आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी कायम आहे. मुंबईचा संघ पॉइंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबईला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. संघाचा या हंगामातील ११व्या सामन्यातील हा ८वा पराभव आहे. या सामन्यात संघाची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. या सामन्यातील पहिल्याच विकेटवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिच्या प्रतिक्रियेने लक्ष वेधलं आहे.
मुंबई इंडियन्सवरुरूद्धच्या सामन्यात मिचेल स्टार्क चांगलाच फॉर्मात दिसला. त्याने मुंबईला सर्वाधिक चार धक्के देत केकेआरला मोठा विजय मिळवून दिला. कोलकाताने दिलेल्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला चांगली सुरूवात करून देताना इशान किशन बाद झाला. स्टार्कच्या षटकात इशानने चांगली फटकेबाजी केली पण शेवटी मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात क्लीन बोल्ड झाला.
इशान किशनच्या विकेटवर रोहितच्या पत्नीची प्रतिक्रिया व्हायरल
दुसऱ्या षटकात इशाननेने मिचेल स्टार्कविरुद्ध दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर ईशानने षटकार लगावला. पुढच्याच चेंडूवर स्टार्कने आपल्या अनुभवाचा वापर करत अशा चेंडू टाकला की त्यावर इशान किशन बोल्ड झाला. ईशानने पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण लेग स्टंप उडाला होता.
हा सामना पाहण्यासाठी रोहित शर्माची पत्नी रितिका वानखेडे स्टेडियमवर हजर होती. मोठा फटका खेळत अशलेला इशान क्लीन बोल्ड झाल्याचे पाहताच रितिका चांगलीच वैतागली. इशानच्या या विकेटवर तिचा विश्वासचं बसेना आणि तिने आपला चेहरा हाताने झाकून घेतला. इशान किशनने ७ चेंडूत १३ धावांची खेळी केली. त्यावेळी रोहित शर्मा स्वतः इशानसोबत दुसऱ्या टोकाला फलंदाजी करत होता. पण मोठे फटके खेळत असलेला इशान मैदानावर टिकून राहणे फारच महत्त्वाचे होते. त्याच्या या विकेटनंतर मुंबईने झटपट विकेट्स गमावले आणि परिणामी १४५ धावा करत ऑल आऊट झाले.