IPL 2025 MI vs LSG Highlights: मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई ५४ धावांनी शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यात मुंबईचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी आला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकअखेर २१५ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचा संपूर्ण डाव १६१ धावांवर आटोपला आहे. मुंबईकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४, तर ट्रेन्ट बोल्टने ३, विल जॅक्सने २ आणि कॉबरीनने १ गडी बाद केला.

Live Updates
19:27 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: लखनऊचा १६१ धावांवर पॅकअप

लखनऊ सुपर जायंट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २१६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊचा डाव १६१ धावांवर आटोपला आहे.

19:07 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: W,W,W…एकाच षटकात बुमराहच्या ३ विकेट्स

बुमराहने लखनऊ सुपर जांयट्सला चांगलाच दणका दिला आहे. १६ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या बुमराहने एकाच षटकात ३ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे.

19:05 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: लखनऊचे ७ फलंदाज तंबूत! बदोनी पाठोपाठ मिलरचीही पडली विकेट

लखनऊ सुपर जायंट् संघाला ७ धक्के बसले आहेत. आयुष बदोनी बाद झाल्यानंतर, डेव्हिड मिलरही बाद झाला. याच षटकात बुमराहने अब्दुल समदलाही बाद करत माघारी धाडलं.

18:41 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: लखनऊला मोठा धक्का

लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. सलामीला आलेल्या मिचेल मार्शने चांगली सुरूवात करून दिली होती. मात्र ट्रेन्ट बोल्टने त्याला बाद करत माघारी धाडलं आहे.

18:20 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: एकाच षटकात लखनऊला २ मोठे धक्के

या डावातील सातवे षटक टाकण्यासाठी विल जॅक्स गोलंदाजीला आला आणि पहिल्याच षटकात लखनऊला दोन मोठे धक्के दिले. आधी निकोलस पूरन आणि त्यानंतर ऋषभ पंतला देखील बाद करत माघारी धाडलं.

18:15 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: मुंबईला मोठं यश! निकोलस पूरन स्वस्तात माघारी

लखनऊ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. निकोलस पूरन २७ धावा करत माघारी परतला आहे. त्याला बाद करण्यासाठी सूर्यकुमार यादवने शानदार झेल घेतला आहे.

17:54 (IST) 27 Apr 2025
MI vs LSG Live: बुमराहने मिळवून दिला ब्रेकथ्रू

चहर, बोल्टच्या सुरूवातीच्या दोन षटकांत फटकेबाजी झाल्यानंतर तिसऱ्या षटकात बुमराहला गोलंदाजीसाठी बोलावण्यात आलं. बुमराहने तिसऱ्या षटकातील सुरूवातीचे ३ डॉट चेंडू टाकले. तर चौथ्या चेंडूवर मारक्रमला झेलबाद करत संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यासह लखनौने ३ षटकांत १ बाद २० धावा केल्या आहेत.

17:26 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: मुंबईने गाठला २०० धावांचा पल्ला

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळी आणि नमन धीर-कार्बिन बॉशच्या फिनिशिंगच्या जोरावर मुंबईने २१५ धावा केल्या. मुंबईने प्रत्येक विकेटसाठी चांगली भागीदारी रचत मुंबईला या धावसंख्येपर्यंत नेले. यासह मुंबईने लखनौला विजयासाठी २१६ धावांचं मोठं आव्हान दिलं आहे.

17:11 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: सूर्यकुमार यादवचं अर्धशतक

सूर्यकुमार यादवची बॅट वानखेडेच्या मैदानावर तळपली आहे. सूर्याने २७ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५४ धावांची खेळी करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण आवेश खानच्या पुढच्याच चेंडूवर सूर्यादादा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. पण १८व्या षटकात मुंबईची धावसंख्या १८० पार पोहोचली आहे.

16:55 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: मुंबईचा निम्मा संघ तंबूत

मुंबई इंडियन्सला पाचवा धक्का बसला आहे. मयांक यादवच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्या बाद होऊन माघारी परतला आहे.

16:50 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: सूर्यकुमार – हार्दिकची तुफान फटकेबाजी

मुंबई इंडियन्सचा संघ या डावात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. डावाची सुरूवात करताना रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी दमदार सुरूवात करून दिली आहे. तर सूर्यकुमार यादव आणि हार्दिकची जोडी जमली आहे. १५ षटकअखेर मुंबईने ४ गडी बाद १५७ धावा केल्या आहेत.

16:32 (IST) 27 Apr 2025
MI vs LSG Live: मुंबईला तिसरा धक्का

मुंबईला तिसरा धक्का बसला आहे. प्रिन्स यादवने विल जॅक्सला बाद करत माघारी धाडलं आहे. मुंबईने आतापर्यंत ३ गडी बाद १२० धावा केल्या आहेत.

16:23 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: मुंबईचं शतक पूर्ण

मुंबई इंडियन्सच्या १०० धावा पूर्ण झाल्या आहेत. मुंबईने १० व्या षटकात १०० धावांचा पल्ला गाठला आहे. सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स दोघेही स्ट्राईकवर आहेत.

16:17 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: मुंबईची सलामी जोडी तंबूत! लखनऊचं कमबॅक

मुंबई इंडियन्सला दुसरा मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मानंतर आता रायन रिकल्टन तंबूत परतला आहे. रिकल्टने शानदार अर्धशतकी खेळी केली.

16:05 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: रायन रिकल्टनचं अर्धशतक पूर्ण

रायन रिकल्टनने या डावात फलंदाजी करताना ५ चौकार आणि ४ षटकारांसह २५ चेंडूत आपं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

16:02 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: पावरप्ले

पावरप्लेच्या षटकांमध्ये रोहितने तुफान सुरुवात करून दिली, पण तो १२ धावा करत माघारी परतला. त्यानंतर रायन रिकल्टनने फटकेबाजी सुरूच ठेवली आहे.

15:45 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: मुंबईला पहिला धक्का

मुंबई इंडियन्सला पहिला मोठा धक्का बसला आहे. सलामीला आलेला रोहित शर्मा १२ धावा करत माघारी परतला आहे. त्याला मयांक यादवने बाद करत माघारी धाडलं.

15:13 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Playing 11: अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

मुंबई इंडियन्स (Playing XI): रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, कर्ण शर्मा

लखनऊ सुपर जायंट्स (Playing XI): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), अब्दुल समद, आयुष बडोनी, दिग्वेष सिंह राठोड, रवि बिश्नोई, आवेश खान, प्रिन्स यादव, मयंक यादव

15:03 (IST) 27 Apr 2025

MI vs LSG Live: लखनऊचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय! पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११

मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.