Rohit Sharma and Tilak Verma Video: आयपीएलच्या १६व्या हंगामातील १६व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. मंगळवारी (११ एप्रिल) अरुण जेटली स्टेडियमवरील विजयासह मुंबईने पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडले आहे. मुंबईने शेवटच्या चेंडूवर ६ विकेट्स राखून सामना जिंकला. मुंबईविरुद्धचा पराभव हा दिल्लीचा मोसमातील सलग चौथा पराभव आहे. या सामन्यानंतर रोहित शर्माने तिलक वर्माची आयपीएल टीव्हीसाठी मुलाखत घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने तिलक वर्माशी संवाद साधला. या संवादात रोहितने तिलकला काही महत्त्वाचे आणि काही हलकेफुलके प्रश्न विचारले. रोहितने विचारले की मॅच जिंकल्यानंतर तुला कसे वाटत आहे? यावर तिलक वर्मा म्हणाला की, मला खूप बरे वाटत आहे. मी मागील वर्षापासून तुमच्यासोबत फलंदाजी करण्याच्या संधीच्या शोधात होतो. आज मला तुमच्यासोबत फलंदाजीची संधी मिळाली, हा माझ्यासाठी खूप मोठा दिवस होता. रोहित शर्मा तिलकचे उत्तर ऐकून लाजतो आणि म्हणतो, मित्रा, असे बोलू नकोस.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात १७३ धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि तिलक वर्माने दुसऱ्या विकेटसाठी महत्त्वाची भागीदारी केली. या दोघांनी इशान किशन बाद झाल्यानंतर ६८ धावा जोडल्या. त्यानंतर तिलक वर्मा बाद झाला. त्याने २९ चेंडूत ४१ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने आपल्या खेळीत एक चौकार आणि चार षटकार मारले.मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६५ धावा केल्या. त्याने ४५ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकार मारले.

हेही वाचा – IPL 2023 DC vs MI: “आम्ही येथे एक कसोटी सामना…”; पहिल्या विजयानंतर रोहित शर्माची प्रामाणिक प्रतिक्रिया

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने सर्व १० गडी गमावून १७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने शेवटच्या चेंडूवर ४ गडी गमावून विजय मिळवला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६५ धावा केल्या. इशान किशनने ३१ धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने दोन आणि मुस्तफिजुर रहमानने एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mi vs dc tilak verma said that it is a big day for me to get a chance to bat with you rohit blushed vbm
Show comments