Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Highlights Score Update: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पाच गडी राखून पराभव करून स्पर्धेत सलग अवे विजय नोंदवले आहेत. त्याचवेळी कोलकाताला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने १८५ धावा केल्या. मुंबईने १४ चेंडू बाकी असताना पाच विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होत आहे. हा सामना आपल्या नावावर करून मुंबई संघाला स्पर्धेत दुसरा विजय नोंदवायचा आहे. त्याचबरोबर कोलकाताचा नजरा तिसऱ्या विजयावर आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत व्यंकटेश अय्यरच्या शतकाच्या जोरावर १८५ धावा केल्या. विजयासाठी १८६ धावांचे आव्हान ठेवले आहे. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादव मुंबई संघाचे नेतृत्व करत आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माची तब्येत बिघडल्याने त्याला इम्पॅक्ट खेळाडूंच्या यादीत ठेवले गेल.

केकेआने नाणेफेक गमावल्यानंतर नितीश राणा याच्या नेतृत्वातील संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. कोलकाताने पावरप्ले दरम्यान नारायन जगदीसन आणि रहमानउल्ला गुरबाज यांच्या विकेट्स गमावल्या. कर्णधार नितीश राणा याने डावातील ९व्या षटकात विकेट गमावली. मुंबईचा युवा फिरकीपटू हृतिक शोकीन या षटकात गोलंदाजीला आला होता. षटकातील पहिलाच चेंडू राणाने षटकारासाठी खेळला. पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला नाही. रामदीप सिंग याच्या हातात तो झेलबाद झाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राणाने १० चेंडूत ५ धावा केल्या आणि विकेट गमावली. एकीकडे केकेआर झटपट विकेट्स गमावत असताना दुसरी बाजू वेंकटेश अय्यर याने सांभाळून ठेवली.  कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक १०४ धावा केल्या. त्याचवेळी, आंद्रे रसेलने ११ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. मुंबईकडून हृतिक शोकीनने दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी अर्जुन वगळता इतर सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पोट दुखत असल्यामुळे प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर होता. रोहितच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारने नाणेफेक केली आणि जिंकली देखील. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मागच्या दोन हंगामांपासून मुंबई संघासोबत सराव करत आहे. दीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर रविवारी अखेर अर्जुनला पदार्पणाची संधी मिळाली.

Live Updates

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Highlights Match Updates: कोलकाता नाइट रायडर्स वि मुंबई इंडियन्स हायलाइट्स क्रिकेट स्कोअर अपडेट्स

19:24 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: मुंबई इंडियन्सने कोलकातावर पाच गडी राखून मिळवला शानदार विजय

मुंबई इंडियन्सने कोलकातावर पाच गडी राखून शानदार विजय मिळवला हा त्यांचा या आयपीएलमधील दुसरा विजय असून त्यांचे ४ गुण झाले आहेत.

मुंबई इंडियन्स १८६-५

19:15 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: कोलकाताला चौथा धक्का, सूर्यकुमार यादव बाद

विजयाच्या उंबरठ्यावर असताना मुंबईला इंडियन्सला चौथा धक्का बसला. सूर्यकुमार यादवने २५ चेंडूत ४३ धावा करत शार्दूल ठाकूर करवी बाद झाला.

मुंबई इंडियन्स १७६-४

18:57 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का, तिलक वर्मा बाद

सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात उत्कृष्ट भागीदारी होत झाली. हे दोघेही आपल्या संघाला लक्ष्याच्या जवळ घेऊन जात होते. तेवढ्यात मोठा फटका मारण्याच्या नादात तिलक वर्मा २५ चेंडूत ३० धावा करून बाद झाला. त्याला सुयश शर्माने त्रिफळाचीत केले.

मुंबई इंडियन्स १४७-३

18:27 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का, इशान किशन बाद

पॉवरप्लेमध्ये मुंबई इंडियन्सने ७२ धावा ठोकल्या. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव
यांनी शानदार फटकेबाजी केली. इशान किशन अर्धशतककरून ५८ बाद झाला. वरूण चक्रवर्तीने त्याला त्रिफळाचीत केले.

मुंबई इंडियन्स ८७-२

18:11 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, इम्पॅक्ट खेळाडू रोहित शर्मा बाद

इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी मुंबई संघाला झंझावाती सुरुवात करून दिली . पॉवरप्लेच्या आत मुंबईने ५० धावा करत शानदार सुरुवात केली. दोन्ही फलंदाज वेगाने धावा करत असून मुंबईचा संघ लक्ष्याच्या दिशेने वेगाने पुढे जात होता. पण ह्या भागीदारीला ब्रेक लावत इम्पॅक्ट खेळाडू सुयश शर्माने इम्पॅक्ट खेळाडू रोहित शर्माला बाद केले.

मुंबई इंडियन्स ६५-१

18:02 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: १८६ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची आक्रमक सुरुवात

कोलकाताने ठेवलेल्या १८६ धावांचा पाठलाग करताना मुंबईने आक्रमक सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून उतरला असून सलामीवीर इशान किशन सोबत आक्रमक फलंदाजी करत आहे. त्यांच्यात ५० धावांची भागीदारी झाली आहे.

मुंबई इंडियन्स ५७-०

17:30 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: कोलकाताचे मुंबई इंडियन्ससमोर १८६ धावांचे आव्हान

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होत आहे. हा सामना आपल्या नावावर करून मुंबई संघाला स्पर्धेत दुसरा विजय नोंदवायचा आहे. त्याचबरोबर कोलकाताचा नजरा तिसऱ्या विजयावर आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत व्यंकटेश अय्यरच्या शतकाच्या जोरावर १८५ धावा केल्या. विजयासाठी १८६ धावांचे आव्हान ठेवले आहे.

17:22 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: कोलकाताला सहावा धक्का, रिंकू सिंग बाद

कोलकाताचा निम्य्यापेक्षा जास्त संघ १७६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. व्यंकटेश अय्यर ५१ चेंडूत १०४ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत नऊ षटकार आणि सहा चौकार लगावले. त्यापाठोपाठ मागील सामन्यातील स्टार खेळाडू रिंकू सिंग १८ चेंडूत १८ धावा करून बाद झाला. त्याला ड्वेन यान्सेनने बाद केले.

कोलकाता नाईट रायडर्स १७५-६

17:14 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: व्यंकटेश अय्यरचे शानदार शतक, १०४ धावा करून बाद

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर व्यंकटेश अय्यरने धमाकेदार फलंदाजी करत शतक झळकावले. त्यात ६ चौकार आणि ९ षटकारांची आतिषबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. त्यानंतर तो रिले मेरेडिथला मोठा फटका मारण्याच्या नादात ५१ चेंडूत १०४ धावा करून बाद झाला.

कोलकाता नाईट रायडर्स १५९-५

16:50 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: कोलकाताला चौथा धक्का, शार्दूल ठाकूर बाद

व्यंकटेश अय्यर तुफानी पद्धतीने धावा करत आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला शार्दुल ठाकूर त्याला साथ देत होता. त्यांच्यात ५० धावांची अर्धशतकी भागीदारी झाली होती. पण त्याला हृतिक शोकीनने बाद केले. त्याने १० धावा केल्या.

कोलकाता नाईट रायडर्स १३३-४

16:32 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: नितीश राणा-शोकीन यांच्यात शाब्दिक चकमक

कोलकात्याची तिसरी विकेट ७३ धावांवर पडली, नितीश राणा पाच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हे दोन्ही खेळाडू दिल्लीचे असून रणजी सामन्यात एकाच संघाकडून खेळतात. त्याला हृतिक शोकीनने बाद केल्या नंतर थोडे हातवारे करत काहीतरी बोलला त्यावर नितीश राणा देखील चिडला. मात्र, सूर्यकुमार यादवने मध्यस्थी करत हे प्रकरण थांबवले आणि खेळ पुढे सुरु ठेवला.

कोलकाता नाईट रायडर्स ९०-३

16:26 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: कोलकाताला तिसरा धक्का, कर्णधार नितीश राणा बाद

एका बाजूने व्यंकटेश अय्यर अर्धशतक करत खेळपट्टीवर टिकून आहे. त्याने तिसरे अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने मात्र कोलकाताच्या विकेट्स पडत आहेत. कर्णधार नितीश राणा अवघ्या ५ धावा करून बाद झाला. त्याला हृतिक शोकीनने बाद केले.

कोलकाता नाईट रायडर्स ७३-३

16:12 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: कोलकाताला दुसरा धक्का, गुरबाज बाद

११ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी कोलकात्याचा डाव सांभाळला होता. व्यंकटेश चांगल्या गतीने धावा करत आहे. तर गुरबाजने एक बाजू सांभाळून धरली होती. पियुष चावलाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात १२ चेंडूत ८ धावा करून झेलबाद झाला.

कोलकाता नाईट रायडर्स ५७-२

16:04 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: खराब सुरुवातीनंतर व्यंकटेश अय्यर-रहमानउल्ला गुरबाज सावरला डाव

मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोलकाताची सुरुवात खराब झाली. एन. जगदीशण भोपळाही न फोडता तंबूत परतला. पण व्यंकटेश अय्यर-रहमानउल्ला गुरबाज यांनी डाव सावरत संघांचे अर्धशतक पूर्ण केले.

कोलकाता नाईट रायडर्स ५५-१

15:46 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: कोलकाताला पहिला धक्का, एन जगदीशण बाद

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय योग्य ठरवत एन. जगदीशणला भोपळाही न फोडता माघारी पाठवले. कॅमेरॉन ग्रीनने त्याला हृतिक शोकीनकरवी झेलबाद केले.

कोलकाता नाईट रायडर्स ११-१

15:28 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: रोहितच्या जागी उतरणार अर्जुन तेंडूलकर

या सामन्यातून अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. २०२१ पासून तो या संघाचा भाग आहे, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. या सामन्यात तो पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. वेगवान गोलंदाज असण्यासोबतच अर्जुन एक उपयुक्त फलंदाज देखील आहे.

15:15 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: आजच्या सामन्यात रोहित ऐवजी सूर्यकुमार असणार कर्णधार

दोन्ही संघातील प्लेईंग-११

कोलकाता नाइट रायडर्स: रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती.

मुंबई इंडियन्स: इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पीयूष चावला, ड्वेन यान्सेन, रिले मेरेडिथ.

15:12 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: अखेर प्रतीक्षा संपली, अर्जुन तेंडूलकरचा डेब्यू

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या जागी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्माला पोटाचा त्रास आहे. मुंबईच्या प्लेइंग ११ मध्ये ड्वेन जॉन्सनचा समावेश करण्यात आला आहे. इम्पॅक्ट प्लेअरमध्ये अर्जुन तेंडुलकरचेही नाव असून तो या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करू शकतो.

15:03 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: मुंबई इंडियन्सने जिंकली नाणेफेक

आजच्या सामन्यात रोहित शर्मा पोटात दुखत असल्याने तो खेळणार नाही. त्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादव संघाची धुरा सांभाळणार असून मुंबईने नाणेफेक जिंकली आहे. मुंबईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

14:51 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: कोण जिंकणार आजचा सामना?

आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ चांगली सुरुवात करू शकला नाही. पहिल्या दोन सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. गेल्या सामन्यात मुंबईने १६व्या मोसमातील पहिला विजय दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नोंदवला. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. केकेआरने ४ पैकी २ सामने जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत. मात्र दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर मुंबईने वेग पकडला आहे. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर होणार आहे. त्यामुळे कोलकाताविरुद्धच्या या सामन्यात मुंबई विजयी होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

14:39 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग-११

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, कॅमेरॉन ग्रीन, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ/जोफ्रा आर्चर, अर्शद खान, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ

कोलकाता नाईट रायडर्स: जेसन रॉय, एन जगदीसन (यष्टीरक्षक), नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन / टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती.

14:35 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: कसे असेल आजचे हवामान?

मुंबईच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. याशिवाय ६९ टक्के आर्द्रता दिसून येते. तर ताशी ११ किलोमीटर वेगाने वारेही वाहू शकतात. दुसरीकडे, १६एप्रिल रोजी मुंबईत पावसाची जवळपास कोणतीही शक्यता नाही, याचा अर्थ पावसाचा कुठलाही व्यत्यय न येता हा सामना पूर्ण २०-२० षटकांचा पाहायला मिळेल.

14:32 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी आजच्या सामन्यात काय रंग दाखवणार?

मुंबईतील वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. येथे नवा चेंडू बॅटवर सहज येतो. शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने १५८ धावांचे लक्ष्य सहज पार केले होते. लाल मातीच्या खेळपट्टीवर फिरकीपटू नेहमी प्रभावी ठरतात. गेल्या सामन्यात पडलेल्या १० बळींपैकी ७ विकेट फिरकीपटूंनी घेतल्या. मुंबई-कोलकाता सामन्यात जो कोणता संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम फलंदाजीची निवड करेल. कारण हा सामना दिवसा होत आहे त्यामुळे दव पडण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

14:25 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: कोलकाताच्या टॉप ऑर्डरला चांगली कामगिरी करावी लागेल

कोलकाता संघाबद्दल बोलायचे तर, सनरायझर्स हैदराबादने त्यांच्याविरुद्ध २००+ धावा केल्या होत्या. संघाच्या गोलंदाजांना मुंबईविरुद्ध विजय मिळवायचा असेल, तर त्यांना भक्कम फलंदाजीच्या फळीसमोर गोलंदाजीत लाईन आणि लेंथ योग्य ठेवावी लागणार आहे. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण हैदराबादविरुद्ध निष्प्रभ दिसले. फलंदाजीत रहमानुल्ला गुरबाज, जगदीशन आणि व्यंकटेश अय्यर यांना अव्वल क्रमवारीत चांगली फलंदाजी करावी लागेल. नितीश राणाने गेल्या सामन्यात धडाकेबाज खेळी केली होती आणि मुंबईविरुद्धही अशीच खेळी करण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर रिंकू सिंग सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये धावत आहे.

14:20 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: मुंबईला गोलंदाजीत सुधारणा करण्याची गरज

मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीविरुद्धच्या गेल्या सामन्यात संघाच्या फलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट होती. कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये परतण्याची चिन्हे दाखवली. त्याचबरोबर इशान किशन आणि तिलक वर्मा यांनीही उपयुक्त खेळी खेळली. टिम डेव्हिड्स आणि कॅमेरून ग्रीन यांना आपल्या नावावर जगण्यासाठी मोठी खेळी खेळावी लागणार आहे.

मुंबईसाठी त्याचबरोबर सर्वात मोठी चिंता म्हणजे सूर्यकुमार यादवचा फॉर्म आहे. सूर्याला दिल्लीविरुद्ध खातेही उघडता आले नाही. त्याचबरोबर गोलंदाजीही मुंबईसाठी चिंतेचे कारण आहे. जेसन बेहरेनडॉर्फ आणि पियुष चावला आपापल्या अनुभवाचा उपयोग करून शानदार गोलंदाजी करत आहेत. रिले मेरेडिथच्या आगमनाने संघ मजबूत झाला आहे. अर्शद खान आणि हृतिक शोकीन या युवा गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल.

14:09 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: आकडेवारीमध्ये कोलकातापेक्षा मुंबई इंडियन्स सरस

आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर मुंबई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत एकूण ३१ सामने झाले आहेत. यातील २२ सामने मुंबईने जिंकले आहेत, तर नऊ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. वानखेडेवर दोन्ही संघ नऊ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील आठ सामने मुंबईने जिंकले आहेत, तर कोलकाताने केवळ एकच सामना जिंकला आहे.

14:07 (IST) 16 Apr 2023
MI vs KKR: रोहित ब्रिगेडसमोर आज कोलकाताला रोखण्याचे आव्हान

इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये आज (१६ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने असतील. दोन्ही संघांमध्ये हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. नितीश राणाच्या संघाला या सामन्यातून विजयाच्या मार्गावर परतायचे आहे. त्याचवेळी, गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केल्यानंतर, मुंबई इंडियन्स संघ आपली विजयी मालिका सुरू ठेवू इच्छित आहे. मुंबई आणि कोलकाता संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

आयपीएलच्या २२व्या सामन्यात मुंबईने कोलकाताचा पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. केकेआरचा हा सलग दुसरा पराभव आहे. व्यंकटेश अय्यरची शतकी खेळीही कोलकाता जिंकू शकली नाही.