Mumbai Indians vs Punjab Kings Highlights Score Update: आयपीएलच्या ४६व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा सहा विकेट्सने पराभव केला. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर उभय संघांमधील सामना रंगला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने २० षटकांत ३ बाद २१४ धावा केल्या. मुंबईने १८.५ षटकात ४ गडी गमावत २१६ धावा करत सामना जिंकला.

पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सला २१५ धावांचे लक्ष्य दिले आहे. त्याने २० षटकांत तीन गडी बाद २१४ धावा केल्या. पंजाबकडून स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन आणि यष्टिरक्षक जितेश शर्मा यांनी तुफानी खेळी खेळली. लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूत नाबाद ८२ आणि जितेशने २७ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने आपल्या खेळीत सात चौकार आणि चार षटकार मारले. त्याचवेळी जितेशने पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले. पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने २० चेंडूत ३० आणि मॅथ्यू शॉर्टने २६ चेंडूत २७ धावा केल्या. प्रभसिमरन सिंगला केवळ नऊ धावा करता आल्या. मुंबईकडून पियुष चावलाने दोन बळी घेतले. अर्शद खानने त्याला एक गडी बाद करत साथ दिली.

शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज आणि पाच वेळा विजेते मुंबई इंडियन्स यांच्या नजरा बुधवारी त्यांच्या आयपीएल सामन्यात सलग दुसऱ्या विजयावर असतील. हा सामना जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या टीम मुंबईला पॉइंट टेबलमध्ये एक फायदा होईल आणि हरल्यास टीमच्या अडचणी वाढतील. गेल्या मोसमात मुंबई गुणतालिकेत १०व्या स्थानावर होती. गेल्या दोन डावांत निराशा करणाऱ्या कर्णधार रोहित शर्माकडून संघाला चांगल्या कामगिरीची आशा असेल. त्याने राजस्थानविरुद्ध तीन आणि गुजरातविरुद्ध दोन धावा केल्या होत्या.

Live Updates

Mumbai Indians vs Punjab Kings Highlights Match Updates: मुंबई इंडियन्स वि पंजाब किंग्ज हायलाइट्स क्रिकेट स्कोअर

23:11 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: सलग दुसऱ्या सामन्यात २००चे लक्ष्य पार

आयपीएलच्या ४६व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर पंजाब किंग्जचे आव्हान होते. दोन्ही संघांमधील हा सामना मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर संपन्न झाला.सलग दुसऱ्या सामन्यात २००चे लक्ष्य पार करत मुंबई इंडियन्सने सहा गडी राखून पंजाब किंग्सवर दणदणीत विजय संपादन केला.

मुंबई इंडियन्स २१६-४

22:57 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: मुंबई आणखी एक मोठा धक्का, इशान किशन बाद

अर्शदीप सिंगने आधी सूर्याचा झेल घेत आणि त्याच्याच गोलंदाजीवर सेट फलंदाज इशान किशनला बाद केले. इशान किशनने धडाकेबाज खेळी करत ४१ चेंडूत ७५ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार मारले.

मुंबई इंडियन्स १७८-४

https://twitter.com/IPL/status/1653813385014960128?s=20

22:51 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: मुंबईला मोठा धक्का, सूर्यकुमार यादव बाद

इशान किशननंतर सूर्यकुमार यादव मुंबईला सामना जिंकवून देतील असे वाटत असताना अर्शदीप सिंगने त्याचा शानदार झेल घेतला. सूर्याने ३१ चेंडूत ६६ धावा करत संघाला विजयाच्या मार्गावर आणून सोडले.

मुंबई इंडियन्स १७०-३

https://twitter.com/IPL/status/1653811072091168768?s=20

22:46 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: सूर्यकुमार-इशान किशन यांच्यात अर्धशतकी भागीदारी

इशान किशननंतर सूर्यकुमार यादवनेही मुंबईसाठी आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. दोघांमध्ये आता शतकी भागीदारी झाली असून मुंबई इंडियन्स विजयाच्या दिशेने जात आहे सध्या ३० चेंडूत ४५ धावांची त्यांना गरज आहे.

मुंबई इंडियन्स १७०-२

https://twitter.com/IPL/status/1653810704955379712?s=20

22:37 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: मोहालीत सूर्याची तुफानी खेळी

मुंबईचा विस्फोटक फलंदाज 'मिस्टर ३६०' अशी ओळख असणाऱ्या 'द-स्काय' सूर्यकुमार यादवने मोहालीत आपले तुफानी अर्धशतक केले. सध्या इशान किशन आणि सूर्या यांनी पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली.

मुंबई इंडियन्स १४५-२

https://twitter.com/IPL/status/1653807213952262144?s=20

22:25 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: इशान किशन-सूर्यकुमार यांच्यात अर्धशतकी भागीदारी

मुंबई इंडियन्सने ११ षटकांत १०० धावा केल्या आहेत. इशान किशन २९ चेंडूत ५० धावा करत खेळपट्टीवर टिकून आहे. त्याने सूर्यकुमार यादवला साथीला घेत अर्धशतकी भागीदारी केली.

मुंबई इंडियन्स १११-२

https://twitter.com/IPL/status/1653805061867438080?s=20

22:07 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: पॉवर प्ले मध्ये मुंबईची सावध सुरुवात

पंजाब किंग्जसमोर २१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावले. त्याने सहा षटकांत दोन गडी बाद ५४ धावा केल्या आहेत. पॉवरप्ले संपण्यापूर्वी सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मुंबईला आणखी एक धक्का बसला. नॅथन एलिसने कॅमेरून ग्रीनला राहुल चहरच्या हाती झेलबाद केले. ग्रीनने १८ चेंडूत २३ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. त्याने इशान किशनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. सध्या इशान किशन आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर आहेत.

मुंबई इंडियन्स ६१-२

https://twitter.com/IPL/status/1653799706001276930?s=20

22:04 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: मुंबईला दुसरा धक्का, कॅमेरून ग्रीन बाद

रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर इशान किशन आणि कॅमेरून ग्रीन यांनी अर्धशतकी भागीदारी करत मुंबई इंडियन्सचा डाव सावरला होता. मात्र पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात पंजाबला भागीदारी तोडण्यात यश आले. त्याने १८ चेंडूत २३ धावा करत नॅथनच्या गोलंदाजीवर राहुल चाहरकरवी झेलबाद झाला.

मुंबई इंडियन्स ५४-२

https://twitter.com/IPL/status/1653798821972041729?s=20

21:34 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: मुंबईला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद

पंजाबने त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्ससमोर २१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एमआय पलटणची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा भोपळाही न फोडता माघारी परतला. त्याला ऋषी धवनने झेलबाद केले.

मुंबई इंडियन्स ५-१

https://twitter.com/IPL/status/1653791748823437312?s=20

21:26 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: पंजाब किंग्जने मुंबईला २१५ धावांचे लक्ष्य दिले

आयपीएलच्या ४६व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला आहे. मोहालीच्या घरच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्ससमोर २१५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

https://twitter.com/IPL/status/1653789607954386945?s=20

21:03 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: लियाम लिव्हिंगस्टोनचे शानदार अर्धशतक

जितेश शर्मा आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी पंजाबसाठी शानदार फलंदाजी केली. लिव्हिंगस्टोनने तुफानी अर्धशतक करत संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेण्यात मोठी मदत केली. दुसऱ्या बाजूला युवा जितेश शर्माने त्याला चांगली साथ दिली. दोघांमध्ये ४६ चेंडूत शतकी भागीदारी केली.

पंजाब किंग्स १९६-३

20:37 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: जोफ्रा आर्चरला एका षटकात २१ धावा कुटल्या

जितेश शर्मा आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी जोफ्रा आर्चरला एका षटकात २१ धावा कुटल्या. त्याच षटकात तिसऱ्या चेंडूवर जितेश शर्माचा झेल अर्शद खानने सोडला. त्यामुळे आता किती महागात पडणार हे येणारा काळच ठरवेल.

पंजाब किंग्स १३१-३

20:30 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: पंजाबला तिसरा धक्का, मॅथ्यू शॉर्ट क्लीन बोल्ड

शिखर धवन बाद झाल्यानंतर मॅथ्यू शॉर्ट आणि लियाम लिव्हिंगस्टोन या दोघांनी डाव सावरत पहिल्या दहा षटकात चांगल्या धावा जोडल्या. मात्र, पियुष चावलाने जादुई चेंडू टाकत त्याला क्लीन बोल्ड केले. त्याने २६ चेंडूत २७ धावा केल्या.

पंजाब किंग्स ९५-३

https://twitter.com/IPL/status/1653775712682385410?s=20

20:22 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: पहिल्या दहा षटकानंतर पंजाबची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

मुंबई इंडियन्सचा अनुभवी लेगस्पिनर पियुष चावलाने संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्याने आठव्या षटकात पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनला बाद केले. त्यानंतर मॅथ्यू शॉर्ट आणि लियाम लिव्हिंगस्टोन या दोघांनी डाव सावरत पहिल्या दहा षटकात चांगल्या धावा जोडल्या. त्यानंतर दोघांनी मोठे फटके मारण्यास सुरुवात केली आहे.

पंजाब किंग्स ९१-२

20:07 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: पंजाबला मोठा धक्का, कर्णधार शिखर धवन बाद

पियुष चावलाने शानदार फिरकी गोलंदाजी शिखर धवनला चकवत त्याला इशान किशनकरवी यष्टीचीत केले. त्याने २० चेंडूत ३० धावा केल्या.

पंजाब किंग्स ६२-२

https://twitter.com/IPL/status/1653770063332376577?s=20

19:59 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: पॉवर प्ले मध्ये पंजाब किंग्सची चांगली सुरुवात

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.पंजाब किंग्जला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. अर्शद खानने तिसऱ्या चेंडूवर प्रभाशिरन सिंगला बाद केले. सात चेंडूत नऊ धावा करून प्रभसिमरन सिंग यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद झाला. त्यानंतर शिखर धवनने शॉर्टला हाताशी घेत संघाचे पॉवर प्ले मध्ये अर्धशतक पूर्ण केलेा.

पंजाब किंग्स ५०-१

19:42 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: पंजाबला पहिला धक्का, प्रभसिमरन सिंग बाद

पंजाब किंग्जला मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला झटका बसला असून प्रभसिमरन सिंग बाद झाला. त्याने ७ चेंडूत ९ धावा करत अर्शद खानच्या गोलंदाजीवर इशान किशनकरवी झेलबाद झाला.

पंजाब किंग्स १३-१

https://twitter.com/IPL/status/1653763220925206530?s=20

19:33 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब सामन्याला सुरुवात

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला आहे. मोहालीच्या घरच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याला सुरुवात झाली आहे.

पंजाब किंग्स ५-०

https://twitter.com/IPL/status/1653760606670028802?s=20

19:14 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: दोन्ही संघांची प्लेईंग ११

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान.

पंजाब किंग्स: प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

https://twitter.com/IPL/status/1653755841814863872?s=20

https://twitter.com/IPL/status/1653756461363892224?s=20

19:03 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय

आयपीएलच्या ४६व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर पंजाब किंग्जचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईसाठी रोहितचा आयपीएलमधला हा २००वा सामना आहे.

https://twitter.com/IPL/status/1653754522681102338?s=20

18:48 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: मुंबई इंडियन्सचा संघ मैदानात दाखल

मुंबई इंडियन्सचा संघ मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये दाखल झाला असून रोहित शर्मा आणि इशान किशन सराव करत आहे. तसेच पंजाबचा संघ देखील तिथे सराव करताना दिसत आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1653717520526843904?s=20

18:13 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग-११

पंजाब किंग्जचे संभाव्य खेळाडू: प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा. अर्शदीप सिंग, शिवम सिंह

मुंबई इंडियन्सचे संभाव्य खेळाडू: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहार वढेरा, पियुष चावला, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ. अर्जुन तेंदुलकर

18:08 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: आजच्या सामन्यात पावसाची शक्यता

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून सामना रंगणार आहे. दिवसाचे कमाल तापमान २५ अंश राहण्याचा अंदाज असून ते बहुतांशी ढगाळ राहील. मोहालीत बुधवारी पाऊस पडू शकतो, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात हवामानामुळे खेळ खराब होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दोन्ही संघांना एक-एक गुण विभागून दिला जाईल.

18:06 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: काय रंग दाखवणार आजच्या सामन्यातील खेळपट्टी?

आयपीएलच्या १६व्या मोसमात मोहालीत खूप धावा झाल्या आहेत. येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये पहिल्या डावाची सरासरी १५३ ते १९१ धावांची होती. मात्र चौथ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने आक्रमक फलंदाजी करताना २५७ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. पावसाची शक्यता पाहता येथे नाणेफेक जिंकणाऱ्या दोन्ही संघ प्रथम फलंदाजी करण्याला प्राधान्य देतील.

https://twitter.com/IPL/status/1653748645991448577?s=20

17:58 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड आकडेवारी

आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये आतापर्यंत कडवी स्पर्धा पाहायला मिळाली. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३० सामने झाले आहेत. ज्यामध्ये १५ सामने पंजाबने तर १५ सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. या संघांमधील एकही सामना अनिर्णित किंवा बरोबरीत राहिला नाही. पंजाब आणि मुंबई यांच्यातील आजचा सामना रोमांचक होणार असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते.

https://twitter.com/mipaltan/status/1653732423350222852?s=20

17:55 (IST) 3 May 2023
MI vs PBKS: मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज

इंडियन प्रीमियर लीग २०२३चा ४६वा सामना आज (३मे) पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पंजाबच्या होम ग्राउंड मोहाली येथे होणार आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पंजाबने मुंबईचा १३ धावांनी पराभव केला. याशिवाय प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी रोहित शर्माच्या संघाला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. शिखर धवनच्या संघाला या सामन्यात पाहुण्यांवर मात करून अंतिम चारमध्ये प्रवेश करायचा आहे. दुसरीकडे मुंबई मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1653732449506177026?s=20

Mumbai Indians vs Punjab Kings Highlights Match Updates: मुंबई इंडियन्स वि पंजाब किंग्ज हायलाइट्स क्रिकेट स्कोअर

आयपीएल २०२३ चा ४६वा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोहाली येथे खेळवला जाणार आहे. या मैदानावरील शेवटच्या सामन्यात ४५० हून अधिक धावा झाल्या होत्या.

Story img Loader