Mitchell starc bowling in powerplay : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४७वा सामना ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आहेत. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १५३ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्ससाठी कुलदीप यादवने सर्वाधिक ३५ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने ३ विकेट्स घेतल्या. या दरम्यान आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज मिचेल स्टार्क पावरप्लेच्या षटकांत पुन्हा एकदा महागड ठरला.

हा डावखुरा वेगवान गोलंदाज कोलकाता नाईट रायडर्सच्या शेवटच्या सामन्यात खेळला नव्हता. २९ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने पुनरागमन केले. पृथ्वी शॉने त्याला पहिल्या ३ चेंडूंवर ३ चौकार मारले. हे सामन्याचे पहिले ३ चेंडू होते. यादरम्यान त्याने एक वाईडही टाकला. अशा प्रकारे त्याने पहिल्याच षटकात १५ धावा दिल्या. स्टार्कच्या पुढच्या षटकात १२ धावा आल्या. मात्र, या षटकात त्याला विकेटही मिळाली. त्याने फॉर्ममध्ये असलेल्या जेक फ्रेझर मॅकगर्कला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र, मॅकगर्कने बाद होण्यापूर्वी एक षटकार आणि एक चौकार मारला. त्याने ७ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १२ धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १७१.४३ होता.

Fair Play Betting App Case, ED , ED seizes assets ,
फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरण : ईडीकडून आतापर्यंत ३४४ कोटींच्या मालमत्तेवर टाच
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
total of 1 thousand 415 kilometers cycled from Delhi to Mumbai by Feet Bharat Club of HSNC University
‘एचएसएनसी’ विद्यापीठाची सायकलद्वारे भारत भ्रमंती
Three Mumbai Indians are among the top 5 players to score the most runs in Tests at Wankhede Stadium
Wankhede Stadium : वानखेडेवर सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या टॉप-५ खेळाडूंपैकी पहिले तीन आहेत ‘हे’ मुंबईकर
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Metro 2A , Metro 7, Metro speed , Metro ,
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ सुसाट, ताशी ८० किमी वेगाने मेट्रो धावणार
Who is the Indian Shubham Ranjan who will play in BPL 2025 in Bangladesh
BPL 2025 : मराठमोळा शुभम रांजणे बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये

स्टार्कने पॉवरप्लेमधील कामगिरी अतिशय साधारण –

मिचेल स्टार्कची पॉवरप्लेमधील कामगिरी अतिशय साधारण राहिली आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याच्या षटकांत ४ चौकार आणि १ षटकार मारला गेला. आतापर्यंत आयपीएल २०२४ मधील पॉवरप्लेमध्ये मिचेल स्टार्कने १८ षटके टाकली आहेत. त्याने या दरम्यान ११.११ च्या इकॉनॉमीसह २०० धावांत ४ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – IPL 2024 : अश्विनला २०२५ मध्ये कोणी खरेदी करणार नाही; ‘हा’ माजी भारतीय खेळाडू राजस्थानच्या ऑफस्पिनरवर संतापला

सामन्याबद्दल बोलायचे तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी या सामन्यात संघर्ष करताना दिसली. पॉवरप्लेमध्ये संघाने तीन गडी गमावले. शॉ १३ धावा केल्यानंतर, मॅकगर्क १२ धावा करून आणि होप सहा धावा करून बाद झाला. पुढच्याच षटकात दिल्लीने चौथी विकेटही गमावली. हर्षित राणाने अभिषेक पोरेलला बाद केले. त्याला १५ चेंडूत केवळ १८ धावा करता आल्या. यानंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी पदभार स्वीकारला. दोघांमध्ये २५ धावांची भागीदारी झाली, जी वरुण चक्रवर्तीने मोडली.

हेही वाचा – Mayank Yadav : लखनऊसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी झाला फिट

त्याने कर्णधार ऋषभ पंतला बाद केले. तो २० चेंडूत २७ धावा करून परतला. यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ट्रिस्टन स्टब्स जास्त काळ खेळपटीवर टिकू शकला नाही. अवघ्या चार धावा करून तो बाद झाला. या सामन्यात अक्षर पटेलने ३५ धावा, कुमार कुशाग्रने एक धाव, रसिक सलामने आठ धावा, कुलदीप यादवने ३५ धावा आणि लिझादने एक धावा केल्या. कुलदीप आणि लिझाड नाबाद राहिले. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने तीन तर वैभव आणि हर्षीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि सुनील नरेन यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.

Story img Loader