IPL 2023, Mi vs RCB Match Update: आयपीएल २०२३ च्या ५४ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयासह मुंबईने बंगळुरूकडून मागच्या पराभवाचा हिशोब चुकता केला. मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ६ गडी गमावून १९९ धावा केल्या आणि मुंबईला २०० धावांचे मोठे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात मुंबईने २१ चेंडू आणि ६ गडी राखून लक्ष्य गाठले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सहा विकेट्सने पराभव करून आयपीएल २०२३ मध्ये सहाव्या विजयाची नोंद केली आहे. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १६.३ षटकांत ४ गडी गमावून २०० धावा केल्या. आरसीबीकडून कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी उत्कृष्ट अर्धशतके झळकावली. दोघांनी शतकी भागीदारीही केली, पण त्यांची खेळी व्यर्थ गेली. मुंबईसाठी इशान किशनच्या ४२ धावांच्या खेळीनंतर सूर्यकुमार यादवच्या ८३ आणि नेहल वढेराच्या ५२ धावांच्या खेळीने मुंबईला विजय मिळवून दिला. या सामन्यातील विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Live Updates

Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Highlights, IPL 2023: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हायलाइट्स:

18:27 (IST) 9 May 2023
MI vs RCB: आरसीबीचा विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न

फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाला आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत लय पकडता आलेली नाही. आरसीबीने १० पैकी पाच सामने जिंकले आहेत आणि पाच गमावले आहेत. हा संघ एक सामना जिंकल्यानंतर पुढचा सामना गमावत आहे. या हंगामात या संघाला सलग दोन सामने केवळ एकदाच जिंकता आले आहेत. गेल्या सामन्यात आरसीबीला दिल्ली संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. विराटच्या संघाला या सामन्यात विजयासह पुनरागमन करायला आवडेल.

18:21 (IST) 9 May 2023
MI vs RCB: आरसीबीचा संघ फलंदाजीत टॉप ऑर्डरवर अवलंबून

बंगळुरूचा संघही मुंबईप्रमाणे बर्‍याच प्रमाणात आपल्या टॉप ऑर्डरवर अवलंबून असल्याचे दिसते. विराट कोहली, कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यानंतर संघाची दुरवस्था होताना दिसत आहे. लोमरोरने गेल्या सामन्यातही धावा केल्या आहेत. अनुभवी कार्तिकची बॅट अजूनही धावा काढण्यासाठी तळमळत आहे. आता मधल्या फळीत केदार जाधवच्या प्रवेशाचा संघाला काही फायदा होऊ शकतो. जोश हेझलवूडच्या पुनरागमनामुळे गोलंदाजी विभाग मजबूत झाला आहे.

18:12 (IST) 9 May 2023
MI vs RCB: सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची विराटला संधी

आयपीएलच्या चालू हंगामात विराट कोहलीने १० सामन्यात ६ अर्धशतकांसह ४१९ धावा केल्या असून आतापर्यंत १० झेलही घेतले आहेत. लीगमधील एकूण २०३ सामन्यांमध्ये त्याच्या नावावर १०३ झेल आहेत. मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू किरॉन पोलार्डनेही तेवढेच झेल घेतले आहेत. अशा परिस्थितीत विराट कोहलीने सामन्यादरम्यान एक झेल घेतला तर तो पोलार्डला मागे टाकून आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.

लीगमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. रैनामो आयपीएलमध्ये २०४ सामन्यात १०९ झेल घेतले आहेत.

18:08 (IST) 9 May 2023
MI vs RCB: रोहित शर्माला आजच्या सामन्यात झेलचे शतक पूर्ण करण्याची संधी

रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९८ झेल घेतले आहेत आणि लीगमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. हिटमॅनला त्याचा जुना साथीदार किरॉन पोलार्डला मागे सोडायला वेळ लागेल, पण जर त्याने बंगळुरूविरुद्ध दोन झेल घेतले तर तो झेलचे शतक झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये सामील होईल.

18:03 (IST) 9 May 2023
MI vs RCB: आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेतील दोन्ही संघांची स्थिती

आयपीएल २०२३ पॉइंट टेबलमध्ये आरसीबीचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्स ८ व्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे १०-१० गुण आहेत. आजच्या सामन्यात जो संघ विजयी होईल. त्याच्यासाठी प्लेऑफचा रस्ता सोपा असेल. त्याचबरोबर पराभूत होणारा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो.

17:57 (IST) 9 May 2023
MI vs RCB: डेथ ओव्हरमधील गोलंदाजी मुंबईसाठी चिंतेचा विषय

रोहितच्या फॉर्मशिवाय डेथ ओव्हर्सची गोलंदाजीही मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे. त्यानी सलग चार सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करताना २०० हून अधिक धावा दिल्या आहेत. यातील दोन सामने वानखेडे स्टेडियमच्या सपाट खेळपट्टीवर खेळवण्यात आले होते. त्याचबरोबर संघाचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे. त्याच्या जागी मुंबईने क्रिस जॉर्डनला करारबद्ध केले आहे.

17:48 (IST) 9 May 2023
MI vs RCB: वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीचा अहवाल

येथील खेळपट्टीबद्दल फलंदाजांसाठी नेहमीच उत्तम विकेट असल्याचे सिद्ध झाले आहे आणि यावेळीही ते वेगळे नव्हते. या हंगामात आतापर्यंत येथे चार सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रत्येक सामन्यात दोन्ही संघांची धावसंख्या १५० च्या पुढे गेली आहे. यामध्ये दोन्ही संघांच्या धावसंख्येने तीन सामन्यात १८५ तर शेवटच्या दोन सामन्यात दोन्ही संघांनी २०० चा टप्पा ओलांडला.

शेवटच्या दोन सामन्यांबद्दल बोलायचे झाले, तर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध २१४ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २०१ धावा करून पराभूत झाला. त्याचवेळी, येथे झालेल्या राजस्थान आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानने मुंबईला २१३ धावांचे लक्ष्य दिले होते आणि मुंबईने हे लक्ष्य १९.३ षटकांत ४ विकेट्स गमावून पूर्ण केले.

17:43 (IST) 9 May 2023
MI vs RCB: आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स : इशान किशन, कॅमेरून ग्रीन, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, अर्शद खान.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डुप्लेसिस (कर्णधार) , विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई/अनुज रावत, केदार जाधव, दिनेश कार्तिक, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज.

17:37 (IST) 9 May 2023
MI vs RCB: आरसीबीला ८ वर्षापासून वानखेडेवर विजयाची प्रतिक्षा

आरसीबीला ८ वर्षापासून विजयाची प्रतिक्षा –

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत ९ सामने झाले आहेत. त्यापैकी ६ मुंबई संघाने जिंकले आहेत. त्याच वेळी, आरसीबीने केवळ ३ सामने जिंकले आहेत. २०१५ मध्ये वानखेडेवर आरसीबीने मुंबईचा ३९ धावांनी पराभव केला होता. त्यानंतर गेल्या ८ वर्षांपासून आरसीबी संघाला वानखेडे स्टेडियमवर मुंबईला हरवता आलेले नाही.

17:32 (IST) 9 May 2023
Mi vs RCB: दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ३१ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी मुंबईने १७ आणि आरसीबी संघाने १४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पण गेल्या काही काळापासून आरसीबीचा वर्चस्व राहिले आहे. बंगळुरु-मुंबई यांच्यात झालेल्या शेवटच्या ६ सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, बंगळुरुने ५ मध्ये विजय मिळवला आहे. त्याचबरोबर मुंबईला केवळ एकच सामना जिंकता आला आहे.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ६ गडी गमावून १९९ धावा केल्या आणि मुंबईला २०० धावांचे मोठे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात मुंबईने २१ चेंडू आणि ६ गडी राखून लक्ष्य गाठले.