Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Match Highlights: आयपीएल २०२३ च्या साखळी सामन्यांच्या टप्प्यातील ६९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला आहे. या सामन्यात हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २०० धावांचा डोंगर उभारला आहे. प्रत्युत्तरात मुंबईने कॅमेरून ग्रीनच्या शतकाच्या जोरावर १८ षटकांत लक्ष्य गाठले.

या सामन्यात हैदराबादकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक ८३ धावा केल्या. विव्रंत शर्मानेही ६९ धावांची खेळी केली. त्याचवेळी मुंबईसाठी कॅमेरून ग्रीनने नाबाद शतक झळकावले. कर्णधार रोहितनेही ५६ धावा केल्या. मुंबईकडून आकाश मधवालने चार आणि ख्रिस जॉर्डनने एक विकेट घेतली. त्याचवेळी हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि मयंक डागर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

आता मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचे समीकरण काय?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा प्रवास संपणार आहे. मात्र, गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे १६ गुण होतील, तर मुंबई इंडियन्सचेही १६ गुण असतील, मात्र उत्तम नेट रनरेटमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल.

Live Updates

[caption id="attachment_3670506" align="alignnone" width="670"] Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Match Score in Marathi Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Match Highlights: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हायलाइट्स [/caption]

19:26 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबईने हैदराबादवर ८ गडी राखून केली मात

मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह मुंबई प्लेऑफच्या जवळ पोहोचली आहे. कॅमेरून ग्रीनने संघासाठी झंझावाती कामगिरी केली. त्याने नाबाद शतक झळकावले. ग्रीनने ४७ चेंडूत १०० धावा केल्या. रोहित शर्माने ५६ धावांचे योगदान दिले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २०१ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात मुंबईने १८ षटकांत लक्ष्य गाठले.

https://twitter.com/IPL/status/1660281986454528001?s=20

19:17 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबईला विजयासाठी २१ धावांची गरज

मुंबई इंडियन्स विजयाच्या अगदी जवळ आहे. कॅमेरून ग्रीन ८८ धावा करून खेळत आहे. संघाने १६ षटकांत १८० धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी २४ चेंडूत २१ धावांची गरज आहे. सूर्यकुमार यादव १७ धावा करून खेळत आहे.

https://twitter.com/IPL/status/1660277748559118337?s=20

19:03 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबईला विजयासाठी ४५ धावांची गरज आहे

मुंबईने १४ षटकांत २ गडी गमावून १५६ धावा केल्या आहेत. कॅमेरून ग्रीन ७५ धावा करून खेळत आहे. सूर्यकुमार यादव ६ धावा करून क्रीजवर उपस्थित आहे. संघाला विजयासाठी ३६ चेंडूत ४५ धावांची गरज आहे.

https://twitter.com/IPL/status/1660275751445483522?s=20

18:58 (IST) 21 May 2023
MI vs SRH: अर्धशतकी खेळीनंतर रोहित शर्मा बाद

मुंबई इंडियन्सची मोठी विकेट पडली. कर्णधार रोहित शर्मा ३७ चेंडूत ५६ धावा करून बाद झाला. संघाने १३.१षटकात १४८ धावा केल्या आहेत. मुंबईला विजयासाठी ४१ चेंडूत ५३ धावांची गरज आहे.

https://twitter.com/IPL/status/1660275667030929408?s=20

18:55 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबईने १३ षटकांत १बाद १४८ धावा केल्या

मुंबईने १३ षटकांत १ गडी गमावून १४८ धावा केल्या. कॅमेरून ग्रीन ७३ धावा करून खेळत आहे. रोहित शर्मा ५६ धावा करून क्रीजवर उभा आहे. संघाला विजयासाठी ५३ धावांची गरज आहे.

https://twitter.com/IPL/status/1660271670299627521?s=20

18:49 (IST) 21 May 2023
MI vs SRH: कॅमेरून ग्रीन पाठोपाठ रोहित शर्माने झळकावले शानदार अर्धशतक, मुंबईला विजयासाठी ६९ धावांची गरज

रोहित शर्माने ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने या खेळीत सात चौकार आणि एक षटकार मारला आहे. रोहितच्या या खेळीमुळे मुंबईचा संघ या सामन्यात खूप पुढे असून सहज विजय मिळवू शकतो. मुंबई इंडियन्सने १२ षटकाच्या समाप्तीनंतर १ बाद १३२ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा ५५ आणि ग्रीन ५८ धावांवर खेळत आहेत

https://twitter.com/IPL/status/1660273940256931842?s=20

18:39 (IST) 21 May 2023
MI vs SRH: कॅमेरून ग्रीनने झळकावले शानदार अर्धशतक

मुंबई इंडियन्सने १० षटकांत १ गडी गमावून ११४ धावा केल्या. कॅमेरून ग्रीन ५२ धावा करून खेळत आहे. रोहित शर्माही अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे. त्याने ४४ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/IPL/status/1660268892306956291?s=20

18:32 (IST) 21 May 2023
MI vs SRH: कॅमेरून ग्रीनने झळकावले शानदार अर्धशतक

मुंबईसाठी कॅमेरून ग्रीनने शानदार कामगिरी करताना अर्धशतक झळकावले. त्याने २१ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा ३१ धावा करून खेळत आहे. मुंबईने ९ षटकांत १ गडी गमावून १०० धावा केल्या आहेत. संघाला विजयासाठी १०१ धावांची गरज आहे.

https://twitter.com/IPL/status/1660269567569203200?s=20

18:20 (IST) 21 May 2023
MI vs SRH: रोहित आणि ग्रीनमध्ये अर्धशतकी भागीदारी

रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. ग्रीन वेगाने धावा करत आहे. त्याचवेळी रोहित एका टोकाला सावधपणे खेळत आहे. ग्रीन अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे. सात षटकांनंतर मुंबईची धावसंख्या एका विकेटवर ७३ अशी आहे.

https://twitter.com/IPL/status/1660264195206840321?s=20

18:13 (IST) 21 May 2023
MI vs SRH: सहा षटकानंतर मुंबईची धावसंख्या १बाद ६०

मुंबई इंडियन्सची धावसंख्या ५० धावांच्या पुढे गेली आहे. संघाने ६ षटकांत ६० धावा केल्या. ग्रीन ३० धावांवर खेळत आहे. रोहितने १५ धावा केल्या आहेत. या दोघांमध्ये ४० धावांची भागीदारी झाली आहे. मुंबईला विजयासाठी ८४ चेंडूत १४१ धावांची गरज आहे.

https://twitter.com/IPL/status/1660263958677422082?s=20

18:07 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबईला विजयासाठी १५९ धावांची गरज

मुंबई इंडियन्सने ५ षटकांत १ गडी गमावून ४२ धावा केल्या. रोहित शर्मा १३ धावा करून खेळत आहे. कॅमेरून ग्रीनने ६ चेंडूत १५ धावा केल्या आहेत. मुंबईला विजयासाठी ९० चेंडूत १५९ धावांची गरज आहे.

https://twitter.com/IPL/status/1660263065080963072?s=20

18:01 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबईने ४ षटकांत ३३ धावा केल्या

मुंबईने ४ षटकांत १ गडी गमावून ३३ धावा केल्या. रोहित शर्मा ११ धावा करून खेळत आहे. कॅमेरून ग्रीनने ८ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/IPL/status/1660260863763447808?s=20

17:55 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबई इंडियन्सला पहिला धक्का; इशान किशन आक्रमक खेळण्याच्या नादात बाद

२०१ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला आहे. इशान किशन आक्रमक खेळण्याच्या नादात बाद१४ धावांवर बाद झाला. त्याला भुवनेश्वर कुमारने झेलबाद केले. मुंबईने३ षटकानंतर १ बाद २४ धावा केल्या आहेत. रोहित शर्म ६ धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/IPL/status/1660260071564259328?s=20

17:49 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबईसाठी रोहित शर्मा आणि इशान किशनकडून वेगवान सुरुवात

२०१ धावांचा पाठलाग करताना मुंबईसाठी रोहित शर्मा आणि इशान किशनकडून वेगवान सुरुवात केली आहे. या दोघांनी पहिल्या दोन षटकांत १७ धावा केल्या आहेत. इशान किशन १३ आणि रोहित शर्मा ४ धावांवर खेळत आहेत.

https://twitter.com/IPL/status/1660257578931331074?s=20

17:32 (IST) 21 May 2023
MI vs SRH: सनरायझर्स हैदराबादचे मुंबई इंडियन्सला २०१ धावांचे लक्ष्य

आयपीएल २०२३ च्या साखळी सामन्यांच्या टप्प्यातील ६९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. या सामन्यात हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २०० धावांचा डोंगर उभारला आहे. हैदराबादकडून विव्रंत शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी दमदार अर्धशतकं झळकावली. त्याचबरोबर आता मुंबईला २०१ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

https://twitter.com/IPL/status/1660254030247895041?s=20

हैदराबादने मुंबईला विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य दिले. यादरम्यान विव्रंत शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी चमकदार कामगिरी केली. मयंकने ४६ चेंडूत ८३ धावा केल्या. विव्रतने ४७ चेंडूत ६९ धावा केल्या आहेत. मुंबईसाठी आकाश मधवालने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ३७ धावा देत ४ बळी घेतले.

https://twitter.com/IPL/status/1660251600483647488?s=20

17:18 (IST) 21 May 2023
MI vs SRH: हैदराबादला सलग दोन धक्के

पहिल्यांदा हेन्रिक क्लासेन १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर हॅरी ब्रूकही शून्यावर बाद झाला. दोघांनाही आकाश मधवालने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हैदराबादने १९ षटकात ५ बाद १८६ धावा केल्या आहेत. मार्कराम ४ धावा करून खेळत आहे.

https://twitter.com/IPL/status/1660249854336208904?s=20

17:07 (IST) 21 May 2023
MI vs SRH: हैदराबादला तिसरा धक्का बसला

हैदराबादला तिसरा धक्का बसला. ग्लेन फिलिप्स एक धाव काढून बाद झाला. ख्रिस जॉर्डनने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हैदराबादने १७.४ षटकात १७७ धावा केल्या आहेत. क्लासेन १४ धावा करून खेळत आहे.

https://twitter.com/IPL/status/1660247781121069056?s=20

17:04 (IST) 21 May 2023
MI vs SRH: हैदराबादने १७ षटकांत १७४ धावा केल्या

हैदराबादने १७ षटकांत २ गडी गमावून १७४ धावा केल्या. हेनरिक क्लासेन १३ धावा करून खेळत आहे. ग्लेन फिलिपचे खाते अद्याप उघडलेले नाही.

https://twitter.com/IPL/status/1660247308452368386?s=20

17:01 (IST) 21 May 2023
MI vs SRH: हैदराबादला दुसरा धक्का

हैदराबादची दुसरी विकेट पडली. मयंग अग्रवाल ४६ चेंडूत ८३ धावा करून बाद झाला. आकाश मधवाल यांनी त्याला बाद केले. संघाने १६.४ षटकात १७४ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/IPL/status/1660245650825695232?s=20

16:52 (IST) 21 May 2023
MI vs SRH: हैदराबादने १५ षटकांत १ बाद १५७ धावा केल्या

सनरायझर्स हैदराबादने १५ षटकांत १ गडी गमावून १५७ धावा केल्या. मयंक अग्रवाल ७३ धावा करून खेळत आहे. हेन्रिक क्लासेन ६ धावा करून खेळत आहे.

https://twitter.com/IPL/status/1660243868875653120?s=20

16:46 (IST) 21 May 2023
MI vs SRH: हैदराबादला पहिला धक्का, विव्रंत ६९ धावा करून बाद

सनरायझर्स हैदराबादची पहिली विकेट पडली. विव्रत शर्मा ६९ धावा करून बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकार ठोकले. आकाशने विव्रंतला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हैदराबादने १३.५ षटकात १४० धावा केल्या आहेत. मयंक ६२ धावा करून खेळत आहे.

https://twitter.com/IPL/status/1660242987853684738?s=20

16:38 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मयंकने ठोकले झंझावाती अर्धशतक

मयंक अग्रवालने झंझावाती अर्धशतक ठोकले. ३२ चेंडूत ५२ धावा केल्यानंतर तो खेळत आहे. हैदराबादने १२.२ षटकात १२१ धावा केल्या आहेत. मयंक आणि विव्रंत यांच्यात १२१ धावांची भागीदारी झाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1660240243956813824?s=20

16:33 (IST) 21 May 2023
MI vs SRH: विवंत-मयंक यांच्यात शतकी भागीदारी पूर्ण

हैदराबादने ११ षटकांत कोणतेही नुकसान न करता १०३ धावा केल्या. विवंत आणि मयंक यांच्यातील शतकी भागीदारी पूर्ण झाली आहे. मयंक ४० धावा करून खेळत आहे. विव्रतने ५५ धावा केल्या आहेत.

https://twitter.com/IPL/status/1660239295343632384?s=20

16:25 (IST) 21 May 2023
MI vs SRH: हैदराबादसाठी विव्रतचे शानदार अर्धशतक

विव्रत शर्माने शानदार कामगिरी करताना अर्धशतक झळकावले. तो ३६ चेंडूत ५० धावा केल्यानंतर खेळत आहे. त्याचे आयपीएलमधील पहिले अर्धशतक आहे.मयंकने २४ चेंडूत ३५ धावा केल्या आहेत. या दोघांमध्ये ९३ धावांची भागीदारी झाली आहे. हैदराबादने १० षटकांत कोणतेही नुकसान न करता ९३ धावा केल्या.

https://twitter.com/IPL/status/1660237658436820993?s=20

16:12 (IST) 21 May 2023
MI vs SRH: हैदराबादने ८ षटकांत बिनबाद ७४ धावा केल्या

हैदराबादने ८ षटकांत कोणतेही नुकसान न करता ७४ धावा केल्या. मयंक ३० धावा करून खेळत आहे. विव्रंतने ३७ धावा केल्या आहेत. मुंबईचे गोलंदाज विकेटच्या शोधात आहेत. पण त्यांना ही जोडी अजून तोडता आलेली नाही.

https://twitter.com/IPL/status/1660233518566506496?s=20

16:06 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मयंक-विव्रत यांच्यात अर्धशतकी भागीदारी पूर्ण

मयंक अग्रवाल आणि विव्रत शर्मा यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. विव्रत २७ धावा करून खेळत आहे. मयंक २१ धावा करून क्रीजवर उभा आहे. हैदराबादने ६ षटकांत ५३ धावा केल्या आहेत. मुंबईचे गोलंदाज विकेटच्या शोधात आहेत.

https://twitter.com/IPL/status/1660232742515412992?s=20

16:00 (IST) 21 May 2023
MI vs SRH: विव्रंत शर्माचे बॅक टू बॅक दोन चौकार

चौथ्या षटकात विव्रत शर्माने बॅक टू बॅक दोन चौकार मारले. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनने बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट थर्ड मॅन यांच्यात चौकार मारला. आणि पुढच्याच चेंडूवर त्याने एक्स्ट्रा कव्हरला चौकार मारला.

https://twitter.com/IPL/status/1660230252126433281?s=20

15:50 (IST) 21 May 2023
MI vs SRH: हैदराबादच्या ३ षटकांत बिनबाद २२ धावा

हैदराबादने ३ षटकांत कोणतेही नुकसान न करता २२ धावा केल्या. मयंक अग्रवाल १० धावा करून खेळत आहे. विव्रंत शर्माने ७ धावा केल्या आहेत. या दोघांमध्ये २२ धावांची भागीदारी आहे. मुंबईसाठी गोलंदाजी करताना बेहरेनडॉर्फने २ षटकात १७ धावा दिल्या आहेत. ग्रीनने एका षटकात २ धावा दिल्या आहेत.

https://twitter.com/IPL/status/1660228774313738240?s=20

15:42 (IST) 21 May 2023
MI vs SRH: दोन षटकानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाची धावसंख्या बिनबाद ९

दोन षटकांच्या समाप्तीनंतर सनरायझर्स हैदराबाद संघाची धावसंख्या बिनबाद ९

विव्रंत शर्मा ६(९)

मयंक अग्रवाल १(२)

https://twitter.com/IPL/status/1660224719902367745?s=20

15:38 (IST) 21 May 2023
MI vs SRH: विव्रत-मयंक हैदराबादसाठी सलामी देत ​​आहेत

विव्रत आणि मयंक अग्रवाल सनरायझर्स हैदराबादकडून सलामी देत ​​आहेत. मुंबई इंडियन्सने पहिले षटक जेसन बेहरेनडॉर्फकडे सोपवले आहे.

https://twitter.com/IPL/status/1660224719902367745?s=20

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Highlights: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद मॅच हायलाइट्स

हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २०० धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात मुंबईने कॅमेरून ग्रीनच्या शतकाच्या जोरावर १८ षटकांत लक्ष्य गाठले

Story img Loader