Rohit Sharma complete 6000 runs in IPL: इंडियन प्रीमियर लीग २०२३चा २५ वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये मोठी कामगिरी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएलच्या इतिहासात ६००० धावांचा टप्पा पार करणारा रोहित भारतातील तिसरा आणि जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. रोहितने २३२ सामन्यांच्या २२७ डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. त्याच्या आधी विराट कोहली, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी आयपीएलमध्ये ६००० धावांचा टप्पा पार केला आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने मुंबईच्या डावातील तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरविरुद्ध चौकार मारून आयपीएलमधील आपल्या ६००० धावा पूर्ण केल्या. या सामन्यापूर्वी रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये एक शतक आणि ४१ अर्धशतकं होती.

सध्या मुंबई इंडियन्सने सनरायझर्सविरुद्ध ७ षटकांत बिनबाद ५६ धावा केल्या आहेत. इशान किशन २२ आणि कॅमेरून ग्रीन पाच धावांवर नाबाद आहे. कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने संघाला मोठा धक्का बसला आहे. पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहित पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला टी नटराजनच्या चेंडूवर एडन मार्करामने झेलबाद केले. रोहितने १८ चेंडूत २८ धावा केल्या. यादरम्यान त्याने सहा चौकार मारले.

आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांची स्थिती खराब

आयपीएल २०२३च्या ताज्या पॉइंट्स टेबलबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई इंडियन्सने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत आणि दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. संघाचे चार गुण आहेत पण निव्वळ धावगती मायनसमध्ये आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद संघही चारपैकी केवळ दोनच सामने खेळला असून, त्याचेही चार गुण आहेत. हैदराबादचा निव्वळ रनरेट देखील मायनसमध्ये आहे आणि संघ सध्या दहा संघांपैकी नवव्या क्रमांकावर आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल, तो पुढे जाण्याची शक्यता असेल, तर पराभूत संघ त्याच ठिकाणी राहील.

रोहितचे आतापर्यंतचे आयपीएलमधील यश

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पाच विजेतेपद पटकावणारे खेळाडू

एक खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये सहा विजेतेपद पटकावणारे खेळाडू

आयपीएलमध्ये ६००० धावा करणारा चौथा खेळाडू

सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकणारे भारतीय खेळाडू

हेही वाचा: IPL Lungi Dance: live शो दरम्यान लुंगी डान्स करताना माजी भारतीय क्रिकेटर, पाहा हरभजन-इरफानचा व्हायरल Video

६००० IPL धावा पूर्ण करण्यासाठी सर्वात कमी चेंडू घेतले

४२८५ – वॉर्नर

४५९५ – कोहली

४६१६ – रोहित*

४७३८ – धवन

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

सनरायझर्स हैदराबादः मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, कॅमेरून ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mi vs srh rohit sharma achieves career milestone crosses 6000 runs mark in ipl avw
Show comments