IPL 2024, MI vs RR Team Predicted Playing 11, Players List, Pitch Report Updates: मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२४ मधील आपला पहिला विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स हा १४ वा सामना आज वानखेडेमध्ये रंगणार आहे. रॉयल्सने आतापर्यंत लीगमधील त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत, तर मुंबईला अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. या आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्व संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर पहिला विजय नोंदवता आला आहे. पंड्याच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघ विजयाचे खाते उघडण्यात यशस्वी ठरणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत.

IPL 2024 MI vs RR: हेड टू हेड

IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय
Travis Head Statement on Mohammed Siraj Fight and Send Off Said I Said Well Bowled IND vs AUS 2nd Test
Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे

मुंबई आणि राजस्थानने आतापर्यंत एकमेकांविरुद्ध २८ सामने खेळले आहेत. यामध्ये मुंबईने १५ तर राजस्थान रॉयल्सने १२ सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला.

IPL 2024 MI vs RR: पिच रिपोर्ट

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समधील सामना मोठ्या धावसंख्येचा होण्याची अपेक्षा आहे. गेल्या मोसमात आणि २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान या मैदानावर धावांचा पाऊस पाडला. या मैदानावर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळते, पण चेंडू जुना झाल्यानंतर तो बॅटवर सहज येतो.

वानखेडे स्टेडियममध्ये दवदेखील मोठी भूमिका बजावतात आणि त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक फायदा होतो. दव असल्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे जाते आणि अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ नेहमीच प्रथम गोलंदाजी करणे पसंत करतो. या मैदानावर मुंबई इंडियन्सने ७८ पैकी ४९ सामने जिंकले आहेत.

MI vs RR Predicted Playing XI: दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

मुंबई संघाचा कर्णधार बदलल्यामुळे पंड्याला फार मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. अहमदाबाद आणि हैदराबादमधील सामन्यांमध्ये मैदानातही त्याच्याविरोधात नारेबाजी सुरू होती. या सगळ्यासोबतच त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने दोन्ही सामने तर गमावलेच पण पंड्याची कामगिरीही साधारण राहिली आहे.त्यामुळे या सामन्यात त्याच्यावर सर्वांची नजर असेल.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये बुमराहऐवजी पंड्या आणि मफाका यांनी गोलंदाजीला सुरूवात केली होती. बुमराहला पहिली गोलंदाजी न दिल्याचा सर्वांनाच धक्का बसला होता, या सामन्यात बुमराहकडे नवा चेंडू सोपवणार का हे पाहावे लागेल. मुंबईच्या ताफ्यात गोलंदाजी युनिटमध्ये कोणता बदल होणार का, मफाकाला या सामन्यात खेळण्याची संधी मिळणार की नाही, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. राजस्थानच्या संघात कोणते बदल होतील, याची शक्यता फारच कमी आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन कशी असेल जाणून घेऊया.

मुंबई इंडियन्स:
रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविस, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, गेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका

इम्पॅक्ट प्लेयर: नेहल वढेरा, आकाश मधवाल, शम्स मुलानी

राजस्थान रॉयल्स:
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/ कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, नांद्रे बर्गर, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेयर: संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक

Story img Loader