Mumbai Indians vs Punjab Kings Score Update : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पंजाब किंग्जने कर्णधार सॅम करनच्या अर्धशतक आणि हरप्रीत भाटियाच्या ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर दोनशेचा टप्पा पार केला. २० षटकांत पंजाबने ८ विकेट्स गमावत २१४ धावांपर्यंत मजल मारली होती. परंतु, त्यानंतर या धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीनच्या वादळी अर्धशतक ठोकलं. पंरतु, अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा निसटता पराभव झाला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जने सलग चौथ्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने तिलक वर्मा आणि नेहल वढेराची दांडी गुल केली आणि मुंबईवर विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पीयुष चावला आणि अर्जुन तेंडुलकरच्या भेदक माऱ्यामुळं पंजाबचे चार फलंदाज माघारी परतले होते. पण त्यानंतर कर्णधार सॅम करनने आक्रमक फलंदाजी करून पंजाबच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. सॅमने २९ चेंडूत ५५ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. तसंच हरप्रीत भाटियानेही २८ चेंडूत ४१ धावांची खेळी साकारली. तर जितेश शर्माने षटकारांचा पाऊस पाडत ७ चेंडूत २५ धावा कुटल्या. त्यामुळे पंजाब किंग्जने २० षटकांत ८ विकेट्स गमावत २१४ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मुंबईने २० षटकांत ६ विकेट्स गमावत २०१ धावा केल्या.

Live Updates

Mumbai Indians vs Punjab Kings Highlights Match Updates

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा ३१ वा सामना वानखेडे मैदानात रंगणार आहे.

22:52 (IST) 22 Apr 2023
MI vs PBKS Live : अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार झाला बाद

पंधरा षटकानंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या १५९- 3 अशी झालीय. सूर्यकुमार आक्रमक अंदाजात फलंदाजी करत असून कॅमरून ग्रीनने ४३ चेंडूत ६७ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. १६ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १६१-३ अशी झालीय. १७ षटकानंतर मुंबई इंडियन्स १७५-३ वर पोहोचली आहे. १८ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १८४-४ अशी झाली आहे. १९ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १९९-४ झाली आहे. मुंबईला विजयासाठी ६ चेंडूत १६ धावांची आवश्यकता आहे.

22:32 (IST) 22 Apr 2023
MI vs PBKS Live : सूर्यकुमार यादव-कॅमरून ग्रीनकडे मोठी जबाबदारी, मुंबईची धावसंख्या शंभरी पार

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहे. कॅमरुन ग्रीन सावध खेळी करून मुंबईच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. १२ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ११०-२ अशी झाली आहे. १४ षटकानंतर मुंबई १३२ धावांवर पोहोचली असून दोन फलंदाज बाद झाले आहेत.

22:23 (IST) 22 Apr 2023
MI vs PBKS Live : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा बाद, मुंबईला दुसरा धक्का

पंजाबचा गोलंदाज लियाम लिविंगस्टनने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला ४४ धावांवर बाद करून पंजाब किंग्जला ब्रेक थ्रू दिला. त्यामुळे मुंबईला दुसरा धक्का बसला. दहा षटकानंतर मुंबईची धावसंख्या ८८-२ अशी झालीय. ११ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ९५-२ झालीय.

22:09 (IST) 22 Apr 2023
MI vs PBKS Live : पॉवर प्ले संपला, ईशान बाद झाल्यानंतर रोहित-कॅमरूनची सावध खेळी

अर्शदीप सिंगने ईशान किशनला एका धावेवर असताना झेलबाद केलं, त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनने सावध खेळी करत मुंबईच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. आठ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ६६-१ अशी झालीय. ९ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ७९-१ वर पोहोचली आहे.

21:46 (IST) 22 Apr 2023
MI vs PBKS Live : मुंबईचा सलामीवीर फलंदाज ईशान किशन स्वस्तात माघारी

मुंबई इंडियन्सचे सलामीवीर फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि इशांत किशन मैदानात उतरले होते. परंतु, अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर ईशान किशन फक्त एक धाव करून झेलबाद झाला. त्यामुळे मुंबईची सलामीची जोडी फोडण्यात पंजाबला यश आलं. एका षटकानंतर मुंबईची धावसंख्या ८-१ अशी झालीय. तीन षटकानंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या २१-१ अशी झालीय. ५ षटकानंतर मुंबई ४७-१ वर पोहोचली आहे.

21:23 (IST) 22 Apr 2023
MI vs PBKS Live : पंजाबची आक्रमक फलंदाजी, मुंबईला विजयासाठी २१५ धावांचं आव्हान

मुंबईच्या वानखेडे मैदानात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जच्या फलंदाजांची मुंबईच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवली होती. पीयुष चावला आणि अर्जुन तेंडुलकरच्या भेदक माऱ्यामुळं पंजाबचे चार फलंदाज माघारी परतले होते. पण त्यानंतर कर्णधार सॅम करनने आक्रमक फलंदाजी करून पंजाबच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. सॅमने २९ चेंडूत ५५ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. तसंच हरप्रीत भाटियानेही २८ चेंडूत ४१ धावांची खेळी साकारली. तर जितेश शर्माने षटकारांचा पाऊस पाडत ७ चेंडूत २५ धावा कुटल्या. त्यामुळे पंजाब किंग्जने २० षटकांत ८ विकेट्स गमावत २१४ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला विजयासाठी २१५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

20:57 (IST) 22 Apr 2023
MI vs PBKS Live : अर्जुन तेंडुलकरच्या एकाच षटकात पंजाब किंग्जने ठोकल्या ३१ धावा

अर्जुन तेंडुलकरने फेकलेल्या १६ व्या षटकात पंजाब किंग्जने ३१ धावा कुटल्या. कर्णधार सॅम करनने चौफेर फटकेबाजी करत मैदानात धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे १६ षटकात पंजाबची धावसंख्या १४९-४ अशी झाली आहे. १७ षटकानंतर पंजाब किंग्जची धावसंख्या १६२-४ अशी झालीय. १७ षटकानंतर पंजाबची धावसंख्या १८७-५ अशी झाली आहे.

20:26 (IST) 22 Apr 2023
MI vs PBKS Live :पीयुष चावलाने एकाच षटकात पंजाब किंग्जच्या दोन फलंदाजांना पाठवलं माघारी

अर्जुन तेंडुलकरने प्रभसिमरन सिंगला २६ धावांवर बाद केल्यानंतर दहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पीयुष चावलाने लियाम लिविंगस्टोनला १० धावांवर बाद केलं.त्यामुळे पंजाब किंग्जला तिसरा धक्का बसला. त्यानंतरच्या चेंडूवर चावलाने फेकलेल्या चेंडूवर पंजाबची चौथी विकेट गेली. अथर्व तायडे २९ धावांवर बाद झाला. १० षटकानंतर पंजाबची धावसंख्या ८३-४ झाली आहे. ११ षटकानंतर पंजाबची धावसंख्या ८८-४ अशी झाली आहे, १३ षटकानंतर पंजाबची धावसंख्या ९७-४ अशी झाली आहे. १४ षटकानंतर पंजाबची धावसंख्या १०५-४ झालीय. १५ षटकानंतर पंजाबची धावसंख्या ११८-४ झाली आहे.

20:12 (IST) 22 Apr 2023
MI vs PBKS Live : अर्जुन तेंडुलकरने प्रभसिमरन सिंगला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता, पंजाबचे दोन फलंदाज तंबूत

कॅमरुन ग्रीन बाद झाल्यानंतर पंजाबचे फलंदाज अशर्व आणि प्रभसिमरन सिंग सावध खेळी करत आहेत. त्यामुळे सहा षटकानंतर पंजाबची धावसंख्या एक बाद ५८ अशी झाली होती. त्यानंतर अर्जुन तेंडुलकरने सातव्या षटकात प्रभसिमरन सिंगला सटीक यॉर्कर फेकत २६ धावांवर बाद केलं. त्यामुळे सात षटकात पंजाबची धावसंख्या ७०-२ अशी झालीय. ९ षटकानंतर पंजाबची धावसंख्या ८१-२ अशी झालीय.

20:01 (IST) 22 Apr 2023
MI vs PBKS Live : पॉवर प्ले संपला, शॉर्ट बाद झाल्यानंतर पंजाब किंग्जची सावध खेळी

कॅमरुन ग्रीन बाद झाल्यानंतर पंजाबचे फलंदाज अशर्व आणि प्रभसिमरन सिंग सावध खेळी करत आहेत. त्यामुळे सहा षटकानंतर पंजाबची धावसंख्या एक बाद ५८ अशी झाली आहे.

19:47 (IST) 22 Apr 2023
MI vs PBKS Live : कॅमरुन ग्रीनच्या गोलंदाजीवर पंजाब किंग्जला पहिला धक्का, शॉर्ट परतला तंबूत

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पॉवर प्ले मध्ये पंजाबच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणले आहेत. गोलंदाज अचूक टप्प्यावर मारा करत असल्याने फलंदाजांना मोठे फटके मारणं अशक्य होत आहे. कॅमरुन ग्रीनने पंजाबचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू शॉर्टला ११ धावांवर बाद केल्यानं पंजाबला पहिला धक्का बसला आहे. तीन षटकानंतर पंजाबची धावसंख्या २०-१ झाली आहे. चार षटकानंतर पंजाबची धावसंख्या ३६-१ अशी झाली आहे. ५ षटकानंतर पंजाबची धावसंख्या ४६-१ झाली आहे.

19:36 (IST) 22 Apr 2023
MI vs PBKS Live : पहिल्याच षटकात अर्जुन तेंडुलकरचा भेदक मारा

मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पंजाबचे सलामीवीर फलंदाज मॅथ्यू शॉर्ट आणि प्रभसिमरन सिंग फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. पहिल्या षटकानंतर पंजाबची धावसंख्या बिनबाद ५ झाली आहे. दोन षटकानंतर पंजाबची धावसंख्या बिनबाद १३ झाली आहे.

19:14 (IST) 22 Apr 2023
MI vs PBKS Live ; नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सचा गोलंदाजीचा निर्णय

आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ३१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होत आहे. तत्पूर्वी मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. थोड्याच वेळात पंजाबची पलटण फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.

17:42 (IST) 22 Apr 2023
MI vs PBKS Live : ‘अशी’ आहे मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जची पलटण

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार) सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, हरप्रीत सिंग भाटिया, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग, राहुल चहर, सिकंदर रझा, कागिसो रबाडा, ऋषी धवन, मोहित राठी, शिवम सिंग, भानुका राजपक्षे, बलतेज सिंग, विद्वत कवेरप्पा आणि गुरनूर ब्रार.

17:35 (IST) 22 Apr 2023
MI vs PBKS Live : वानखेडे मैदानात मुंबई इंडियन्सची पंजाब किंग्जशी लढत, थोड्याच वेळात होणार नाणेफेक

आयपीएलच्या १६ व्या हंगामात आज शनिवारी २२ एप्रिल रोजी डबल हेडर सामन्यांचा थरार होत आहे. पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होत असून सायंकाळी ७.३० ला मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जमध्ये लढत होणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबईचा सलग दोन सामन्यात पराभव झाला होता. परंतु, त्यानंतर तिनही सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. तर पंजाबला ६ सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय संपादन करण्यात यश आलं आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात मुंबई आणि पंजाब आमनेसामने येणार असून या लढतीत कोण बाजी मारणार? मुंबईची विजय घौडदौड सुरुच राहणार का? असे प्रश्न चाहत्यांना पडले असून सामना पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मुंबई इंडियन्स वि पंजाब किंग्ज लाइव्ह क्रिकेट स्कोअर

मुंबई इंडियन्स आणि पंंजाब किंग्ज यांच्यात वानखेडे मैदानात जोरदार लढत होणार आहे.