आयपीएलच्या २५व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबईने १४ धावांनी विजय मिळवला. सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांत पाच गडी गमावून १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ १९.५ षटकांत १७८ धावांत सर्वबाद झाला.
सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने युवा अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीसाठी बोलावले. अर्जुनने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत अवघ्या चार धावा दिल्या. त्याच्या षटकात दोन विकेटही पडल्या. अब्दुल समद दुसऱ्या चेंडूवर धावबाद झाला आणि पाचव्या चेंडूवर अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारला रोहित शर्माकडे झेलबाद करून सनरायझर्सचा डाव गुंडाळला. अर्जुनने २.५ षटकात १८ धावा देत त्याने कसून गोलंदाजी केली. त्याला कारकीर्दीतील पहिले यश मिळाले. त्याने सर्व चेंडू यॉंर्कर आणि ऑफसाइड द ऑफ टाकत संघाला रोमांचक विजय मिळवून दिला.
सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांत पाच गडी गमावून १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ १९.५ षटकांत १७८ धावांत सर्वबाद झाला. सनरायझर्सच्या विजयाचा क्रम खंडित झाला आहे. तिला गेल्या दोन सामन्यांत यश मिळाले, पण विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही. त्याचबरोबर मुंबईचा हा सलग तिसरा विजय आहे.
सनरायझर्ससाठी केवळ पाच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. मयंक अग्रवालने ४१ चेंडूत सर्वाधिक ४८ धावा केल्या. हेनरिक क्लासेनने १६ चेंडूत ३६ धावा केल्या. एडन मार्करामने २२, मार्को जॅनसेनने १३ आणि वॉशिंग्टन सुंदरने १० धावा केल्या. हॅरी ब्रूक नऊ, राहुल त्रिपाठी सात आणि अभिषेक शर्मा एक धावा काढून बाद झाले. संघाला अखेरच्या षटकांमध्ये अब्दुल समदकडून स्फोटक फलंदाजी अपेक्षित होती, मात्र तो १२ चेंडूत केवळ नऊ धावा करू शकला. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अर्जुन तेंडुलकर आणि कॅमेरून ग्रीन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
सामन्यानंतर तो काय म्हणाला अर्जुन?
सामन्यानंतर अर्जुन म्हणाला, “अर्थात माझी पहिली आयपीएल विकेट मिळणे या गोष्टींचा खूप आनंद झाला. मला फक्त ठरलेल्या योजने नुसार लक्ष केंद्रित करायचे होते. आमची योजना फक्त वाइड बॉलिंग करायची आणि लाँग बाऊंड्री शॉट खेळायला लावायचा अशी होती, फलंदाजाला लाँग साइडला शॉट खेळायला लावायचे होते. मी गोलंदाजीवर खूप खुश आहे, कर्णधाराने मला केव्हाही गोलंदाजी करण्यास सांगितले तरी मी तयार होतो. संघाच्या योजनेनुसार मी माझे सर्वोत्तम दिले त्यामुळे खूप आनंदी आहे. आम्ही (सचिन तेंडुलकर आणि तो) क्रिकेटबद्दल बोलतो, आम्ही खेळाआधी डावपेचांवर चर्चा करतो आणि तो मला प्रत्येक खेळाचा सराव करण्यास सांगतो. मी फक्त माझ्या चेंडूवर लक्ष केंद्रित केले, चांगली लेंन्थ आणि लाईन्स अपफ्रंट गोलंदाजी केली. जर तो स्विंग झाला तर तो एक बोनस आहे, जर नाही झाला, तर ते आहे ते ठीक आहे.