Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Match Highlights: आयपीएल २०२३ च्या साखळी सामन्यांच्या टप्प्यातील ६९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला आहे. या सामन्यात हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २०० धावांचा डोंगर उभारला आहे. प्रत्युत्तरात मुंबईने कॅमेरून ग्रीनच्या शतकाच्या जोरावर १८ षटकांत लक्ष्य गाठले.

या सामन्यात हैदराबादकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक ८३ धावा केल्या. विव्रंत शर्मानेही ६९ धावांची खेळी केली. त्याचवेळी मुंबईसाठी कॅमेरून ग्रीनने नाबाद शतक झळकावले. कर्णधार रोहितनेही ५६ धावा केल्या. मुंबईकडून आकाश मधवालने चार आणि ख्रिस जॉर्डनने एक विकेट घेतली. त्याचवेळी हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि मयंक डागर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

आता मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचे समीकरण काय?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा प्रवास संपणार आहे. मात्र, गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे १६ गुण होतील, तर मुंबई इंडियन्सचेही १६ गुण असतील, मात्र उत्तम नेट रनरेटमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल.

Live Updates
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Match Highlights: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हायलाइट्स 
15:24 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबई संघात हृतिक शोकिनच्या जागी कुमार कार्तिकेयला संधी

रोहित शर्माने मोठ्या सामन्यासाठी संघात बदल केला आहे. हृतिक शोकिनच्या जागी कुमार कार्तिकेयला संधी मिळाली आहे.

प्लेइंग-इलेव्हन: रोहित शर्मा, इशान किशन, कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेरे, आकाश मधवाल, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, ख्रिस जॉर्डन.

15:22 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मयंक अग्रवालला मिळाली संधी

सनरायझर्स हैदराबादने संघात बदल केला आहे. मयंक अग्रवालचेही संघात पुनरागमन झाले आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघ: मयंक अग्रवाल, विव्रत शर्मा, इडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, मयंक डागर, नितीश कुमार रेड्डी.

15:12 (IST) 21 May 2023
MI vs SRH: सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबादः अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, उमरान मलिक, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी.

15:11 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स : इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल.

14:57 (IST) 21 May 2023
MI vs SRH: नाणेफेक जिंकणार संघ प्रथम गोलंदाजी करणार

वानखेडेवर स्टेडियमवर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक फायदा झाला आहे. अशा परिस्थितीत, या सामन्यात जोही कर्णधार नाणेफेक जिंकेल, तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

14:54 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्याच्या खेळपट्टीचा अहवाल

मुंबई आणि हैदराबद यांच्यातील हा सामना दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. हा सामना दिवसा खेळवला जाणार असला तरी या खेळपट्टीवर कमी आर्द्रता दिसेल आणि खेळपट्टी खूप कोरडी असेल. त्यामुळे या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मोठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. वानखेडेची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांना अनुकूल राहिली आहे.

14:43 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबईसाठी प्लेऑफचे समीकरण कसे आहे?

मुंबईला हैदराबादविरुद्ध वानखेडेवर होणारा सामना जिंकावा लागेल. मग बंगळुरूने गुजरातविरुद्धचा सामना हरल्यास मुंबईला फायदा होईल. अशा प्रकारे मुंबईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल. एमआयचा पहिलाच सामना असल्याने मुंबईने हैदराबादविरुद्ध 80 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवला किंवा ११.५ षटकांत पाठलाग केला तरच त्यांचा नेट रन रेट सकारात्मक होईल आणि बंगळुरूच्या सध्याच्या ट रन रेटपेक्षा चांगला असेल. यानंतर आरसीबीचा सामना आहे. जर बंगळुरूचा संघ गुजरातविरुद्ध दोन-तीन धावांनी जिंकला, तर मुंबईचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडेल आणि आरसीबी पात्र ठरेल.

14:36 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबईची आतापर्यंतची कामगिरी

मुंबईने आतापर्यंत १३ सामन्यांत सात विजय आणि सहा पराभवांसह १४ गुण आहेत. मुंबईची गुण संख्या चांगली आहे, पण त्यांचा नेट रन रेट नकारात्मक आहे. मुंबईचा नेट रन रेट -0.128 आहे. संघाला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर आधी हैदराबादविरुद्ध वानखेडेवर होणारा सामना जिंकावा लागेल.

14:23 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबईला हैदराबादविरुद्ध नेट रन रेट सुधारण्याची संधी

सनरायझर्स संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, पण मुंबईला अजूनही संधी आहे आणि त्याचा फायदा घेण्यासाठी ते उत्सुक आहेत. मुंबईने आपल्या घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर चांगली कामगिरी केली आहे. त्याने येथे आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ घरच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. त्याचा नेट रन रेट सुधारण्याची ही शेवटची संधी असेल.

14:16 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबई आणि हैदराबादने हेड टू हेड आकडेवारी

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामने

दोन्ही संघ आतापर्यंत २० वेळा आमनेसामने आले आहेत. यातील ११ सामने मुंबईने तर ९ सामने हैदराबादने जिंकले आहेत. दोन्ही संघ मुंबईतील वानखेडेवर सहा वेळा आमनेसामने आले आहेत. चारमध्ये मुंबई तर दोनमध्ये हैदराबादने विजय मिळवला आहे.

14:10 (IST) 21 May 2023
MI vs SRH: मुंबई इंडियन्सला मोठा विजय आवश्यक

मुंबईला हैदराबादविरुद्ध मोठा विजय गरजेचा

मुंबई आणि बंगळूरु या दोनही संघांचे १३ सामन्यांत १४ गुण आहेत. मात्र, बंगळूरुची (+०.१८०) निव्वळ धावगती मुंबईच्या (-०.१२८) तुलनेत सरस आहे. परिणामी गुणतालिकेत बंगळूरुचा संघ चौथ्या, तर मुंबईचा संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबईला हैदराबादविरुद्ध मोठ्या विजयाची आवश्यकता आहे. हैदराबादचा संघ ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीतून आधीच बाद झाला असून आता मुंबईला धक्का देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

14:02 (IST) 21 May 2023
MI vs SRH: गेल्या सामन्यात मुंबईचा ५ धावांनी झाला होता पराभव

गेल्या सामन्यात मुंबईचा 5 धावांनी पराभव झाला होता

मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धचा त्यांचा मागील सामना केवळ पाच धावांच्या फरकाने गमावला होता. मार्कस स्टॉइनिसच्या ४७चेंडूत ८९धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला पाच गडी गमावून १७२ धावाच करता आल्या. इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ९०धावा जोडून दमदार सुरुवात केली, पण पुढचे काही फलंदाज छाप पाडू शकले नाहीत.

13:59 (IST) 21 May 2023
MI vs SRH: आज मुंबई आणि हैदराबाद संघांत रंगणार रोमांचक सामना, पाह संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन: इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा/तिलक वर्मा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय.

सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, उमरान मलिक/मयांक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी.

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Highlights: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद मॅच हायलाइट्स

हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २०० धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात मुंबईने कॅमेरून ग्रीनच्या शतकाच्या जोरावर १८ षटकांत लक्ष्य गाठले