंबईसाठी जेसन बेहरेनडॉर्फने पहिले षटक केले. दोघांनीही डावाची चांगली सुरुवात केली आहे.

दिल्ली कॅपिटल्स २०-०

19:29 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: दोन्ही संघांची प्लेईंग-११

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, ऑनरिक नॉर्खिया, मुस्तफिझूर रहमान.

इम्पॅक्ट प्लेयर: मुकेश कुमार, अमन खान, सरफराज खान, प्रवीण दुबे, इशांत शर्मा.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, रिले मेरेडिथ, अर्शद खान, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ.

इम्पॅक्ट प्लेयर: ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, कार्तिकेय सिंग, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंग.

19:15 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: जोफ्रा आर्चर नाही खेळणार आजचा सामना

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जोफ्रा आर्चर मुंबईकडून हा सामनाही खेळत नाही. त्याचबरोबर ट्रिस्टन स्टब्सच्या जागी रिले मेरेडिथला संधी देण्यात आली आहे.

https://twitter.com/IPL/status/1645783342590357506?s=20

19:14 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: दिल्ली कॅपिटल्सने यश धुलला दिली पदार्पणाची संधी

दिल्ली संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त खलील अहमदच्या जागी मुस्तफिझूर रहमानचा संघात समावेश करण्यात आला असून रिले रुसोच्या जागी यश धुलला संधी देण्यात आली आहे.

https://twitter.com/IPL/status/1645783943789318145?s=20

https://twitter.com/IPL/status/1645783964928589827?s=20

19:05 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: मुंबई इंडियन्सने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने दव फॅक्टरचा किती परिणाम होईल यावर त्याने हा निर्णय घेतला आहे.

https://twitter.com/IPL/status/1645781840530378752?s=20

18:26 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: पृथ्वी, सरफराजचा फॉर्म चिंतेचा विषय आहे

मार्शच्या अनुपस्थितीत अनुभवी मनीष पांडेला शेवटच्या सामन्यात संधी मिळाली, पण तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. शॉ आणि सरफराजचे स्विंग आणि वेगवान चेंडू आतापर्यंत समोर आले आहेत. विशेषतः शॉ दिल्लीला त्याच्या ओळखीच्या शैलीत सुरुवात करून देऊ शकला नाही. बाऊन्स, स्विंग आणि पेस या तिन्ही गोष्टींमुळे तो हैराण झाला आहे.

मैदानाबाहेर सतत वादात राहणाऱ्या पृथ्वीसाठी येथे यश मिळणेही त्याच्या टीम इंडियातील दावेदारीसाठी महत्त्वाचे आहे. त्याचवेळी, कोटला येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात सरफराजने ३० धावा निश्चित केल्या होत्या, परंतु गुजरातच्या अल्झारी जोसेफने उसळत्या चेंडूंवर त्याला खूप त्रास दिला. वॉर्नरने निश्चितपणे दोन अर्धशतके झळकावली आहेत, परंतु त्याचा स्ट्राइक रेड ११७ आहे. त्यांना अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील.

https://twitter.com/DelhiCapitals/status/1645766159030165506?s=20

18:23 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग-११

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्शद खान, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय.

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, फिलिप सॉल्ट/रिले रुसो, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, अमन हकीम खान/कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, लुंगी अँगिडी, ऑनरिक नॉर्खिया

https://twitter.com/IPL/status/1645766427591299072?s=20

18:13 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: फिरोजशाह कोटलाची खेळपट्टी काय रंग दाखवणार? कसे असेल हवामान?

MI vs DC Weather Forecast/ MI vs DC Weather Updates:

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना चांगली साथ देते आणि त्यावर चेंडू थेट फलंदाजाच्या बॅटवर येतो. त्यामुळे खेळाडू सहज मोठे फटके खेळूू शकतात. त्याच वेळी, सामन्यादरम्यान नाणेफेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि बहुतेक संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देतात. दुसरीकडे, शेवटच्या सामन्याबद्दल बोलायचे तर, येथे गुजरातविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने ८ गडी गमावून १६२ धावा केल्या, ज्या गुजरातने सहज गाठल्या आणि सामना जिंकला.

हवामान अंदाज

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून दिवसा कडक सूर्यप्रकाशासह उष्णतेची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे, या सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार नाही. संपूर्ण सामना कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे दिल्लीत आर्द्रता १८ टक्के राहणार आहे. त्याचवेळी २१ किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

18:08 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: ऑनरिक नॉर्खियावर दिल्ली कॅपिटल्सची मदार

गेल्या सामन्यात दुखापत झालेला खलील या सामन्यात खेळेल याची खात्री नाही, पण तोही फॉर्मात नाही. भरघोस रकमेत विकत घेतलेल्या मुकेश कुमारने तीन सामन्यांत चार बळी घेतले असले तरी ते महागडे ठरले आहेत. नॉर्खियाकडे आश्चर्यकारक गती आहे, परंतु त्याचा एक्स फॅक्टर अद्याप दिसला नाही. त्याचबरोबर कुलदीप यादव महागडा ठरला नसला तरी त्याने त्याच्या पातळीनुसार कामगिरीही केलेली नाही. कोटलाच्या खेळपट्टीवर वॉर्नरने अक्षर पटेलला गोलंदाजी करण्याची संधी दिली नाही. तो बॅटने चांगली कामगिरी करत आहे, पण त्याला चेंडूवरही आपली योग्यता सिद्ध करावी लागेल.

https://twitter.com/DelhiCapitals/status/1645766155729256448?s=20

18:02 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघात होणार बदल- रिकी पाँटिंग

राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही आता बदल करावे लागतील, जे खेळाडू जिंकण्याची जबाबदारी पार पाडतील त्यांना संधी द्यावी लागेल, असे म्हटले आहे. मंगळवारी दिल्लीच्या संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. गेल्या सामन्यात दिल्लीच्या खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना मदत केली. यावेळीही तेच होणे अपेक्षित आहे.

https://twitter.com/DelhiCapitals/status/1645751045912686594?s=20

17:50 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: आजच्या सामन्यात जोफ्रा आर्चर खेळण्याची शक्यता

मुंबई आयपीएलमध्ये संथ सुरुवातीसाठी ओळखली जाते. त्यांच्याकडे कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, इशान किशन असे खेळाडू आहेत, हे चौघेही आतापर्यंत गेल्या दोन सामन्यांमध्ये छाप पाडू शकलेले नाहीत. गेल्या सामन्यात रोहितला तुषार देशपांडने एका चांगल्या चेंडूवर बाद केले. मुंबईला येथे चांगली कामगिरी करायची असेल तर रोहितला आपल्या बॅटने अप्रतिम कामगिरी करावी लागेल. त्याचबरोबर इशानच्या बॅटनेही अजून मोठी इनिंग बाहेर आलेली नाही.

अत्यंत महागड्या कॅमेरून ग्रीनने बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत आपल्या कामगिरीची झलकही दाखवलेली नाही. सूर्यकुमार फॉर्ममध्ये नसणे ही मुंबईसाठी चिंतेची बाब आहे. वरचा क्रम चालला नाही तर मुंबईला सूर्याचा आधार आहे, जो सध्या मिळत नाही. जोफ्रा आर्चर या सामन्यात असू शकतो. कॅमेरून ग्रीनने सामन्याच्या एक दिवस आधी सांगितले की, संघातील सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत. त्यामुळे या सामन्यात आर्चरचा प्रवेश होईल, असे मुंबईच्या चाहत्यांना वाटत आहे.

Mumbai Indians vs Delhi Capitals Live Match Updates

दिल्ली कॅपिटल्स वि मुंबई इंडियन्स लाइव्ह क्रिकेट स्कोअर

Delhi Capitals vs Mumbai Indians Highlights Match Updates: दिल्ली कॅपिटल्स वि मुंबई इंडियन्स हायलाइट्स क्रिकेट स्कोअर अपडेट्स

अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने ६ गडी राखून दोन गुण आपल्या नावे केले. कर्णधार रोहित शर्मा याने अर्धशतक ठोकत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Story img Loader