Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Match Update: मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला आहे. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य होते. रोहित शर्माच्या संघाने अवघ्या १८ षटकांत २ बाद २०१ धावा करत सामना जिंकला. त्याचबरोबर या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. तथापि, आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचे चाहते प्रार्थना करतील की, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ गुजरात टायटन्सकडून पराभूत व्हावा.

आता मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचे समीकरण काय?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा प्रवास संपणार आहे. मात्र, गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे १६ गुण होतील, तर मुंबई इंडियन्सचेही १६ गुण असतील, मात्र उत्तम नेट रनरेटमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल.

India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा

कॅमेरून ग्रीन आणि रोहित शर्माने सामना फिरवला –

दुसरीकडे, मुंबई इंडियन्स-सनराईजर्स हैदराबाद सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माच्या संघासमोर २०१ धावांचे मोठे लक्ष्य होते, परंतु कॅमेरून ग्रीनशिवाय रोहित शर्माच्या शानदार खेळीमुळे संघाने सामना सहज जिंकला. कॅमेरून ग्रीनने ४७ चेंडूत १००० धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ८ षटकार मारले. याशिवाय रोहित शर्माने ३७ चेंडूत ५६ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि १ षटकार लगावला.

मुंबई इंडियन्सला पहिला धक्का एकूण २० धावांवर बसला, जेव्हा सलामीवीर इशान किशन १२ चेंडूत १४ धावा करून भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला, पण यानंतर रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांच्यात १२८ धावांची भागीदारी झाली. रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीनच्या भागीदारीने मुंबई इंडियन्सचा विजय जवळपास निश्चित केला. यानंतर सूर्यकुमार यादवने १६ चेंडूत २५ धावा करत उर्वरित काम पूर्ण केले.

हेही वाचा – MI vs SRH Highlights: कॅमेरून ग्रीनच्या शतकाच्या जोरावर मुंबईची हैदराबादवर मात, राजस्थान प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

तत्पुर्वी विव्रंत शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी चमकदार कामगिरी केली. मयंकने ४६ चेंडूत ८३ धावा केल्या. विव्रतने ४७ चेंडूत ६९ धावा केल्या आहेत. ज्यामुळे हैदराबाद संघाला २०० धावांचा डोंगर उभारता आला होतामुंबईसाठी आकाश मधवालने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ३७ धावा देत ४ बळी घेतले.