Delhi Capitals vs Mumbai Indians Highlights Score Update:  आयपीएल २०२३ मध्ये मंगळवारी (११ एप्रिल) एक सामना खेळला गेला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियन्स हे संघ एकमेकांशी भिडले. हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी हे दोन्ही संघ प्रयत्नशील होते. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने ६ गडी राखून दोन गुण आपल्या नावे केले. कर्णधार रोहित शर्मा याने अर्धशतक ठोकत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरच्या दोन षटकात मुंबई इंडियन्सने भेदक गोलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सला १९० धावांच्या आता रोखण्यात यश मिळवले. पूर्ण २० षटके देखील दिल्ली खेळू शकली नाही. केवळ १९.४ षटकात १७२ धावा करून सर्वबाद झाली.

पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकत यजमान दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पृथ्वी शॉ आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी दिल्लीची चांगली सुरुवात केली होती. पहिल्या तीन षटकानंतर पृथ्वी शॉ १०चेंडूत १५धावा करून बाद झाला आहे. हृतिक शोकीनने त्याला कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद केले. त्यानंतर आलेला मनिष पांडे देखील फारशी चमक दाखवू शकला नाही. त्याने १८ चेंडूत २६ धावा करत जेसन बेहरेनडॉर्फकरवी पियुष चावलाने बाद केले. मग मात्र येरे माझ्या मागल्या म्हणत दिल्लीची मागील तीन सामन्यातील तिच स्थिती परत झाली. एका बाजूने विकेट्स पडत होते आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर तंबू ठोकून उभा होता. त्याने झुंजार अर्धशतक झळकावले. ९८-५ अशी स्थिती असताना अक्षर पटेल नावाचे वादळ मैदानात आले त्याने चौफेर फटकेबाजी करत केवळ २५ चेंडूत ५४ धावा केल्या. त्यात त्याने ४ चौकार आणि ५ षटकारांचा साज चढवला.

दिल्ली मोठ्या धावसंख्या उभारणार असे वाटत असताना अचानक शेवटच्या दोन षटकात मुंबईने सामना फिरवला. एकवेळेस संघ ९८-५ असा अडचणीत असताना अष्टपैलू अक्षर पटेलने अफलातून अर्धशतक झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. त्यानंतर लागोपाठ तीन विकेट्स पडल्या. डेव्हिड वॉर्नर, कुलदीप यादव आणि अभिषेक तंबूत परतले. मुंबईने जेसन बेहरेनडॉर्फच्या एकाच षटकात दिल्लीला मोठे धक्के दिले. अक्षरने ५४, वॉर्नर ५१, कुलदीप ० तर अभिषेक १ धाव करून बाद झाला. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फ आणि पियुष चावलाने प्रत्येकी ३ विकेट्स तर रिले मेरेडिथने २ आणि ऋतिक शौकीनने एक विकेट त्यांना साथ दिली.

Live Updates

Delhi Capitals vs Mumbai Indians Highlights Match Updates: दिल्ली कॅपिटल्स वि मुंबई इंडियन्स हायलाइट्स क्रिकेट स्कोअर अपडेट्स

17:47 (IST) 11 Apr 2023
MIvsDC: मुंबई पलटण आज दिल्ली कॅपिटल्सची दोन हात

दिल्ली आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ गुणतालिकेच्या तळाशी असून दोन्ही संघांना आतापर्यंत आयपीएल २०२३च्या हंगामात एकही विजय नोंदवता आला नाही. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या शोधात असून कोणत्या संघाचे आज खाते उघडणार हे पाहणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स वि मुंबई इंडियन्स लाइव्ह क्रिकेट स्कोअर

अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने ६ गडी राखून दोन गुण आपल्या नावे केले. कर्णधार रोहित शर्मा याने अर्धशतक ठोकत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.