IPL 2023, Mi vs RCB Match Update: आयपीएल २०२३ च्या ५४ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयासह मुंबईने बंगळुरूकडून मागच्या पराभवाचा हिशोब चुकता केला. मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ६ गडी गमावून १९९ धावा केल्या आणि मुंबईला २०० धावांचे मोठे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात मुंबईने २१ चेंडू आणि ६ गडी राखून लक्ष्य गाठले.

मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सहा विकेट्सने पराभव करून आयपीएल २०२३ मध्ये सहाव्या विजयाची नोंद केली आहे. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १६.३ षटकांत ४ गडी गमावून २०० धावा केल्या. आरसीबीकडून कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी उत्कृष्ट अर्धशतके झळकावली. दोघांनी शतकी भागीदारीही केली, पण त्यांची खेळी व्यर्थ गेली. मुंबईसाठी इशान किशनच्या ४२ धावांच्या खेळीनंतर सूर्यकुमार यादवच्या ८३ आणि नेहल वढेराच्या ५२ धावांच्या खेळीने मुंबईला विजय मिळवून दिला. या सामन्यातील विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Live Updates

MI vs RCB match live updates

Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Highlights, IPL 2023: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हायलाइट्स:

23:29 (IST) 9 May 2023
MI vs RCB : मुंबईला सलग दोन धक्के; सूर्या पाठोपाठ टीम डेव्हिडही बाद

१६ व्या षटकात १९२ धावांवर मुंबई इंडियन्सची तिसरी आणि चौथी विकेट पडली. सूर्यकुमार ३५ चेंडूत ८३ धावा करून बाद झाला. सूर्याने ७ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याच्यानंतर टीम डेव्हिडही बाद झाला.

23:21 (IST) 9 May 2023
MI vs RCB: सूर्यकुमार आणि नेहलच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईचा बंगळुरूवर सहा गडी राखून विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करतान फाफ डू प्लेसिस ६५ आणि ग्लेन मॅक्सवेल ६८ यांच्या बळावर २० षटकांत ६ गडी गमावून १९९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने १७ व्या षटकात लक्ष्याचा पाठलाग केला. मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने अवघ्या ३५ चेंडूत ८३ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून ७ चौकार आणि ६ षटकार निघाले. त्याचबरोबर नेहल वढेरा ३४ चेंडूत ५२ धावा करून नाबाद राहिला. वढेराने ४ चौकार आणि ३ षटकार मारले.

https://twitter.com/IPL/status/1655990465404223489?s=20

23:11 (IST) 9 May 2023
MI vs RCB : १५ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या दोन बाद १७५ धावा

१५ षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या २ बाद १७५ आहे. सूर्यकुमार यादवने अवघ्या २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. वढेरा आणि सूर्या यांच्यात १०० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे

23:00 (IST) 9 May 2023
MI vs RCB : सूर्यकुमार आणि नेहल यांच्यात शतकी भागीदारी

सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांच्यात शतकी भागीदारी झाली आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादवनेही २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. या दोघांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे मुंबई संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. १४ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या २ बाद १५४ आहे.

https://twitter.com/IPL/status/1655987366073606144?s=20

22:59 (IST) 9 May 2023
MI vs RCB : मुंबई इंडियन्सची सामन्यावर मजबूत पकड; १३ षटकांनंतर धावसंख्या दोन बाद १४१ धावा

१३ षटकांनंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या २ बाद १४१ आहे. सूर्यकुमार आणि वढेरा यांच्यात ४९ चेंडूत ८८ धावांची भागीदारी झाली आहे. वढेरा ४० तर सूर्या ३९ धावा करुन खेळत आहेत.

22:49 (IST) 9 May 2023
MI vs RCB : सूर्यकुमार आणि नेहल यांच्यात अर्धशतकी भागीदारी

सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोघेही धडाकेबाज पद्धतीने धावा करत आहेत. या दोघांच्या शानदार खेळीमुळे मुंबईच्या धावसंख्येने दोन विकेट्सवर १०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ११ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या २ बाद ११४ आहे.

https://twitter.com/IPL/status/1655982714540150786?s=20

22:34 (IST) 9 May 2023
MI vs RCB : सलग दोन धक्क्यानंतर सूर्यकुमार आणि नेहलने सावरला मुंबईचा डाव

मुंबईने एकाच षटकात दोन विकेट गमावल्यानंतर नेहल वढेरासह सूर्यकुमार यादवने डाव सांभाळला. दोघेही चांगल्या गतीने धावा करत असून मुंबईचा संघ सामन्यात कायम आहे. आठ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ८२ धावा आहे.

22:28 (IST) 9 May 2023
MI vs RCB : सात षटकानंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या दोन बाद ७४ धावा

सात षटकांनंतर, मुंबई इंडियन्सची धावसंख्या २ गडी बाद ७१ धावा. नेहल वढेरा सात चेंडूत १३ धावांवर तर सूर्यकुमार यादव सहा चेंडूत आठ धावांवर खेळत आहेत.

22:28 (IST) 9 May 2023
MI vs RCB : मुंबईला सलग दुसरा धक्का: इशान किशन पाठोपाठ रोहित शर्माही बाद

५२ धावांवर मुंबई इंडियन्सची दुसरी विकेट पडली. वनिंदू हसरंगाने एकाच षटकात इशान किशन आणि रोहित शर्माला बाद केले. रोहितने आठ चेंडूंत सात धावा केल्या. हसरंगाने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. पॉवरप्ले संपल्यानंतर मुंबईची धावसंख्या दोन बाद ६२ अशी आहे.

22:27 (IST) 9 May 2023
MI vs RCB : मुंबईला पहिला धक्का! इशान किशन ४२ धावा करून बाद

५१ धावांवर मुंबई संघाची पहिली विकेट पडली. इशान किशन २१ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. वनिंदू हसरंगाने त्याला अनुज रावतकरवी झेलबाद केले. आता सूर्यकुमार यादव रोहित शर्मासोबत क्रीजवर आहे.

22:27 (IST) 9 May 2023
MI vs RCB : मुंबईची दमदार सुरुवात; चार षटकांनंतर धावसंख्या बिनबाद ४१

२०० धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली आहे. इशान किशन आणि रोहित शर्मा वेगवान धावा करत आहेत. चार षटकांनंतर मुंबईची धावसंख्या बिनबाद ४१ अशी आहे.

22:26 (IST) 9 May 2023
MI vs RCB : मुंबईच्या डावाला सुरुवात

२०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची फलंदाजी सुरू झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन ही सलामीची जोडी क्रीझवर आहे. आरसीबीसाठी मोहम्मद सिराजने पहिले षटक टाकले. दोन षटकांनंतर मुंबईची धावसंख्या बिनबाद १९ अशी आहे.

21:27 (IST) 9 May 2023
MI vs RCB: बंगळुरूचे मुंबई इंडियन्ससमोर २०० धावांचे आव्हान

आयपीएल २०२३चा ५४वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आहे. दोन्ही संघ १० सामन्यांत पाच विजय मिळवून १० गुणांसह सहाव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. हा सामना जिंकणारा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहील. त्याचबरोबर पराभूत संघाला अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवणे कठीण होईल. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९९ धावा केल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १९९-६

https://twitter.com/IPL/status/1655966621213818881?s=20

21:17 (IST) 9 May 2023
MI vs RCB: आक्रमक फलंदाजी करणारा दिनेश कार्तिक बाद

कुमार कार्तिकेयच्या एका षटकात दिनेश कार्तिकने १५ धावा कुटल्या. मात्र पुढच्याच षटकात १८ चेंडूत ३८ धावा करत ख्रिस जॉर्डनकरवी बाद झाला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १८५-६

https://twitter.com/IPL/status/1655961586564231168?s=20

21:13 (IST) 9 May 2023
MI vs RCB: दिनेश कार्तिक शानदार फटकेबाजी

कुमार कार्तिकेयच्या एका षटकात दिनेश कार्तिकने १५ धावा कुटल्या. त्यामुळे बंगळुरू २०० धावांचा आकडा पार करणार हे स्पष्टपणे दिसत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १८४-५

21:05 (IST) 9 May 2023
MI vs RCB: दिनेश कार्तिक-केदार जाधव या जोडीने डाव सावरला

आरसीबीच्या धावसंख्येने पाच विकेट्स गमावून १५० धावा केल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डुप्लेसिस अर्धशतके झळकावून बाद झाले आहेत. आता दिनेश कार्तिक आणि केदार जाधव क्रीजवर आहेत. त्यांनी संघाचा डाव सावरला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १७०-५

20:57 (IST) 9 May 2023
MI vs RCB: आरसीबीला पाचवा धक्का

डुप्लेसिस-मॅक्सवेल यांच्या शतकी भागीदारीनंतर बंगळुरूच्या एकापाठोपाठ तीन विकेट्स पडल्याने मुंबई इंडियन्स पुन्हा सामन्यात परत आली आहे. सेट फलंदाज कर्णधार फाफ डू प्लेसिस बाद झाल्याने बंगळुरूचा संघ अडचणीत आला आहे. त्याने ४१ चेंडूत ६५ धावा केल्या. त्याला कॅमरून ग्रीनने बाद केले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १४६-५

https://twitter.com/IPL/status/1655957756996911105?s=20

20:50 (IST) 9 May 2023
MI vs RCB: आरसीबीची चौथी विकेट पडली

१४३ धावांच्या स्कोअरवर आरसीबीची चौथी विकेट पडली. महिपाल लोमरोर तीन चेंडूत एक धाव काढून बाद झाला. कुमार कार्तिकेयने त्याला क्लीन बोल्ड केले. आता दिनेश कार्तिक कॅप्टन प्लेसिससोबत क्रीजवर आहे. १४ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या ४ बाद १४६ अशी आहे.

20:49 (IST) 9 May 2023
MI vs RCB: आरसीबीची तिसरी विकेट पडली

१३६ धावांच्या स्कोअरवर आरसीबीची तिसरी विकेट पडली. ग्लेन मॅक्सवेल ३३ चेंडूत ६८ धावा करून बाद झाला. जेसन बेहरेनडॉर्फने त्याला नेहल वढेराकरवी झेलबाद केले. मॅक्सवेलने आपल्या खेळीत आठ चौकार आणि चार षटकार मारले. प्लेसिससोबत शतकी भागीदारी करून त्याने आपल्या संघाची धावसंख्या १६/२ वरून १३६/३ वर नेली आहे.

20:47 (IST) 9 May 2023
MI vs RCB: डुप्लेसिस-मॅक्सवेल यांच्यात शतकी भागीदारी

फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात शतकी भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाज वेगाने धावा करत आहेत आणि आरसीबीला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जात आहेत. सध्या आरसीबी संघ २०० हून अधिक धावांच्या दिशेने सहज जाताना दिसत आहे. आरसीबीची धावसंख्या १२ षटकांत २ बाद १३१ अशी आहे.

20:47 (IST) 9 May 2023
MI vs RCB: फाफ डुप्लेसिसचे अर्धशतक

ग्लेन मॅक्सवेलनंतर फाफ डुप्लेसिसनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. प्लेसिसने ५० धावांचा टप्पा पार करण्यासाठी ३० चेंडूंचा सामना केला. प्लेसिसने आतापर्यंत पाच चौकार आणि दोन षटकार मारले आहेत.

20:46 (IST) 9 May 2023
MI vs RCB: मॅक्सवेलचे अर्धशतक

ग्लेन मॅक्सवेलने २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. त्याच्या या शानदार खेळीमुळे आरसीबीच्या धावसंख्येने दोन विकेट्सवर १०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. मॅक्सवेल आणि डुप्लेसिस यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली असून दोन्ही फलंदाज मोठे डाव खेळण्याचा प्रयत्न करत आहेत.

20:45 (IST) 9 May 2023
MI vs RCB: प्लेसिस आणि मॅक्सवेल यांच्यात अर्धशतकी भागीदारी

फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. दोघांनी २५ चेंडूत ५० धावा जोडल्या आहेत. या दोघांमधील उत्कृष्ट भागीदारीमुळे आरसीबी संघाने चांगली धावसंख्या गाठली आहे. आता या दोघांनाही दीर्घ भागीदारी करून आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याची इच्छा आहे. सात षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या दोन बाद ७२ अशी आहे.

20:45 (IST) 9 May 2023
MI vs RCB: पॉवरप्लेनंतर आरसीबीचा स्कोअर ५६/२

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावून ५६ धावा केल्या. विराट कोहली आणि अनुज रावत यांना जेसन बेहरेनडॉर्फने छोट्या धावसंख्येवर बाद केले, पण त्यानंतर कर्णधार फाफ डुप्लेसिसने ग्लेन मॅक्सवेलच्या साथीने डाव सांभाळला. दोन्ही फलंदाज वेगाने धावा करत आहेत आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन गेले आहेत.

20:12 (IST) 9 May 2023
MI vs RCB: आरसीबीची पहिली विकेट पडली

आरसीबीची पहिली विकेट दोन धावांवर पडली. जेसन बेहरेनडॉर्फने विराट कोहलीला बाद केले आहे. कोहलीला चार चेंडूत एकच धाव करता आली. यष्टिरक्षक इशान किशनने त्याचा झेल टिपला. अंपायरने त्याला आधी आऊट दिले नव्हते, पण मुंबईने रिव्ह्यू घेतला आणि अंपायरला आपला निर्णय फिरवावा लागला. दोन षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या एका विकेटवर १२ धावा आहे.

https://twitter.com/IPL/status/1655937754575024128?s=20

19:15 (IST) 9 May 2023
MI vs RCB: नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने नाणेफेकीच्या वेळी सांगितले की, खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे आणि मुंबईत लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे आहे. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. जोफ्रा आर्चर संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे, त्याच्या जागी ख्रिस जॉर्डन मुंबई संघात सामील झाला आहे. त्याचवेळी आरसीबीचा संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. कर्ण शर्माच्या जागी विजयकुमार व्यासकचा संघात समावेश करण्यात आला आहे.

https://twitter.com/IPL/status/1655927214498775042?s=20

19:12 (IST) 9 May 2023
MI vs RCB: दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवूड.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ.

https://twitter.com/IPL/status/1655929680506286082?s=20

19:05 (IST) 9 May 2023
MI vs RCB: नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग

आयपीएलच्या १६व्या हंगामात आज मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

https://twitter.com/IPL/status/1655917947628687360?s=20

18:55 (IST) 9 May 2023
MI vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संपूर्ण संघ

फाफ डुप्लेसिस, विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, मनोज भंडागे, केदार जाधव, वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, वेन पारनेल, फिन ऍलन, अनुज रावत, दिनेश सिंग, दीपेश कार्तिक, फिन अॅलन , जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, राजन कुमार, हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, सोनू यादव, विजयकुमार व्यासक

https://twitter.com/RCBTweets/status/1655598017146421248?s=20

18:36 (IST) 9 May 2023
MI vs RCB: मुंबई इंडियन्सचा पूर्ण संघ

रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, टिम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, कुमार कार्तिकेय, अर्जन तेंडुलकर, ट्रिस्टन स्टब्स, विष्णू विनोद, अर्शद खान, जेसन बेहरेनडॉर्फ, पीयुष चावला , डुआन जेन्सन, राघव गोयल, संदीप वॉरियर, आकाश मधवाल, रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन.

https://twitter.com/mipaltan/status/1639221389281435649?s=20

Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Highlights, IPL 2023: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हायलाइट्स:

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ६ गडी गमावून १९९ धावा केल्या आणि मुंबईला २०० धावांचे मोठे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात मुंबईने २१ चेंडू आणि ६ गडी राखून लक्ष्य गाठले.

Story img Loader