IPL 2024, MI vs RCB Team Predicted Playing 11, Players List, Pitch Report Updates: आयपीएल २०२४च्या २५व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सचा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)शी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू एकमेकांविरूद्ध खेळताना दिसणार आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांच्यात ही रंगत होणार आहे. मुंबईने दिल्लीविरूद्ध विजय मिळवत विजयाचे खाते उघडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

– quiz

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईला अद्याप संघात योग्य तो ताळमेळ राखता आलेला नाही. तर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील बंगळुरूचा संघ केवळ विराटच्या फलंदाजीवरच अवलंबून आहे. विराटची बॅट यंदाच्या मोसमात चांगलीच तळपत असून कोहलीने यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले. संघाचं गोलंदाजी युनिटही फारशी चांगली कामगिरी करू शकलेलं नाही.

दोन्ही संघांच्या कर्णधारांवर या सामन्यात नजर असणार आहे. पंड्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने पहिला सामना जिंकला असला तरी त्याची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून बॅट आणि बॉलनेही त्याची कामगिरी साधारण राहिली आहे. त्याचप्रमाणे आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिससाठी यंदाच्या हंगामाची सुरूवात फारशी चांगली राहिलेली नाही. पाच सामन्यांमध्ये त्याने केवळ १०९ धावा केल्या आहेत. प्लेसिसचा फॉर्मही संघाच्या विजयासाठी तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. सोबतच संघाचे गोलंदाजी युनिट कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

MI vs RCB: दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमारियो शेफर्ड, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह</p>

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सौरव चौहान, रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल

MI vs RCB: हेड टू हेड
मुंबई आणि बंगळुरू यांच्यात आतापर्यंत ३२ सामने झाले आहेत. मुंबईने १८ सामने जिंकले असून आरसीबीच्या खात्यात १४ विजय आहेत. मुंबई संघाने वानखेडेवर ८० सामने खेळले आहेत, ज्यात ४९ सामने संघाने जिंकले तर ३० सामने गमावले असून एक सामना टाय झाला. तर आरसीबीने वानखेडेवर १० सामने खेळले असून ७ सामने जिंकले तर ३ सामने गमावले.

MI vs RCB: पिच रिपोर्ट

वानखेडेची खेळपट्टी नेहमीच फलंदाजीसाठी अनुकूल राहिली आहे. नवीन चेंडू सुरूवातीला थोडा स्विंग होऊ शकतो, पण चेंडू जुना झाला की या खेळपट्टीवर फलंदाजीला मदत मिळते. या मैदानावर मोठी धावसंख्या होत असल्याने संघ धावांचा पाठलाग करण्याला प्राधान्य देतात.

MI vs RCB: हवामानाचा अंदाज

अॅक्युवेदरनुसार, दिवसा तापमान ३४च्या आसपास असेल तर रात्रीच्या वेळी २५पर्यंत येईल. सुमारे ६५-७५ टक्के आर्द्रता असेल ज्यामुळे दव पडेल आणि पाऊस पडण्याची शक्यता नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mi vs rcb match preview ipl 2024 1st match head to head playing xi and pitch report details bdg