IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Highlights: आयपीएलमधील आजचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात कोलकातावर मुंबईने २४ धावांनी सहज विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचे फलंदाज केवळ १४५ धावा करत ऑल आऊट झाले. सूर्याने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर मिचेल स्टार्कने पुनरागमन करत ४ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. तर केकेआरकडून केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने ७० धावा आणि मनीष पांडेने ४२ धावांचे योगदान दिले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ६२ चेंडूत ८३ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. मुंबईच्या गोलंदाजांची चांगली कामगिरी विफल ठरली. मुंबईकडून तुषारा आणि बुमराहने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Live Score, IPL 2024 : मुंबई इंडियन्सला केकेआरविरूद्ध मोठ्या लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. केकेआऱने मुंबईच्या घरच्या मैदानावर १७० धावांच्या लक्ष्याचा बचाव केला.
केकेआरने दिलेल्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ केवळ १४५ धावाच करू शकला आणि केकेआरच्या गोलंदाजीवर ऑल आऊट झाला. चांगली भागीदारी न रचल्याचा फटका मुंबईला बसला. अशारितीने २४ धावांनी केकेआरने वानखेडेवर मोठा विजय मिळवला. सूर्याच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने १०० धावांचा पल्ला गाठला आहे.
१९व्या षटकात स्टार्कने तीन विकेट्स मिळवत मुंबईला ऑल आऊट केले. स्टार्कने षटकातील दुसऱ्या चेंडूवर टीम डेव्हिडला झेलबाद केले. तर तिसऱ्या चेंडूवर चावलाला गोल्डन डकवर बाद केले. मिचेल स्टार्कने वानखेडेवर जेराल्ड कोएत्झीला क्लीन बोल्ड करत केकेआरसाठी इतिहास रचला. या विजयासह KKR ने १२ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सचा त्यांच्याच मैदानात पराभव केला आहे.
आंद्रे रसेलने सूर्याला झेलबाद करत केकेआरला मोठी विकेट मिळवून दिली. १६ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सूर्याच्या बॅटला कड लागून चेंडू हवेत उंच गेला, ज्याचा सॉल्टने सहज झेल टिपला. ३५ चेंडूत सूर्याने २ षटकार आणि ६ चौकारासह५६ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादवने दणदणीत अर्धशतक केले आहे. सूर्याने ३१ चेंडूत ५४ धावा करत मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी केली. वैभव अरोराच्या १४व्या षटकात २० धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले.
आंद्रे रसेलच्या १२व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पंड्याला एका धावेसह झेलबाद केले. आंद्रे रसेलच्या १२व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पंड्याला एका धावेसह झेलबाद केले. संघाला गरज असताना पंड्याने फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. रसेलने त्याला येताच पुन्हा पॅव्हेलियनमध्ये धाडले.१२ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या ६ बाद ८२ इतकी आहे.
११व्या षटकातील पाचव्या चेंडूवर नेहल वधेरा क्लीन बोल्ड झाला. ६ धावा करत नेहल बाद झाल्याने मुंबईला मोठा धक्का बसला आहे.
मुंबईने १० षटकांनंतर ४ बाद ६७ धावाच केल्या आहेत. केकेआरच्या गोलंदाजांनी मुंबईच्या धावांवर अंकुश ठेवला आहे. सूर्या आणि नेहल वधेराची जोडी मैदानात आहे.
वरूण चक्रवर्तीच्या नवव्या षटकातील चौथ्या चेंडूवर मुंबईने अजून एक विकेट गमावली. तिलक वर्मा अवघ्या ४ धावा करत झेलबाद झाला. ९ षटकांनंतर मुंबई ४ बाद ६१ धावा केल्या.
सुनील नारायणच्या सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर रोहित झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी रोहितने १२ चेंडूत एका षटकारासह ११ धावा केल्या. यासह मुंबईने पॉवरप्लेमध्ये ३ विकेट्स गमावत ४६ धावा केल्या.
पाचव्या षटकात नमन धीर क्लीन बोल्ड झाला. चक्रवर्तीच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी गेला आणि नमनने विकेट गमावली. बाद होण्यापूर्वी नमन ११ चेंडूत २ चौकारांसह ११ धावा केल्या.
मुंबईकडून इम्पॅक्ट प्लेअर रोहित शर्मा आणि इशान किशन मैदानावर आले आहेत. पहिल्या षटकात मुंबईने 6 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करताना बॅकफऊटवर गेलेल्या कोलकाताला मुंबईने ऑल आऊट केले. यासह मुंबईला विजयासाठी केकेआरने १७० धावांचे लक्ष्य दिले आहे. व्यंकटेश अय्यरच्या ५२ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ७० धावा केल्याने केकेआरला १६९ धावा करत्या आल्या. व्यंकटेशशिवाय मनिष पांडेने महत्त्वपूर्ण ४२ धावांची खेळी केली.
मनिष पांडे आणि व्यंकटेश अय्यरच्या खेळीने संघाला १५० धावांचा पल्ला गाठून दिला. पण बुमराहच्या अखेरच्या षटकातील भेदक गोलंदाजीवर संघ मोठी धावसंख्या गाठू शकला नाही. केकेआरचे टॉप ५ फलंदाज फेल झाल्याचा संघाला मोठा फटका बसला.
नुवान तुषाराने नव्या चेंडूने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवून देत ३ विकेट्स पॉवरप्लेमध्ये घेतल्या. तर बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये आपल्या यॉर्करसह३.५ षटकांत १८ धावा देत ३ विकेट्स घेतले. यासह हार्दिक पंड्याने २ विकेट्स घेतल्या. तर पियुष चावलाने एक विकेट घेतली.
बुमराहने अखेरच्या षटकात शानदार गोलंदाजी करत चार चेंडूत अवघ्या २ धावा दिल्या. तर पाचव्या चेंडूवर यष्टीच्या मागे मोठा फटका खेळण्यासाठी विकेट सोडून व्यंकटेश अय्यर क्लीन बोल्ड झाला. बुमराहचा चेंडू थेट विकेट्सवर जाऊन आदळला आणि अशारितीने केकेआर ऑल आऊट झाली.
बुमराहच्या १८व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बुमराहने जबरदस्त यॉर्कर टाकत स्टार्कला क्लीन बोल्ड केले. १८व्या षटकानंतर केकेआरची धावसंख्या ९ बाद १५५ धावा आहे.
बुमराहच्या १८व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रमणदीप सिंग यॉर्करवर झेलबाद झाला. अवघ्या २ धावा करत त्याला मैदानाबाहेर जावे लागले.
पंड्याच्या १७व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आंद्रे रसेल ७ धावा करत धावबाद झाला. चेंडू न पाहताच रसेलने धाव घेतली पण अय्यरने चेंडू पाहताच तो मागे वळला आणि रसेल नॉनस्ट्रायकर एंडला येईपर्यंत पंड्याने तुषाराच्या थ्रोवर बेल्स उडवल्या. यासह केकेआरची धावसंख्या ७ बाद १५३ धावा आहे.
१७व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मनिष पांडे झेलबाद झाला. संघाला गरज असताना पांडेने महत्त्वपूर्ण खेळी करत मैदानात टिकून राहिला. मनिष पांडेने बाद होण्यापूर्वी ३१ चेंडूत २ षटकार आणि २ चौकारांसह ४२ धावा केल्या.
व्यंकटेश अय्यरने ३६ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकाराच्या मदतीने ५० धावा केल्या. जिथे संघाच्या मोठ्या फलंदाजांनी सहज विकेट गमावल्या. तिथे व्यंकटेश अय्यरने आपले शानदार अर्धशतक झळकावले आहे.
व्यंकटेश अय्यर आणि मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला आहे आणि व्यंकटेश अय्यर अर्धशतकाच्या जवळ आहे. १२व्या षटकात केकेआरने १०० धावांचा पल्ला गाठला आहे.
केकेआरने झटपट विकेट्स गमावत ५ बाद ८३ धावा केल्या. केकेआरचा इम्पॅक्ट प्लेअर मनिष पांडे आणि व्यंकटेश अय्यर संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.
सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पियुष चावलाने रिंकू सिंगला झेलबाद केले. बॅकफूटवर असलेल्या केकेआरसाठी हा मोठा धक्का होता. चावलाने रिंकूला ९ धावांवर बाद करत आयपीएलमधील १८४वी विकेट मिळवली आहे.
केकेआरचा संघ पॉवरप्लेमध्ये बॅकफूटवर गेला आहे. पॉवरप्लेमध्ये संघाने ४ बाद ५७ धावा केल्या आहेत. तुषाराने सर्वाधिक ३ विकेट तर पंड्याने एक विकेट घेतली.
पाचव्या षटकात गोलंदाजीला आलेल्या पंड्याने मुंबईला मोठी विकेट मिळवून दिली. पहिल्या चेंडूवर षटकार मिळाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर पंड्याने सुनील नारायणला क्लीन बोल्ड केले आहे. अशारितीने केकेआरचा संघ संकटात सापडला आहे.
नुवानने त्याच्या स्पेलमधील पहिल्या दोन षटकात ३ विकेट्स घेतले. फिलिप सॉल्ट ५ धावा, अंगक्रिश रघुवंशी १३ धावा तर कर्णधार श्रेयस अय्यर ६ धावा करत बाद झाले. ४ षटकांनंतर केकेआरची धावसंख्या ३ बाद ३७ धावा आहे.
सामन्यातील तिसऱ्या षटकात केकेआरने दोन मोठ्या विकेट गमावल्या आहेत. दुसऱ्या चेंडूवर अंगक्रिश रघुवंशीला सूर्याकडून झेलबाद केले. तर अखेरच्या चेंडूवर संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला झेलबाद केले.
मुंबई इंडियन्सला पहिल्याच षटकात मोठी विकेट मिळाली आहे. मुंबई इंडियन्सला पहिल्याच षटकात मोठी विकेट मिळाली आहे. नवीन तुषाराच्या तिसऱ्या चेंडूवर सॉल्टने चौकार लगावला पण पुढच्या चेंडूवर तुषाराने चांगला चेंडू टाकला, मोठा फटका खेळण्याच्या नादात तो तिलक वर्माकडून झेलबाद झाला. तिलक वर्मा आणि नमन धीर यांच्यात टक्कर झाली खरी पण तिलकने कोणतीही चूक न करता यशस्वी झेल टिपला.
केकेआरकडून फिल सॉल्ट आणि सुनील नारायण फलंदाजीसाठी आले आहेत. तर मुंबईकडून नवीन तुषाराला नवा चेंडू देण्यात आला आहे.
इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वधेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
इम्पॅक्ट प्लेअर: रोहित शर्मा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड.
फिलिप सॉल्ट (विकेटकिपर), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती
इम्पॅक्ट प्लेअर: अनुकुल रॉय, मनीष पांडे, श्रीकर भारत, शेरफेन रदरफोर्ड, चेतन साकारिया
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Highlights:आयपीएल २०२४ मधील ५१ वा सामना मुंबई इंडियन्स वि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात केकेआरने मुंबईवर १२ वर्षांनी विजय मिळवला.