MI vs RCB Predicted Playing 11, IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत आज (सोमवार) हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ रजत पाटीदारच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाशी दोन हात करणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. गुणतालिकेत आठव्या स्थानावर असलेला मुंबईचा संघाला चार सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला आहे. तर दुसरीकडे बंगळुरूचा संघाने त्यांच्या पहिल्या तीन लढतीमध्ये दोन गुणांची कमाई केली असून तो गुणतालिकेत तिसर्या स्थानावर आहे.
मुंबईसाठी आनंदाची बातमी
या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे. संघासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकणारा मुंबई वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतला आहे. बुमराह दुखापतीमुळे तीन महिन्यांहून अधिक काळाापसून क्रिकटच्या मैदानावरून दूर राहिला आहे. मुंबईच्या संघात दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि अश्विनी कुमार यांच्या जोडीला संघासाठी अस्त्र असलेला बुमराह परतल्याने मुंबईच्या संघाची गोलंदाजी अजून भक्कम होणार आहे. पण बुमराह परतल्याने आता आश्विनी याला बाकावर बसावे लागू शकते. तर विग्नेश पुथुर याला इम्पॅक्ट सब म्हणून संधी दिली जाऊ शकते. सरावादरम्यान गुडघ्याला दुखापत झाल्याने गेल्या सामन्यातून बाहेर राहिलेला रोहित शर्मा बंगळुरूविरोधात उपलब्ध आहे की नाही? याबद्दल अद्यापही साशंकता आहे.
बंगळुरूच्या संघाने स्पर्धेत दोन विजय नोंदवले आहेत. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांना पराभूत केले, तर त्यांना गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला. तीन पैकी दोन सामने जिंकलेला बंगळुरूचा संघ तेच खेळाडू कायम ठेवण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघ कसे असू शकतात?
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्गिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज अंगद बावा, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट
इम्पॅक्ट प्लेयर – विघ्नेश पुथूर किंवा अश्विनी कुमार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटिदार (कर्णधार). लियम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल
इम्पॅक्ट प्लेयर – सुयेश शर्मा किंवा रसिक दार सलाम
एमआय आणि आरसीबी संघ
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, विघ्नेश पुथूर, कॉर्बिन बॉश, राज बावा, रॉबिन मिंझ, सत्यनारायण राजू, मुजिब उर रहमान, कर्ण शर्मा, रीस टोप्ली, बेवॉन जॅकब्स, क्रिश्नन श्रीजीत, अर्जुन तेंडूलकर.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल , रजत पाटीदार (कर्णधार), लियम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज सिंह, मनोजभनंद भांडगे, जॅकब बेथेल, स्वप्निल सिंह, अभिनंदन सिंह, रोमारियो शेपर्ड, लुंगी न्गिदी, नुआन थुसारा, मोहित राठी, स्वास्तिक चिकारा.