ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मिचेल जॉन्सनने आता आयपीएलकडे मोर्चा वळवला आहे. गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबचा हा खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या तडाखेबाज फलंदाज ए बी डि’व्हिलियर्सवर अंकुश ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या डी’व्हिलियर्सला जॉन्सन रोखण्यात यशस्वी होतो की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
‘‘ए बी डी’व्हिलियर्सला गोलंदाजी करणे सर्वात अवघड आहे. गेल्या दोन वर्षांत त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. कोणत्याही प्रकारात तो दर्जेदार फलंदाजी करू शकतो. माझ्यासाठी त्याला गोलंदाजी करणे हे नेहमी आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान मला आवडते,’’ असे मत जॉन्सन याने व्यक्त केले.
बुधवारी जॉन्सनने संघासोबत सरावाला सुरुवात केली. संदीप शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांच्या शिकण्याच्या वृत्तीने जॉन्सन फारच प्रभावित झाला आहे.
तो म्हणाला, ‘‘संदीपसोबत मी गतवर्षी खेळलो आहे. त्याच्याबरोबर खेळताना चांगले वाटले आणि दिवसेंदिवस त्याची गोलंदाजी बहरत आहे. संघात नव्याने दाखल झालेल्या शार्दुलनेही प्रभावित केले आहे. या दोघांमध्ये शिकण्याची जिद्द दिसते.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा